महाराष्ट्रभर जे सुरू आहे ते रत्नागिरीतही सुरू झालं पाहिजे : नीलेश राणे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2021 04:32 AM2021-04-20T04:32:04+5:302021-04-20T04:32:04+5:30

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी ...

What is going on all over Maharashtra should also start in Ratnagiri: Nilesh Rane | महाराष्ट्रभर जे सुरू आहे ते रत्नागिरीतही सुरू झालं पाहिजे : नीलेश राणे

महाराष्ट्रभर जे सुरू आहे ते रत्नागिरीतही सुरू झालं पाहिजे : नीलेश राणे

Next

रत्नागिरी : जिल्हा प्रशासनाने आरोग्य सेवा देण्यात आलेल्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेवर फोडू नये. राज्याने दिलेल्या नियमावलीप्रमाणे ज्या गोष्टी सुरू आहेत त्या रत्नागिरीमध्येही सुरू राहिल्या पाहिजेत, असे मत भाजपचे प्रदेश सचिव नीलेश राणे यांनी प्रसारमाध्यमांशी बाेलताना सांगितले.

राज्य शासनाने कोविडच्या प्रतिबंधासाठी नवीन अध्यादेश जाहीर करीत राज्यात संचारबंदी लागू केली आहे. मात्र, रत्नागिरी जिल्ह्यात चक्क कर्फ्यू लावला गेला असून, राज्य सरकारच्याच आदेशाची पायमल्ली जिल्हा प्रशासन करीत आहे. या गोष्टीकडे भाजपचे महाराष्ट्र प्रदेश सचिव तथा माजी खासदार नीलेश राणे यांनी लक्ष वेधले असून जिल्हा प्रशासनाने त्यांच्या अपयशाचे खापर रत्नागिरीच्या जनतेच्या माथी मारू नये. महाराष्ट्र राज्यात वेगळा नियम आणि फक्त रत्नागिरीसाठी वेगळा नियम असता काम नये. ते म्हणाले, मुंबई येथे रिक्षा, रेल्वे, हॉटेल्स सुरू आहेत. अन्य जिल्ह्यातही सुरू आहेत. राज्याने दिलेल्या निर्देशानुसार ते सुरू आहे. मग, रत्नागिरीमध्ये असे काय झाले की त्या ठिकाणी कर्फ्यू लावला जात आहे, असा प्रश्न राणे यांनी उपस्थित केला आहे. जिल्हा प्रशासनाने आरोग्य यंत्रणा सक्षम करण्याकडे आधी लक्ष द्यावे, अशी सूचना त्यांनी केली आहे.

ते पुढे म्हणाले, कोरोनाचे रुग्ण काय, आकाशातून पडत आहेत काय की रत्नागिरीला वेगळे नियम लावले जात आहेत. ज्या गोष्टी राज्यात सुरू आहेत त्या रत्नागिरीत बंद आहेत. रत्नागिरीला काय भिकेला लावायचे ठरविले आहे काय, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला आहे. ज्या गोष्टी महाराष्ट्रभर सुरू आहेत, त्या रत्नागिरीत सुरू झाल्या पाहिजेत, असे त्यांनी स्पष्ट केले. लोकांचा अंत पाहू नका, असेही नीलेश राणे म्हणाले.

Web Title: What is going on all over Maharashtra should also start in Ratnagiri: Nilesh Rane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.