काय सांगता? 'या' चुकीच्या सवयींमुळे प्रेम होणार आणखी मजबूत!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 28, 2019 12:39 PM2019-02-28T12:39:59+5:302019-02-28T12:41:04+5:30
नातं म्हटलं की छोट्या-मोठ्या कुरबुरी आल्याच. ते म्हणतात ना भांड्याला भांड लागलं की, आवाज येणारच.
(Image Credit : jonathanvanviegen.com)
नातं म्हटलं की छोट्या-मोठ्या कुरबुरी आल्याच. ते म्हणतात ना भांड्याला भांड लागलं की, आवाज येणारच. तसं रिलेशनशिपमध्ये नातं सतत आनंदी ठेवणं किंवा कोणतेही वाद होऊ न देणं ही फारच कठीण बाब आहे. सामान्यपणे असं होतं की, पार्टनरला खूश ठेवण्यासाठी अनेकजण त्यांच्या वाईट सवयी लपवण्याचा प्रयत्न करतात. पण तुम्हाला हे वाचून आश्चर्य वाटेल की, आपल्या अशा सवयीच अनेकदा नातं आणखी मजबूत करण्यास फायदेशीर ठरतात.
एका रिसर्चनुसार, डेटिंगमध्ये लोक शारीरिक बनावटीला महत्त्व नक्कीच देतात, पण त्यांचं नातं एकमेकांच्या सवयींमुळे मजबूत होतं. अनेकदा वाईट म्हटल्या जाणाऱ्या सवयींमुळेच नातं मजबूत होतं. चला जाणून घेऊ कोणत्या आहेत त्या सवयी...
पार्टनर आजारी असेल तर...
तुमच्यासमोर सतत खोकलणे किंवा शिंकणे यामुळे तुमच्या पार्टनरला अवडल्यासारखं वाटू शकतं. पण तुमच्याकडे तुमचं प्रेम दाखवण्याची हीच योग्य वेळ आहे. पार्टनर आजारी असल्यावर तुम्ही त्याच्याशी किंवा तिच्याशी कसं वागता याचा तुमच्या नात्यावर फार प्रभाव पडतो. पार्टनरला आराम मिळावा म्हणून तुम्ही काही करता का? किंवा केवळ त्यांची आजारातून बरं होण्याची वाट बघता? किंवा तुम्ही आजाराबाबत काहीना काही सल्ला देऊन त्यांना इरिटेड करता?
नेहमी वाईट नसतो घाम
वर्कआउटनंतर लगेच तुम्ही तुमच्या पार्टनरला मिठी मारण्याचं टाळत असाल. पण कधी हे ट्राय करून बघा. घामासोबत निघणारे फीरोमोन्स तुमच्या शरीराला एक वेगळ्याप्रकारचा सुगंध देतात. अनेकदा हा सुगंध महिलांना आकर्षक वाटतो.
जसे आहात तसेच रहा
तुम्ही तुमच्या पार्टनरसमोर डकार देऊ शकता? असा विचार करूनच अनेकांना मळमळ व्हायला लागली असेल. पण मुळात तुम्ही जसे आहात तसेच पार्टनरसोबत राहिलात तर हे नात्यासाठी अधिक चांगलं असतं. उगाच समोरच्याला काय वाटेल याचा विचार करून तुमच्यात बदल करण्याची काहीच गरज नाही.