महिलांना टक्कल असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात?

By ऑनलाइन लोकमत | Published: November 14, 2018 12:12 PM2018-11-14T12:12:52+5:302018-11-14T12:13:52+5:30

एखाद्या व्यक्तीबाबत आकर्षण वाटणं ही प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असतं. म्हणजे एका व्यक्ती अमूक एखादी व्यक्ती आवडत असेल तर दुसऱ्याला ती आवडेलच असं काही नाही.

do women find bald men be more attractive? | महिलांना टक्कल असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात?

महिलांना टक्कल असलेले पुरुष अधिक आकर्षक वाटतात?

Next

एखाद्या व्यक्तीबाबत आकर्षण वाटणं ही प्रत्येकाच्या आवडीवर अवलंबून असतं. म्हणजे एका व्यक्ती अमूक एखादी व्यक्ती आवडत असेल तर दुसऱ्याला ती आवडेलच असं काही नाही. कदाचित हीच सर्वांसाठी आनंदाची बाब आहे. सध्या केसगळती आणि टक्कल असलेले पुरुष असा विषय सतत वेगवेगळ्या कारणांनी निघत असतो. अशात या पुरुषांकडे आकर्षणाचाही मुद्दा नेहमी निघतो. यात काही महिलांना टक्कल असलेले लोक पसंत असतात, असा एका शोधातून खुलासा झाला आहे. यात सांगण्यात आले आहे की, जर तुम्ही तुमच्या केसगळतीच्या समस्येने हैराण आहात तर चिंता करु नका. कारण अनेक महिलांना बाल्ड म्हणजेच टक्कल असलेले पुरुष हॉट वाटतात. 

टक्कल असण्याचे वेगवेगळे प्रकार असतात. अनेक पुरुषांना केवळ टाळूवरच केस नसतात आणि डोक्याच्या इतर भागावर केस असतात. तेच काही पुरुष असे असतात ज्यांच्या डोक्याच्या वेगवेगळ्या भागातील केस नाहीसे होतात. काही पुरुष आपलं टक्कल लपवण्यासाठी शिल्लक असलेल्या केसांनी केस नसलेली जागा झाकण्याचा प्रयत्न करतात. पण याने काहीही होत नाही. अशात पूर्णपणे टक्कल करणे हा एक चांगला पर्याय असू शकतो. पण कोणताही निर्णय घेण्याआधी याबाबत काही सत्य जाणून घ्या. 

१) साधारण २५ टक्के पुरुष हे वयाच्या ३०व्या वर्षानंतर टक्कल पडण्याच्या समस्येचा सामना करतात. काही लोकांनी ही समस्या आनुवांशिकतेमुळे येते. 

२) काही पुरुषांमध्ये टक्कल पडण्याचं कारण आनुवांशिकता नाही तर वेगवेगळी कारणे असतात. त्यांना ही समस्या स्ट्रेस, पोषक तत्वांची कमतरता, डोक्याच्या त्वचेची समस्या यामुळेही होऊ शकते.

३) एका रिसर्चनुसार, १ हजार महिलांना तीन प्रकारचे पुरुष दाखवण्यात आले. पहिल्यात असे पुरुष होते ज्यांना डोक्यावर पूर्ण केस होते. दुसऱ्यात प्रकारातील पुरुषा हे थोडे टक्कल पडलेले होते तर तिसऱ्या प्रकारातील पुरुष हे पूर्णपणे टक्कल पडलेले होते. अशात १ हजार महिलांपैकी जास्तीत जास्त महिलांनी तिसऱ्या म्हणजे पूर्ण टक्कल असलेल्या पुरुषांना मत दिलं. 

४) काही महिलांनुसार. पूर्णपणे टक्कल असलेले पुरुष हे इतरांच्या तुलनेत जास्त शक्तीशाली, मजबूत आणि उंच वाटतात. इतकेच नाही तर गर्दीच्या ठिकाणी ते सहज दुसऱ्यांना आकर्षित करतात. 

५) काही महिलांनी आपलं मत मांडताना सांगितले की, त्यांना अर्धवट टक्कल अजिबात पसंत नाही. एकतर पुरुषांच्या डोक्यावर योग्यप्रकारे केस असावेत नाही तर पूर्णपणे टक्कल असावं. तसेच केसगळतीच्या समस्येने हैराण पुरुष हे शिल्लक राहिलेले केस कापून अधिक आकर्षक दिसू शकतात. 

असं असलं तरी याचे काही तोटेही आहेत. काही महिलांना आपल्या उत्तरात सांगितले की, पूर्णपणे टक्कल असलेले पुरुष हे त्यांच्या वयापेक्षा चार वर्षांनी अधिक वयस्कर वाटतात. 

Web Title: do women find bald men be more attractive?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.