गुहागर-मोडकाआगर रस्त्याचे रुंदीकरण सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 5, 2021 04:52 AM2021-05-05T04:52:14+5:302021-05-05T04:52:14+5:30
गुहागर : गुहागर-विजापूर रस्त्याअंतर्गत गेले वर्षभर मोडकाआगर ते रामपूर रस्त्याचे काम सुरू आहे. काम बहुतांशी पूर्ण झाले असून यामधील ...
गुहागर : गुहागर-विजापूर रस्त्याअंतर्गत गेले वर्षभर मोडकाआगर ते रामपूर रस्त्याचे काम सुरू आहे. काम बहुतांशी पूर्ण झाले असून यामधील राहिलेल्या गुहागर ते मोडकाआगर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम सुरू आहे.
गुहागर ते विजापूर रस्त्याचे नव्याने रुंदीकरण व डांबरीकरण काम गेले वर्षभर सुरू आहे. दोन वर्षांपूर्वीच मोडकाआगर पूल धोकादायक बनला असल्याचे बांधकाम विभागाने जाहीर करत हा पूल वाहतुकीस बंद केला होता. गुहागर ते रामपूर या टप्प्याचे काम मनीषा कन्स्ट्रक्शनतर्फे सुरू आहे. मोडकाआगर पूल धोकादायक जाहीर केल्याने पुलाच्या पुढील बाजूने रामपूरपर्यंत काम सुरू आहे. यामध्ये मोडकाआगर ते मार्गताम्हानेपर्यंत बहुतांशी काम पूर्ण झाले असून, तीन महिन्यांपूर्वीपासून मार्गताम्हाने ते रामपूरपर्यंतचे काम चालू आहे. मोडकाआगर पुलाचे काम अद्याप पूर्ण केलेले नाही. सध्या पुलाच्या बाजूने मातीचा भराव टाकून वाहतूक सुरू आहे. आता नव्याने मोडकाआगर ते गुहागर न्यायालयापर्यंत या रस्त्याचे पोकलॅनच्या साहाय्याने प्राथमिक टप्प्यातील रुंदीकरणाचे काम सुरू झाले आहे.
.............................
गुहागर ते मोडकाआगर रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम जाेरात सुरू आहे.