ज्या मुली वडिलांच्या अधिक जवळ असतात त्यांच्यात असते ही खासियत!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 04:00 PM2018-09-26T16:00:27+5:302018-09-26T16:01:45+5:30

जर तुम्हीही एका मुलीचे वडील असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. एका रिसर्चनुसार, वडिलाचं मुलीसोबतचं चांगलं नातं मुलींना एकटेपणातून बाहेर येण्यास मदत करतं.

Daughters who have close relation with father fight better with loneliness | ज्या मुली वडिलांच्या अधिक जवळ असतात त्यांच्यात असते ही खासियत!

ज्या मुली वडिलांच्या अधिक जवळ असतात त्यांच्यात असते ही खासियत!

googlenewsNext

(Image Credit : rennickeassociates.com)

जर तुम्हीही एका मुलीचे वडील असाल तर ही माहिती तुमच्यासाठी फार महत्त्वाची आहे. एका रिसर्चनुसार, वडिलाचं मुलीसोबतचं चांगलं नातं मुलींना एकटेपणातून बाहेर येण्यास मदत करतं. एका नव्या रिसर्चनुसार, मुली जेव्हा पहिल्या ग्रेडमधून पाचव्या ग्रेडपर्यंत पोहोचतात तेव्हा त्यांना वाटणारा एकटेपणा हळूहळू कमी होतो. पण त्या मुलींमध्ये एकटेपणा आणखी लवकर घटला ज्या मुलींचं वडिलांसोबतचं नातं फार चांगलं होतं.  

या रिसर्चचे सह-लेखक शिन फेंग यांनी सांगतले की, 'वडील आणि मुलीमध्ये बॉन्ड फार महत्त्वाचा आहे. आम्हाला हे कळालं की, वडील आणि मुलीमध्ये जवळीकता असल्याने मुलींना सुरक्षितता जाणवते आणि एकटेपणातून लवकर बाहेर पडतात'.

जर्नल ऑफ फॅमिली सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित रिसर्चसाठी रिसर्च टिमने ६९५ परिवारांचा अभ्यास केला. या परिवारांनी स्टडी ऑफ अर्ली चाइल्ड केअर अॅन्ड यूथ डेव्हलपमेंटमध्ये सहभाग घेतला होता. आई आणि वडिलांनी त्यांची मुलं एक, तीन, चार आणि पाच ग्रेडमध्ये असताना काय स्थिती होती त्यानुसार रेटिंग केलं. याच मुलांनी त्यादरम्यान आपल्या एकटेपणाचं रेटिंग केलं. 

या रिसर्चमधून असे समोर आले की, यादरम्यान जवळीकता कमी झाली आणि कॉन्फिक्ट वाढू लागले. मुख्य लेखिका जूलिया यांनी सांगितले की, 'हा तो वेळ असते जेव्हा मुले जास्त स्वतंत्र असतात, मित्रांसोबत नातं तयार करत असतात आणि बाहेर जास्त वेळ घालवतात'.

त्यामुळेच त्यांची आपल्या पालकांसोबत जवळीकता कमी होते आणि आपली मर्जी चालवण्याचा प्रयत्न करताता तेव्हा भांडणं होतात. एकटेपणा तेव्हाही कमी होतो जेव्हा मुलं त्यांच्यासोबत असलेल्या लोकांसोबत नातं तयार करत असतात. पण रिसर्चमधून हेही समोर आलं की, लहान मुलांमध्ये एकटेपणा एकासारखा कमी होत नाही. यात त्या मुलींचं प्रदर्शन चांगलं होतं ज्या त्यांच्या वडिलांचा अधिक जवळ होत्या.

या रिसर्चमधून आईसोबतच्या नात्याचा इफेक्ट समोर आला नाही. पण याचा अर्थ हा नाही की, त्या महत्त्वाच्या नाहीत. निष्कर्षातून ही बाब समोर आली की, वडिलांनी मुलांना वेळ दिला पाहिजे, खासकरुन मुलींना. 
 

Web Title: Daughters who have close relation with father fight better with loneliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.