सक्षम महिलांना रिलेशनशिपमध्ये पार्टनरकडून काय हवं असतं?

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2018 01:13 PM2018-08-31T13:13:42+5:302018-08-31T13:14:42+5:30

इतर महिलांच्या तुलनेत सक्षम महिलांचा रिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा असतो. त्यांना रिलेशनशिपमधून काय हवं असतं हे खालीलप्रमाणे सांगता येइल.

12 Things a Strong Woman Wants in a Relationship! | सक्षम महिलांना रिलेशनशिपमध्ये पार्टनरकडून काय हवं असतं?

सक्षम महिलांना रिलेशनशिपमध्ये पार्टनरकडून काय हवं असतं?

googlenewsNext

(Image Credit : www.zoosk.com)

नातं म्हटलं की, प्रत्येकाच्याच वेगवेगळ्या अपेक्षा असतात. काहींना नात्यांमध्ये फार प्रोफेशनलपणा हवा असतो तर काहींना फार प्रेम हवं असतं. एकमेकांना समजून घेणे हा कॉमन मुद्दा असतो. पण व्यक्तीनुसार या गोष्टी बदलतात. इतर महिलांच्या तुलनेत सक्षम महिलांचारिलेशनशिपकडे बघण्याचा दृष्टीकोन फारच वेगळा असतो. त्यांना रिलेशनशिपमधून काय हवं असतं हे खालीलप्रमाणे सांगता येईल. 

१) त्यांना स्वातंत्र्य हवं असतं आणि नात्यापलिकडेही जीवन शोधायचं असतं

सक्षम महिलांना नात्यात असताना किंवा प्रेमात असताना त्यांची ओळख गमवायची नसते. त्यांच्या पार्टनरने त्यांना बदलावं असं त्यांना वाटत नसतं. त्याऐवजी ती आहे तशी तिला स्वीकारावे असं त्यांना वाटत असतं. त्यांना त्यांच्या आवडी-निवडीसाठी वेळ द्यायचा असतो, मित्रमैत्रिणींना भेटायचं असतं, बाहेर जायचं असतं. त्यांना त्यांच्या पार्टनरला लाइफचं सेंटर करायचं नसतं. केवळ नात्यात अडकून पडायचं नसतं. पार्टनरलाच विश्व बनवायचं नसतं. 

२) पार्टनरने प्रामाणिक असावं

या महिला स्वत:ही काही खोटं बोलत नाहीत. त्यामुळे त्यांची अशी अपेक्षा असते की, त्यांच्या पार्टनरनेही प्रामाणिक रहावं. पार्टनरने याबाबत प्रामाणिक रहावे की, त्याला या रिलेशनशिपमधून काय हवंय. हे त्याला क्लिअर असावे नाही तर या नात्यात अनेक अडचणी निर्माण होऊ शकतात. 

३) त्याने विश्वास ठेवावा

ती प्रामाणिक, विश्वासू आणि जबाबदार आहे. त्यामुळे तिला तिच्या पार्टनरने विश्वासू आणि प्रामाणिक असणे अपेक्षित असतं. तिला असं वाटत असतं की, त्यांच्या पार्टनरला हे कळावं की, तिच्याकडे स्वत:चं लाइफ हॅन्डल करण्याची क्षमता आहे. 

४) पार्टनरचा वेळ हवा, गिफ्ट नकोत

अर्थातच महिलांना त्यांच्या पार्टनरने दिलेले गिफ्ट्स आवडतात. पण सक्षम महिलांना हेही माहीत असतं की, पार्टनरच्या वेळेला गिफ्ट हा पर्याय नाहीये. गिफ्ट देण्यापेक्षा तिला पार्टनरने सोबत असावं असं वाटत असतं. त्याचं प्रेम हवं असतं. 

५) सन्मान हवा असतो

जर पार्टनरने तिला सन्मान दिला नाही किंवा तशी वागणूक दिली नाही तर याचा अर्थ त्याचं तिच्यावर प्रेमच नाही. हे तिला माहित असतं त्यामुळे तिला हेच वाटत असतं की, पार्टनरने तिच्या विचारांचा, शरीराचा, आवडी-निवडीचा आणि मतांचा आदर करावा. 

६) खरी जवळीकता समजावी

सक्षम महिलांना हे माहित असतं की, जवळीकता ही केवळ फिजिकल होणे नाहीये. ती एक भावना आहे, दोन विवस्त्र आत्मांचं शेअरींग आहे आणि ते तितक्याच मोकळेपणाने मनाने हवं. हे त्याला कळावं हे त्यांना वाटत असतं. 

७) संवादाचं आणि ऐकून घेण्याचं महत्त्व समजावं

सक्षम महिला कधीही अडचणीकडे दुर्लक्ष करत नाहीत. त्यांना संवादाचं महत्त्व माहीत असतं, ऐकून घेण्याचं महत्त्व माहीत असतं. त्यांना हे माहीत असतं की, मोकळेपणाने, शांतपणे केलेल्या संवादाने रिलेशनशिप आणखी मजबूत होऊ होतं. 

८) त्याच्यात सुसंगतता हवी

पार्टनर सुसंगत असावा असं त्यांना वाटत असतं. रोमान्स हा केवळ हनीमून पुरताच किंवा व्हेकेशन पुरताच मर्यादीत असावा असं त्यांना अजिबात वाटत नाही. त्यांना पार्टनरसोबत एस्सेल वर्ल्डमध्ये रोलर कोस्टरवर राइड करण्यापेक्षा तिला गरज असेल तेव्हा पार्टनरने तिच्यासोबत असावं असं वाटत असतं. खासकरुन कठीण काळात. 

९) त्याने तिला बदलू नये

सक्षम महिलांना वाटत असतं की, पार्टनरने त्या आहे तसा त्यांचा स्वीकार करावा. पार्टनरने त्यांना बदलावं किंवा बदलण्याचा प्रयत्न करावा असे त्यांना वाटत नाही. 

१०) भावनिक परिपक्वता आणि बुद्धीमत्ता

नात्यात असताना किंवा प्रेमात असताना काही बावळट, मजेशीर, लॉजिक नसलेल्या गोष्टी गरज असेल तेव्हा कराव्या लागतात. पण त्यानंतर आपल्या पार्टनरने विचार करुन वागावं, बालिशपणा सोडावा असंही वाटत असतं. निदान गरज असते तेव्हा तरी. त्याच्यात भावनिक परिपक्वता आणि स्मार्टनेस असावा असं त्यांना वाटत असतं. 

११) त्याने केवळ बोलू नये तर करुन दाखवावं

पार्टनरने त्यांच्याकडे यावं, पहिल्यांदा त्यांना टेक्स्ट करावं आणि त्यांच्यासोबत एखादा प्लॅन करावा असं वाटत असतं. पार्टनर गोष्टी बोलून दाखवण्यापेक्षा करुन दाखवाव्या असं त्यांना वाटत असतं. 

१२) नात्यात समर्थन हवं असतं

या महिलांना नात्यात समर्थन हवं असतं. जेव्हाही त्या प्रॅक्टीकल किंवा भावनिक विचार करत असतील तेव्हा त्याने तिला साथ द्यावी असं वाटत असतं. सकारात्मकपणे छोटासा आधार द्यावा. 

Web Title: 12 Things a Strong Woman Wants in a Relationship!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.