कशेडी बोगद्याचे ३०० मीटर लांबीचे काम पूर्ण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 4, 2020 12:24 PM2020-02-04T12:24:10+5:302020-02-04T12:25:17+5:30

मुंबई - गोवा महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या कशेडी - भोगाव बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याच्या एका मार्गिकेचे सुमारे ३०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. पावणे दोन किलोमीटर लांबीचा हा बोगदा दीड वर्षात वाहतुकीला खुला होण्याचे संकेत आहेत.

The work of the Kashedi tunnel completed about 5 meters long | कशेडी बोगद्याचे ३०० मीटर लांबीचे काम पूर्ण

कशेडी बोगद्याचे ३०० मीटर लांबीचे काम पूर्ण

Next
ठळक मुद्देकशेडी बोगद्याचे ३०० मीटर लांबीचे काम पूर्णबोगदा दीड वर्षात वाहतुकीला खुला होण्याचे संकेत

खेड : मुंबई - गोवा महामार्गावरील अवघड कशेडी घाटाला पर्याय म्हणून बांधण्यात येत असलेल्या कशेडी - भोगाव बोगद्याचे काम प्रगतीपथावर आहे. सद्यस्थितीत खेड तालुक्याच्या हद्दीतील कशेडी घाटाच्या पायथ्याशी बोगद्याच्या एका मार्गिकेचे सुमारे ३०० मीटर लांबीचे काम पूर्ण झाले आहे. पावणे दोन किलोमीटर लांबीचा हा बोगदा दीड वर्षात वाहतुकीला खुला होण्याचे संकेत आहेत.

अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई - गोवा महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाने आता वेग घेतला आहे. काही ठिकाणच्या कामांना तांत्रिक अडचणींमुळे ब्रेक लागला असला तरी महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाची गती समाधानकारक आहे. चौपदरीकरणादरम्यान महामार्गावरील अवघड मानल्या जाणाऱ्या कशेडी घाटासाठी पर्यायी बोगदा तयार करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. रिलायन्स इन्फ्रा लिमिटेड, मुंबई या कंपनीने कामाचा ठेका घेतला आहे.

खेड तातुक्यातील कशेडी ते पोलादपूर तालुक्यातील भोगाव दरम्यानचा हा बोगदा तयार करण्यासाठी ७४३.३९ कोटी रुपयांचा निधी मंजूर असून, सद्यस्थितीत खेड बाजूकडून ३०० मीटरपर्यंत बोगद्याचे काम झालेले आहे कामाला सुरुवात झाल्यापासून ३० महिन्यांच्या आता हे काम पूर्ण करायचे असल्याने कामाचा वेग वाढविण्यात आला आहे.

पोलादपूर तालुक्यातील भोगावजवळही कामाला सुरुवात करण्यात आली आहे. कंपनी व्यवस्थापनाने दिलेल्या माहितीनुसार मिळालेल्या मुदतीत काम पूर्ण केले जाणार आहे. कशेडी घाट पोखरून तयार केला जाणारा हा बोगदा रत्नागिरी आणि रायगड जिल्ह्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा ठरणार आहे. शिवाय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामातीत ह्यमाईल स्टोनह्ण ठरणार आहे.

 

Web Title: The work of the Kashedi tunnel completed about 5 meters long

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.