(Image Credit : Pulse.ng)
काही लोक असेही असतात ज्यांचं एखाद्या मुलीला पाहिल्या पाहिल्या तिच्यावर प्रेम जडतं. तर काही लोक असेही असतात जे मुलींना अजिबातच समजू शकत नाही. हे लोक प्रत्येक मुलीत कहीना काही कमतरता शोधत असतात. मुलींच्या अशा काही सवयी किंवा अदा असतात ज्यांच्यामुळे मुलं त्या मुलींपासून दूर पळतात. काही निरीक्षणांवरुन या गोष्टी समोर आल्या आहेत.
१) अॅटीट्यूड
काही मुलांना जास्त अॅटीट्यूड असलेल्या मुली अजिबात आवडत नाही. अॅटीट्यूड असावा पण जास्त असू नये. ज्या मुली मुलांना पाहून खूप भाव खातता त्या मुली काही मुलांना पसंत नसतात.
२) फॅमिली ड्रामा
काही मुलींना आपल्या परिवाराबाबत वेगवेगळ्या गोष्टी सांगण्यात फारच इंटरेस्ट असतो. जसेही माझ्या काकूच्या भावाचा मेहुणा कॅनडाला सेटल झालाय इत्यादी. खरंतर तुम्ही जर एखाद्या व्यक्तीसोबत डेटला गेले असाल तर तुमच्या सोबत असलेल्या व्यक्तीला तुमच्याशी प्रेमाच्या गोष्टी करायच्या असतील याचा विचार करायला हवा. तुम्ही जर त्याच्यासमोर चालतं फिरतं न्यूज चॅनल होऊन बसाल तर तो पळेलच ना. परिवाराच्या गोष्टी सांगणं चुकीचं नाहीये. पण त्याची एक सीमा असावी.
३) तुझ्या नावाची मेहंदी
काही मुली या प्रेमाच्या नात्याला चार दिवसच झाले असताना बॉयफ्रेन्डकडे लग्नाचा तगादा लावतात. आधी एकमेकांना जाणून घ्या, विचार करा, सोबत वेळ घालवा मग लग्नाचा विचार करा. लगेच लग्नासाठी त्याच्या डोक्यावर बसाल तर तो पळेलच ना!
4) रडूबाई
काही मुलींना छोट्या छोट्या गोष्टींवर रडण्याची सवय असते. थोडं जरी काही झालं तरी त्यांच्या डोळ्यातून गंगा-जमूना वाहू लागतात. सतत रडणाऱ्या मुलींना मुलं इरिटेड होतात. रडण्यासारखं खरंच काही झालं असेल किंवा काही कारण असेल तर ठिक आहे पण उगाच हे होत असेल तर कठिण आहे.
५) मेकअपचं दुकान
काही मुलींसाठी मेकअप करणे जीव की प्राण असतो. काहींना मेकअप करणं फारच आवडतं त्यामुळे त्या आपल्या पर्समध्ये मेकअपचे प्रॉडक्ट घेऊन फिरतात. जशी आणि जिथेही संधी मिळेल तिथे त्या मेकअपला सुरुवात करतात. मुलींनी सुंदर दिसावं असं मुलांनाही वाटत असतं पण प्रमाणापेक्षा जास्त मेकअप करणाऱ्या मुली काही मुलांना आवडत नाहीत.
६) सेल्फी आजार झालेल्या
गेल्या काही महिन्यांमध्ये सेल्फीची क्रेझ प्रमाणापेक्षा जास्त वाढली आहे. एखाद्या गोष्टीचा आनंद घेण्यापेक्षा त्या गोष्टीचे फोटो काढणे किंवा ती गोष्ट बघण्यापेक्षा त्यासोबत फोटो काढणे यावर काहींचा भर असतो. आता बील काऊंटर ही काय सेल्फी काढायची जागा आहे का?
7) रोब झाडणाऱ्या
अनेक मुलींना आपल्या बॉयफ्रेन्डवर रोब झाडण्याची सवय असते. त्या सतत त्याला हे नको करु, ते नको करु असा तगादा लावत असतात. मुलांना हे आवडत नाही. त्यामुळे अशा मुलींपासून मुलं दूर राहतात.