तुम्ही रिलेशनशिपमध्ये आहात की सिंगल आहात? तुमचं लग्न झालं आहे की नाही? नवीन वर्षात तुमच्या रिलेशनशिप स्टेटसमध्ये कसा बदल घडून येईल? तुम्हाला कोणी जोडीदार मिळेल की नाही? यांसारखे अनेक प्रश्न तुमच्या मनात गोंधळ घालत असतील. त्याचबरोबर तुम्हाला आधीपासूनच तुमचा जोडीदार मिळाला असेल किंवा तुमचं लग्न झालं असेल तर हे नवीन वर्ष तुमच्यासाठी काय खास घेऊन आलं आहे? याची उत्सुकता असेलच. ज्योतिषशास्त्राच्या मदतीने आम्ही तुम्हाला तुमचे प्रश्न सोडवण्यासाठी मदत करणार आहोत. 2019मध्ये बारा राशिंच्या व्यक्तींच्या जीवनात प्रेम, लग्न याबाबत काय नव्या गोष्टी घडणार त्याबाबत....
मेष रास
2019मध्ये मेष राशीच्या व्यक्तींच्या लव्ह लाइफमध्ये काही खास बदल घडून येणार नाहीत. अनेक चढ-उतारांचा सामना करावा लागू शकतो. जास्त अहंकार नात्यामध्ये दुरावा निर्माण करू शकतो. पार्टनरसोबत खटके उडू शकतात. यावर नियंत्रण मिळवण्यासाठी प्रेमामध्ये अहंकाराला जागा देऊ नका. नातं टिकवून ठेवण्यासाठी आणि आनंदी राहण्यासाठी तुम्हाला नात्यामध्ये शक्य तेवढा पारदर्शिपणा आणावा लागेल.
वृषभ रास
नव्या वर्षात तुमच्या लव्ह लाइफमध्ये काही साधारण परिणाम दिसून येतील. वर्षाच्या सुरुवातीला तुम्हाला काही खास बदल दिसणार नाहीत. परंतु त्यानंतर मात्र समस्यांचा सामना करावा लागू शकतो. छोट्या-छोट्या गोष्टींवरून पार्टनरसोबत भांडणं होऊ शकतात. त्यामुळे प्रयत्न करा की, परिस्थिती हाताबाहेर तर जाणार नाही ना.
मिथुन रास
लव्ह लाइफसाठी मिथुन राशीच्या लोकांना हे वर्ष फार खास असणार आहे. तुम्हाला पार्टनरसोबत अधिकाधिक वेळ घालवण्यासाठी अनेक संधी उपलब्ध होतील. यादरम्यान तुमच्या पार्टनरसोबत घालवलेला वेळ फार सुंदर असेल. जर तुमच्यामध्ये आधीपासूनच एखाद्या गोष्टीवरून खटके उडत असतील तर टेन्शन घेऊ नका. एप्रिलनंतर तुमच्यातील प्रेम वाढून तुमचं नातं आणखी मजबूत होण्यास मदत होईल. अशातच तुम्हाला अजून तुमचा पार्टनर मिळाला नसेल तर निश्चिंत व्हा. ऑगस्टपर्यंत तुमची ही चिंतादेखील दूर होईल.
कर्क रास
वर्ष 2019मध्ये कर्क राशीच्या व्यक्तींचं लव्ह लाइफ फार सुंदर असेल. काही अशा आठवणी तुमच्या गाठिशी बांधू शकता, ज्यांच्यामुळे तुमच्या चेहऱ्यावर नकळत हसू उमटेल. जर तुम्ही अद्यापही सिंगल असाल तर या वर्षात एक नवं नातं तुमची वाट पाहत आहे. ज्या व्यक्ती आधीपासूनच रिलेशनमध्ये आहेत त्यांचं नातं आणखी खुलण्यास मदत होईल. वर्षाच्या मध्यावर दोघांमध्ये काही गोष्टींवरून खटके उडू शकतात. परंतु एकमेकांना थोडसं समजून घेतल्यानंतर सर्व रूसवे फुगवे दूर होण्यास मदत होईल.
सिंह रास
नव्या वर्षामध्ये तुम्हाला अनेक आव्हानांचा सामना करावा लागेल. त्यामुळे संयम ठेवून पावलं उचला. पार्टनरसोबत कोणत्याही गोष्टीवरून वाद घालू नका. भांडण झालचं तर वेळीच समजून भांडण मिटवा. नात्यामध्ये पारदर्शीपणा ठेवा.
कन्या रास
2019मध्ये तुमच्या लव्ह लाइफसंदर्भात कोणताही बदल पाहायला मिळणार नाही. काही चढ-उतार येतील परंतु, या परिस्थितीचा अनुभव तुम्ही आधीच घेतला असेल. त्यामुळे या वर्षी जास्त अपेक्षा ठेवू नका.
तुळ रास
तुळ राशीच्या व्यक्तींसाठी त्यांची लव्ह लाइफ फार सुंदर असणार आहे. यावर्षी तपार्टनरसोबत रोमांस करण्याच्या अनेक संधी तुम्हाला मिळतील. जर तुम्ही सिंगल असाल तर यावर्षी एखाद्या नव्या नात्याची सुरुवात होण्याची शक्यता आहे. जर तुम्ही आधीपासूनच रिलेशनमध्ये असाल तर तुम्ही लवकरच लग्नबंधनात अडकण्याची शक्यता आहे. वर्षाच्या मध्यावर अनेक आनंदाच्या गोष्टी तुमच्यासाठी वाट पाहत आहेत.
वृश्चिक रास
वृश्चिक राशीच्या लोकांच्या लव्ह लाइफसाठी हे वर्ष आनंदाने परिपूर्ण असेल. पार्टनरसोबत वेळ घालवण्यासाठी फार संधी मिळतील. यादरम्यान रिलेशनशिप अधिक मजबूत झाल्याचे दिसून येईल. जर नात्यामध्ये काही समस्या असतील तर त्यादेखील दूर होतील.
धनु रास
धनु राशीच्या व्यक्तींची लव्ह लाइफ साधारण असेल. रिलेशनशिपमधील काही गोष्टींबाबत तुम्ही जास्तच गंभीर असाल. रिलेशनमधील समस्या दूर करण्यासाठी सतत प्रयत्न करावे लागतील. एकाद्या गोष्टीवरून भांडण झालं तर पार्टनरसोबत चर्चा करून सोडवण्याचा प्रयत्न करा.
मकर रास
मकर राशीच्या लोकांसाठी हे वर्ष फार आनंददायी असेल. यांची लव्ह लाइफ फार सुंदर असेल. यावर्षी तुम्ही तुमच्या लव्ह पार्टनरला तुमचा लाइफ पार्टनर बनवू शकता. यामध्य तुमचे कुटुंबियही तुमच्यासोबत असतील.
कुंभ रास
कुंभ राशीच्या लोकांसाठी त्यांची लव्ह लाइफ यावर्षी फार सुंदर असेल. वर्षाच्या सुरुवातीच्या महिन्यांमध्ये अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. परंतु मार्च महिन्यानंतर परिस्थितीत सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवणं गरजेचं आहे.
मीन रास
सर्वात शेवटची रास म्हणजे मीन. यांच्या लव्ह लाइफबाबत सांगायचे झाले तर त्यांना फार सावध राहावं लागेल. या व्यक्तींना प्रेमामध्ये सतत धोका मिळू शकतो. पार्टनरवर सतत शंका घेऊ शकता. अशातच तुमच्या प्रेमावर विश्वास ठेवा आणि कोणताही निर्णय घेण्याआधी विचारपूर्वक घ्या.