तुम्हाला एकच मूल आहे?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 28, 2017 04:45 PM2017-10-28T16:45:24+5:302017-10-28T16:46:20+5:30
ते ‘सोशल’ होण्यासाठी घ्यावे लागतील जास्त कष्ट
- मयूर पठाडे
तुम्हाला किती मुलं आहेत? खरंतर आता हा प्रश्न विचारणचं चुकीचं आहे. आजकाल अनेक तरुण पालकांना एक किंवा फारतर दोन मुलं असतात. काही जण ठरवून उशिरा मूल होऊ देण्याचं ठरवतात किंवा एकाच मुलावर समाधान मानतात. अर्थात त्यामागची कारणंही वास्तव आहेत.
एकच मूल होऊ देण्याचे फायदे आहेत तसंच काही अडचणीही आहेत. एकच मूल असण्याची सगळ्यांत मोठी अडचण म्हणजे या मुलाला ‘सोशल’ कसं बनवायचं, हा अनेक पालकांना प्रश्न असतो. कारण घरात एकापेक्षा जास्त मुलं असल्यावर त्यांच्या ‘सोशल’ होण्याचा मार्ग बºयापैकी सुलभ होतो. पण ठरवून एकल मुलाचं पालकत्व स्वीकारणाºया पालकांसाठी जमेच्या बाजूूही बºयाच आहेत. एकाच मुलावर त्यांना लक्ष केंद्रित करता येत. त्याच्या आणि आपल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठीचा झगडा आणि संघर्षही तुलनेनं मर्यादित होतो. मुलांच्या वाढीतील आणि त्यातही आजकाल अत्यंत महाग झालेल्या शिक्षणाचा खर्च पेलणं त्यातल्या त्यात सोयीचं होतं.. मुलांचं आणि त्यातही पालकांचं स्वत:चं करिअर.. या गोष्टीही असतातच. त्यासाठीही एकच मूल असणं अनेक तरुण पालक पसंत करतात. एक मूल असण्याचे फायदे, सोयी बºयापैकी जास्त असले तरी या आपल्या मुलांना सोशल कसं बनवायचं याच मुख्य प्रश्नापुढे बºयाच पालकांचं घोडं अडतं. अर्थात अनेक जण त्यातून पर्यायही काढतात, पण तो बºयाचदा तकलादू स्वरुपाचाच ठरतो. दोन्ही पालक जर नोकरी करणारे असतील तर त्यावेळी थोडी जास्तच अडचण येते. नुकत्याच झालेल्या एका सर्वेक्षणातूनही हीच बाब समोर आली आहे. आपल्या मुलांना सोशल बनविण्यासाठी अनेक पालक प्रामाणिक प्रयत्न करतात, पण त्यांची ही धडपड बºयाचदा कमी पडते किंवा अशा पालकांची, म्हणजेच एकच मूूल असणाºयांची मुलं कमी सोशल असतात, असा या संशोधनाचा निष्कर्ष आहे.
एकाच मुलावर थांबणं हा निर्णय त्या त्या पालकांसाठी योग्यच आहे, पण आपल्या मुलांना सोशल बनविण्यासाठी त्यांना अधिक प्रयत्न करावे लागतील, याकडेही या अभ्यासकांनी लक्ष वेधलं आहे.