ब्रेकअप झाल्यावर हृदयाच्या गंभीर आजाराचा धोका का वाढतो?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 3, 2019 12:32 PM2019-01-03T12:32:22+5:302019-01-03T12:38:45+5:30
हार्ट ब्रेक होणे किंवा ब्रेकअप होणे अनेकदा किती धोकादायक असू शकतं हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल किंवा अनुभवलं असेल.
हार्ट ब्रेक होणे किंवा ब्रेकअप होणे अनेकदा किती धोकादायक असू शकतं हे तुम्ही अनेकदा पाहिलं असेल किंवा अनुभवलं असेल. ब्रेकअप झाल्यावर फार तणावाची स्थिती निर्माण होते त्याला ब्रोकन हार्ट सिंड्रोम म्हटलं जातं. एका शोधात असं सांगण्यात आलं आहे की, ब्रेकअप झाल्याचा किंवा प्रेमात मन दुखल्याचा प्रभाव फार जास्त काळ राहिला तर हार्ट अटॅक येण्याचा धोका अधिक वाढतो.
तज्ज्ञांनुसार, वेगवेगळ्या हृदयरोगांचं एक मोठं कारण ब्रोकन हार्ट सिंड्रोम (Broken heart syndrome) सुद्धा आहे. एखाद्या व्यक्तीप्रति मनाची विशेष जवळीक असणं आणि नंतर त्या व्यक्तीसोबत ब्रेकअप होणं मनावर फार मोठा वाईट प्रभाव करुन जातं. याचं मुख्य कारण भावनिक तणाव मानलं जातं.
जास्तीत जास्त प्रकरणांमध्ये ब्रोकन हार्ट सिंड्रोम महिलांमध्ये बघायला मिळतो. यामुळे हृदयात एक विशेष प्रकारची आकृती तयार होते. काही रिपोर्ट्समध्ये असं सांगण्यात आलं आहे की, याचा आकार जपानमध्ये आढळणाऱ्या ऑक्टोपॉससारखा असतो.
घटस्फोट, प्रेमात दगा, एखाद्या जवळ्याचा मृत्यू किंवा जोडीदारासोबत कोणत्या प्रकारचं भांडण याचं मुख्य कारण मानले जातात. या सर्वच घटनांचा महिलांवर जास्त प्रभाव बघायला मिळतो. ब्रिटीश हार्ट फाऊंडेशनच्या रिसर्चनुसार, या आजारामुळे लोकांचा मृत्यू होण्याचं एक मोठं कारण म्हणजे मसल्समध्ये कमजोरी असणे आहे. या रिसर्चमध्ये ५२ ब्रोकन हार्ट सिंड्रोमने पीडित रुग्णांना ४ महिने निरीक्षणात ठेवण्यात आलं होतं.
ब्रोकन हार्ट सिंड्रोमबाबत सध्या वेगवेगळे रिसर्च सुरु आहेत. पण यापासून होणाऱ्या हृदयरोगांच्या समस्येपासून बचाव करण्यासाठी काही उपाय केले जाऊ शकतात.
ब्रेकअप झाल्यावर काय करावे?
ब्रेकअप झाल्यावर पार्टनरपासून दूर जा आणि परिवार-मित्रांसोबत जास्तीत जास्त वेळ घालवण्याचा प्रयत्न करा. त्यांचं प्रेम तुम्हाला यातून बाहेर येण्यासाठी औषधासारखं काम करेल.
तुमच्या पार्टनरशी निगडीत आठवणी विसरण्यातच भलाई आहे. कारण असे केल्यानेच तुम्ही यातून वेळीच बाहेर येऊ शकाल.
करिअर आणि अभ्यासाला प्राथमिकता द्या. याने तुमचं मन दुसऱ्या कामात व्यस्त राहिल आणि तुम्हाला ब्रेकअपमधून बाहेर येण्यास मदत होईल.
स्वत:साठी पूर्ण वेळ द्या आणि तुमच्या आवडीची प्रत्येक गोष्ट पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. पुस्तके वाचा, शॉपिंग करा, म्युझिक शिका इत्यादी इत्यादी.
तुमच्या आजूबाजूला एक सकारात्मक वातावरण राहिल याची काळजी घ्या. नकारात्मक लोकांपासून दूर राहण्याचा प्रयत्न करा.