७ इशारे जे सांगतात तो तुमच्याशी फ्लर्ट करतोय!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2019 03:39 PM2019-03-01T15:39:50+5:302019-03-01T15:50:26+5:30
कुणाचं लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला सांगण्यासाठी की, 'मला तुझ्यात इंटरेस्ट आहे' अनेकजण फ्लर्टिंगचा आधार घेतात.
(Image Credit : herbeauty.co)
कुणाचं लक्ष आपल्याकडे वळवण्यासाठी किंवा त्या व्यक्तीला सांगण्यासाठी की, 'मला तुझ्यात इंटरेस्ट आहे' अनेकजण फ्लर्टिंगचा आधार घेतात. तसं तर फ्लर्ट करणाऱ्या व्यक्तीचं वागणं असंकाही असतं की, तुमच्यासोबतच तुमच्या आजूबाजूच्या लोकांनाही कळेल की, तो तुमच्याशी फ्लर्ट करतोय. पण कधी कधी काही लोकांचं असं वागणं किंवा फ्लर्ट करणं कळूनच येत नाही. त्यामुळे आम्ही तुम्हाला फ्लर्टिंगचे ७ संकेत सांगणार आहोत, ज्याद्वारे तुम्हीही ओळखू शकाल की, तो किंवा ती तुमच्याशी फ्लर्ट करत आहेत.
सतत सिंगल असण्यावर जोर देणं
जेव्हा समोरची व्यक्ती पुन्हा पुन्हा त्याच्या सिंगल स्टेटसचं शो ऑफ करत असेल तर समजून घ्या की, तो फ्लर्ट करतोय. खरंतर 'मी सिंगल आहे, तू डेटला चलशील का?' असं त्याला विचारायचं असतं.
अचानक स्पर्श करणे
(Image Credit : Craft of Charisma)
म्हणजे बघा ना चालता चालता हाताचा धक्का लागणे, हा वेगळी स्पर्श असतो. फ्लर्ट करणाऱ्यांचा स्पर्श हा वेगळा असतो, त्यात फिलिंग असतात. तुमचं लक्ष वेधण्यासाठीचा हा स्पर्श असतो.
पर्सनल स्पेसचं लक्ष न ठेवणे
जेव्हा तुमच्या पर्सनल स्पेसचा विचार न करता जर एखादी व्यक्ती आजूबाजूला गिरक्या घेत असेल तर अस्वस्थ होऊ नका. हे बघा की, तो तुम्हाला काही सांगण्याचा तर प्रयत्न करत नाहीये ना.
बॉडी लॅंग्वेज
(Image Credit : pride.com)
अनेक लोक असे असतात जे शब्दात तर काही बोलत नाहीत, पण त्यांचं शरीर खूपकाही सांगून जातं. तुमच्याशी बोलत असताना त्याच्या हालचालीवर लक्ष द्या, तुम्हाला कळून येईल की, तुमच्यात इंटरेस्टेड आहे.
सोशल मीडिया
सोशल मीडियात त्याच्या वागण्यावरूनही तुम्हाला हे कळू शकतं की, तो तुमच्याविषयी काय विचार करतो. जर तो तुम्हाला सतत तुम्हाला आनंद होणाऱ्या पोस्ट्समध्ये टॅक करत असेल तर त्याचा इशारा समजून घ्या. तसेच त्याच्या तुमच्या पोस्टवरील कमेंटही निरखून बघा.
नेहमी चिडवणे
(Image Credit : Womanitely)
हे जरा विचित्रच आहे पण अनेक लोक फ्लर्ट करण्यासाठी ही पद्धत सुद्धा वापरतात. असं करून तुम्ही त्याच्याविषयी काय विचार करता हे जाणून घेण्याचा प्रयत्न असतो. म्हणजे पुढच्यावेळी जर तो तुम्हाला चिडवत असेल तर त्याच्या डोळ्यात बघा.
डोळ्यांची भाषा
(Image Credit :Catholic Match)
तुमच्याकडे बघण्यासोबतच, तुम्ही हसत असतानाही तो तुम्हालाच बघतो का? सर्व मित्रांमध्ये उभे असतानाही तो तुम्हालाच बघत असेल तर समजून घ्या त्याच्या मनात काय सुरू आहे.