शहरं
Join us  
Trending Stories
1
PM नरेंद्र मोदींच्या महाराष्ट्रात १० प्रचारसभा; भाजपासह महायुतीचे किती उमेदवार विजयी झाले?
2
महाराष्ट्रात ओवेसींचं '15 मिनिट'चं राजकारण 'फुस्स'; AIMIM चे 16 पैकी 15 उमेदवार पराभूत
3
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results Highlights : बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण ते नवाब मलिक...; या 17 मोठ्या नेत्यांना चाखावी लागली पराभवाची धूळ...!
4
'माझे परममित्र देवेंद्रजी फडणवीस...', दणदणीत विजयानंतर PM मोदींनी केले अभिनंदन
5
मुस्लिमबहुल मतदारसंघात भाजपचा हिंदू शिलेदार विजयी; विरोधात 11 मुस्लिम उमेदवार...
6
Maharashtra Vidhan Sabha Election Result 2024 Live: नांदेड पोटनिवडणुकीत अखेर काँग्रेसचा विजय; रविंद्र चव्हाण यांचा १४५७ मतांनी विजय
7
काही लोकांनी दगाफटका करून अस्थिरता निर्माण केली, पण महाराष्ट्राने शिक्षा दिली; मोदींचा घणाघात
8
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: “जनतेचाही विश्वास बसलेला नाही, विधानसभा निकाल अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्वीकार्ह”: काँग्रेस
9
ओवेसींच्या AIMIM ने महाराष्ट्रात खाते उघडले, 'हा' उमेदवार अवघ्या 75 मतांनी विजयी...
10
महायुतीच्या विजयाने बिहारच्या आगामी निवडणुकीची पायाभरणी केली- चिराग पासवान
11
साकोलीत काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा २०८ मतांनी निसटता विजय
12
Sharad Pawar: शरद पवारांच्या बालेकिल्ल्याला सुरुंग; पुणे जिल्ह्यात अवघ्या एका जागेवर तुतारी वाजली, दिग्गज पराभूत!
13
डमी उमेदवारामुळे रोहित पवारांची सीट आलेली धोक्यात; अखेर कर्जत-जामखेडचा निकाल जाहीर...
14
राज ठाकरेंमुळे आदित्य ठाकरेंची आमदारकी वाचली; गेल्यावेळी थेट पाठिंबा, यावेळी...
15
Maharashtra Assembly Vidhan Sabha Election 2024 Result Highlights: महायुतीची त्सुनामी, मविआसह मनसेलाही तडाखा; राज ठाकरेंचे एकाच वाक्यात भाष्य, म्हणाले...
16
एकनाथ शिंदे भाजपसमोर मुख्यमंत्रीपदाची मागणी करणार? 'हे' 5 मुद्दे महत्वाचे ठरणार...
17
शपथविधीचे ठिकाण ठरले? राजभवनावर होणार नाही, पुन्हा वानखेडेवर भव्यदिव्य करण्याच्या हालचाली
18
Dahanu Vidhan Sabha Election Result 2024 Live : भगव्या वादळात फडकले लाल निशाण, डहाणूत माकपचे विनोद निकोले विजयी
19
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Results : "निकाल येतील जातील...; तुमचा 'राजूदादा' ही हाक आयुष्यात कमावलेली सर्वात मोठी संपत्ती"

पार्टनरसोबत हसणे-गंमत करणे असं ठरतं फायदेशीर, जाणून घ्या कसं?

By ऑनलाइन लोकमत | Published: January 21, 2019 3:26 PM

तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत गमती-जमती आणि छेडछाड करण्याच्या मूडमध्ये असता? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे.

(Image Credit : relationships.femalefirst.co.uk)

तुम्हीही तुमच्या पार्टनरसोबत गमती-जमती आणि छेडछाड करण्याच्या मूडमध्ये असता? जर तुमचं उत्तर हो असेल तर तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे कपल्स एकमेकांसोबत गमती-जमती करतात, लाइट मूडमध्ये एकमेकांची गंमत करतात, ते फार जास्त काळ सोबत राहण्याची शक्यता असते. म्हणजे अशा कपल्सचं नातं इतरांच्या तुलनेत अधिक जास्त काळ मजबूत राहतं. 

हसण्याचा अर्थ खिल्ली उडवणे नाही

या गमती-जमती करण्याचा अर्थ म्हणजे पार्टनरची खिल्ली उडवणे नाही. रिसर्चमध्ये हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, जे जोक्स केवळ दोन व्यक्तींमध्येच होऊ शकतात आणि ज्यांचा उद्देश केवळ हसणे हा असतो, या जोक्सच्या माध्यमातून नातं अधिक मजबूत होतं. पण जे कपल्स एकमेकांसोबत अश्लिल गंमत करतात किंवा एकमेकांना चिडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं नातं जास्त काळ चालत नाही. कारण याप्रकारच्या जोक्सवरून असं दिसतं की, तुमच्या नात्यात काही तरी चुक आहे. 

रोमान्ससोबत सेन्स ऑफ ह्यूमर गरजेचा

अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कन्सासचे प्राध्यापक जेफ्री हॉल सांगतात की, 'रोमॅंटिक पार्टनर्समध्ये हसणं, एकमेकांची गंमत करणं गरजेचं असतं. कारण याने त्यांच्या नात्यात बॉंडिंग मजबूत होते. तसेच नात्यात सुरक्षेची भावनाही तयार होते. इतकेच नाही तर जेव्हा तुम्ही पार्टनरसोबत आनंद शेअर करता तेव्हा दोघांमधील रोमॅंटिक अट्रॅक्शनही वाढतं'.

रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये ह्यूमर किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १ लाख ५० हजार लोकांचा अभ्यास केला. पर्सनल रिलेशनशिप नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, जे कपल्स एकत्र गंमत करतात, किंवा ज्या जोक्सचा उद्देश केवळ हसवणे आहे असे जोक्स सांगतात, यातून एकमेकांना चिडवणे किंवा कमीपणा दाखवणे हा उद्देश नसेल तर अशा कपल्सचं नातं जास्त काळ टिकून राहतं. 

असा सेन्स ऑफ ह्यूमर नुकसानकारक

अशाप्रकारे गंमती-जमती करण्याचा अर्थ असा नाही की, गरजेपेक्षा जास्त ह्यूमर नात्यात आणावा. जर तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर फार जास्त आक्रामक असेल तर हेही तुमच्या नात्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तुमच्या नात्यावर याचा वाईट प्रभाव पडू शकतो. 

टॅग्स :Relationship TipsरिलेशनशिपPersonalityव्यक्तिमत्व