पहिल्या भेटीत 'या' चुका केल्यास नातं सुरु होण्याआधीच तुटेल!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2018 01:07 PM2018-11-26T13:07:21+5:302018-11-26T13:08:52+5:30
पहिल्या भेटीचा किंवा डेटचा अनुभव हा प्रत्येकासाठीच खास असतो. जास्तीत जास्त कपल्स हे पहिल्या भेटीवेळी घाबरलेले असतात.
(Image Credit : generationm.be)
पहिल्या भेटीचा किंवा डेटचा अनुभव हा प्रत्येकासाठीच खास असतो. जास्तीत जास्त कपल्स हे पहिल्या भेटीवेळी घाबरलेले असतात. जास्त उत्साही असतात, त्यामुळे त्यांच्याकडून वेगवेगळ्या चुका होता. या चुका भलेही सामान्य आणि नकळत झालेल्या असतील तरीही याने नातं सुरु होण्याआधीच अडचणीत येऊ शकतं. चला जाणून घेऊ या आहेत किंवा असू शकतात या चुका...
काही खरं काही खोटं
नेहमी कपल्स आपल्याबाबत बोलताना काही खोट्या गोष्टी सांगतात. कारण त्यांना समोरच्या व्यक्तीवर इम्प्रेशन जमवायचं असतं. पण हे खोटं त्यांना चांगलंच महागात पडू शकतं. अशात आपल्या भूतकाळाबाबत पाटर्नरसोबत स्पष्टपणे सांगायला हवं. खासकरुन तुमच्या आधीच्या नात्याबाबत स्पष्टपणे सांगा जेणेकरुन नंतर ते उघड झाल्यावर महागात पडू नये. पण हे सांगण्याआधी पार्टनरचा स्वभाव जाणून घ्या. जर समोरची व्यक्ती समजून घेणारी नसेल किंवा संशय घेणारी असेल तर काही सांगताना काळजी घ्यावी.
वाढीव गोष्टी
जसे आधी सांगितले की, कपल्स पहिल्या भेटीत एकमेकांना इम्प्रेस करण्यासाठी आपल्याबाबत अनेक गोष्टी वाढवून किंवा खोट्या सांगतात. पण ते हे विसरतात की, समोरच्या व्यक्तीला पुढे जाऊन सत्य काय आहे हे कळणारच आहे. त्यावेळी तुमच्यावरील त्या व्यक्तीचा विश्वास तुटू शकतो.
जास्त मोकळेपणा
पहिल्या भेटीत अनेकजण फार जास्त मोकळेपणा दाखवतात. त्यामुळे तसं न करता पहिल्या भेटीत एकमेकांची पसंत-नापसंत याबाबत बोला. पहिल्या भेटीतच मुलीच्या फार जास्त जवळ जाण्याच प्रयत्न करु नका. त्याऐवजी मुलीच्या मनातील गोष्टी जाणून घेण्याचा प्रयत्न करा. तसेच मुलीचं कौतुक करणे विसरु नका. तसेच हे करताना मुलीसमोर जास्त स्टाइम मारु नका. याने तुमची नकारात्मक प्रतिमा तिच्या मनात तयार होऊ शकते.
बोलण्याकडे दुर्लक्ष करणे
अनेकदा भीतीमुळे किंवा स्वभावामुळे काही लोक हे आपल्या पार्टनरच्या बोलण्याकडे लक्ष न देता इकडे तिकडे बघतात. याने तुमचं चुकीचं इम्प्रेशन पडतं. त्यामुळे जेव्हाही पार्टनर काही बोलत असेल किंवा महत्त्वाचं सांगत असेल तर त्यांच्या बोलण्याकडे लक्ष द्यावं.
फार जास्त पर्सनल होऊ नका
पहिल्या भेटीत साध्या-सोप्या गोष्टींनी बोलण्याची सुरुवात करावी. फार जास्त जड वैचारिक गोष्टी कराल तर तुमचं काम बिघडू शकतं. किंवा तुम्ही समोरच्या व्यक्तीची मुलाखत घेत आहात असही त्याला किंवा तिला वाटू नये. तुमच्या आवडी-निवडी यावर बोलणं केलं तर फायद्याचं ठरेल.