आपल्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताय? वेळीच सावध व्हा!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2018 12:05 PM2018-09-05T12:05:20+5:302018-09-05T13:50:32+5:30
सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट्सचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. त्यावर आपले फोटो, व्हिडीओ सर्रास आपण शेअर करतो.
सध्या वेगवेगळ्या सोशल मीडिया साइट्सचा वापर आपण वेगवेगळ्या कारणांसाठी करतो. त्यावर आपले फोटो, व्हिडीओ सर्रास आपण शेअर करतो. अनेकदा तर आपल्या लहान मुलांचे फोटो आणि व्हिडीओही आपण फेसबुकवर सर्रास शेअर करतो. पण एका संशोधनातून असं सिद्ध झालं आहे की, आपल्या लहान मुलांची माहिती सोशल मीडियावर शेअर करणं हे फार घातक ठरू शकतं.
ग्लोबल सायबर सिक्युरिटी फर्म McAfee ने काही दिवसांपूर्वी एक सर्वे केला. यातून असा खुलासा करण्यात आला की, भारतातील अनेक आई-वडील आपल्या मुलांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात.
या संशोधनाला 'द एज ऑफ कंसेन्ट' असं नाव देण्यात आलं आहे. सर्वेमध्ये असं सांगण्यात आलं आहे की, भारतातील जवळपास 40.5% पालक दररोज आपल्या मुलाचा एकतरी फोटो किंवा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर करत असतात. उर्वरित 36% पालक आठवड्यातून एकदा तरी असं करतात.
हैराण करणारी गोष्ट म्हणजे 76% पालकांना या गोष्टीची जाणीव आहे की, त्यांच्या मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर केल्याने त्यांना नुकसान पोहोचू शकतं. पण तरिसुद्धा ते असं करणं थांबवत नाहीत.
हा प्रकार मोठ्या शहरांमध्ये फार दिसून येतो. या संदर्भात मुंबईमधील काही पालकांशी संवाद साधण्यात आला 66.5% पालकांचं असं म्हणणं आहे की, त्यांना आपल्या मुलांचे फोटो किंवा व्हिडीओ शेअर करण्याआधी कोणत्यातरी तिसऱ्या व्यक्तिचा सल्ला घेणं बंधनकारक आहे. मुंबई आणि दिल्ली फोटो शेअर करण्यामध्ये दुसऱ्या नंबरवर आहेत तर बंगळूरु तिसऱ्या क्रमांकावर आहे.
सर्वेमध्ये सहभागी असलेल्या 67% पालकांनी ही गोष्ट मान्य केली की, स्कूल यूनिफॉर्ममध्ये मुलांचे फोटो सोशल मीडियावर शेअर करण्यामध्ये फार धोका आहे. यामुळे मुलांबाबत माहिती मिळण्यास मदत होते. या सर्वेमधून आणखी एक गोष्ट समोर आली आहे की, मुलांचे फोटो आणि व्हिडीओ शेअर करण्यामध्ये आईपेक्षा वडिलांचं प्रमाण अधिक आहे.
याबाबत McAfee च्या संशोधकांनी सांगितले की, जेव्हाही तुम्ही फोटो पोस्ट करता त्यावेळी जास्तीत जास्त लोकं सोशल मीडिया यूजर्सचे लोकेशन ट्रेस करू लागतात. त्यामुळे नेहमी फोटो पोस्ट करताना आपलं लोकेशन ऑफ करण्याची काळजी घ्या. त्याचबरोबर आपल्या मुलांचे फोटो पोस्ट करताना आपल्या मित्रमंडळींसोबत किंवा नातेवाईकंसोबच शेअर करा.