तुम्ही घरात मुलांना रंगरूपवावरून डिवचता, टोमणे मारता ? मग सावध व्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 26, 2017 04:21 PM2017-10-26T16:21:07+5:302017-10-26T16:21:14+5:30

आपलं मूल जाड बारीक असणं हे अ‍ॅबनॉर्मल नाही हे पालकांनाच कळत नाही तर मुलांना कोण सांगणार?

do you taunt your children often? | तुम्ही घरात मुलांना रंगरूपवावरून डिवचता, टोमणे मारता ? मग सावध व्हा

तुम्ही घरात मुलांना रंगरूपवावरून डिवचता, टोमणे मारता ? मग सावध व्हा

Next
ठळक मुद्देसमवयस्क मित्रांसारखं दिसावं असा आग्रह पालकही करतात. मुलंही मित्रांसारखंच दिसण्याचा, वागण्याचा प्रयत्न करतात, आणि पायरी चुकते ती इथेच.

-योगिता तोडकर

सकाळी रोजच्या प्रमाणे मस्त मूडमध्ये हातात पेपर घेतला. आणि पहिल्याच पानावरची बातमी वाचून मी सुन्न झाले. बातमीच तशी होती. शाळेतला एक मुलगा. त्याच्या मित्र मैत्रिणींनी त्याला दहा दिवसात बारीक होऊन दाखव असं आव्हान दिलं. यानेही ते स्वीकारलं. सतत व्यायाम, खाण्यावर बंधन असे काहीसे प्रकार करण्यात तो गढून गेला. आणि या सगळ्यात त्याने त्याचा जीव गमावला. किती गंभीर गोष्ट होती ही. नेमक्या कोणत्या विचारांनी या कोवळ्या जिवाने स्वतर्‍चा जीव गमावला असेल याचा विचार करताना एक ना अनेक गोष्टी डोक्यात आल्या.

सगळ्यात पहिली गोष्ट छान दिसणं हा आयुष्यातला महत्वाचा निकष होऊन बसलाय. मग वय कोणतही असो. अगदी लहानांपासून थोरांपर्यंत जो तो स्वतर्‍ला मेंटेन करण्यासाठी जीवाचा आटापिटा करतो. त्यामध्ये शारीरिक दृष्ट्या सुदृढ असणं हे महत्वाचं आहे कि शारीरिक आकार ठराविक असणं, यात मोठी गल्लत होत चाललीये.  बर्‍यापैकी जाड अथवा बारीक असेल कुणी तर आजूबाजूचे त्याला ऑड मॅन आऊट ठरवतात अथवा तो माणूस स्वतर्‍ ला  तसं समजायला लागतो. शरीराचे हे बाह्यरंग जपताना माणूस मनाचे अंतरंग शोधायला, जपायला विसरतो. या सगळ्यातून तो स्व- केंद्रित होत जातो. मग निर्माण होणारे हेवदावे,  दुस्वास हे अटळ आहेत. पण त्यामुळे तो नाती, त्यातला ओलावा सगळं हरवत जातो. 
या सगळ्यात पालकांची भूमिका ही जास्त मोठी. आजकालचे पालक मुलाचा वयाच्या मानाने फिटनेस कसा असला पाहिजे हे त्याच्या वयाच्या चार मुलांकडे पाहून ठरवतात. फिटनेस म्हणण्यापेक्षा शरीराचा आकारच म्हणू. माझं मुलं जाड अथवा बारीक जरी असलं तरी, त्याची शारीरिक ताकद, कामाचा वेग, अशा गोष्टी लक्षात घेणं गरजेचं असत. नाही कि तो/ती किती आकर्षक दिसतोय. मुलांचा वयाच्या मानाने ठराविक आणि पोषक आहार असणं, व्यायाम असणं हे महत्वाचं. आपले मुलं थोडे जाड व बारीक असल्याने अ‍ॅबनॉर्मल ठरत नसते. आपण जेंव्हा त्यांना बारीक होण्याचे धडे देतो त्यातून मुलांचे रस्ते चुकले तर त्याची जबाबदारी कोणाची? पालक मुलांना स्वतर्‍कडे आणि जगाकडे पाहण्याचा दृष्टिकोन त्यांच्या वागण्या बोलण्यातून घालून देत असतात.  
पालकांनी विचार करावा की, आपण आपल्या मुलाला त्याच्या स्वतः  मधल्या चांगल्या गोष्टी काय आहेत हे कधी ओळखायला मदत केलीये का? त्यातून आपलं वेगळेपण ठरत याची जाणीव आपण आपल्या पाल्याला करून दिलीये का? ज्या गोष्टी सगळ्याकडे आहेत त्या आपल्याकडेही असाव्यात यासाठी आटापिटा करावा हे  शिकवण्यात काय मजा? त्याचप्रमाणे पालकांचे मुलांशी नाते सुसंवांदाचे आहे काय? ते असेल तर मुले आई वडिलांकडून मार्गदर्शन घेऊ शकतात. आणि तसे झाले तर स्वतर्‍च्या विचारांना त्याची सांगड देऊन योग्य तो निर्णय मुलं घेऊ शकतात. त्याचप्रमाणे आपल्या मुलांना आपण विनाअट, विना चर्चा स्वीकारू शकलो पाहिजे. तर ते स्वतः ला स्वीकारू शकतील. आपण आपले आयुष्य जगण्यासाठी सक्षम आहोत हा भाव त्यांच्या मनात निर्माण होईल.
आजकाल काळाची गरज असल्याने बहुतेक सगळ्या घरातील आईवडील नोकरी अथवा व्यवसाय करणारे असतात.  मग स्वतः च्या भाविनक, मानसिक गरजा पूर्ण करण्यासाठी आजकालच्या मुलांचा वावर हा मित्र  मैत्रिणींमध्ये जास्त असतो. त्याचप्रमाणे आपण आता मोठे होता आहोत या भावनेतून स्वतर्‍च्या अस्तीत्वाचा संघर्ष ते या वयात हाताळत असतात. मग माझ्या मित्र  मैत्रिणी नी मला स्वीकारावं  यासाठी ते त्यांच्या पातळीवर निकष ठरवून घेतात. 
तुम्हाला विश्वास बसणार नाही कदाचित पण कॉलेज च्या वयाची किती मुलं माझ्याकडे मला गर्ल फ्रेंड नाही म्हणून मी अस्वस्थ आहे अथवा मला कोणी मिक्स करून घेत नाही मी काय करू असे अनेक प्रश्न घेऊन समुपदेशनासाठी घेऊन येतात. शाळेच्या मुलांना नेमकेपणाने त्यांच्या स्वतर्‍च्या अडचणीही कळात नसतात. फक्त मला भरपूर मित्र  मैत्रिणी असावेत मी त्यांना आवडावं, मग त्यासाठी आटोकाट प्रयत्न करतात.  माझी लोकप्रियता जेवढी अधिक तेवढा मी भारी इतका साधा निकष असतो यांचा. पण ते करताना आपले विचार, वर्तन किती योग्य आहे हे त्यांना ठरवता येणं अवघड असतं. कारण त्यांनी मर्यादित जग पाहिलेलं असत. ज्यावर आधारित या गोष्टी ते ठरवत असतात.
 जेंव्हा घरातील मंडळी अथवा आपले मित्र  मैत्रिणी साकारत्मकपणे आपला स्वीकार करू शकत नाहीत असं जेंव्हा मुलांसमोर येत तेंव्हा त्यांच्यात न्यूनपणाची भावना निर्माण होते. माझ्यात असं काय कमी आहे या विचारांनी ही मुलं पोखरली जातात. आणि मग त्यातून मी मुलं स्वतर्‍चं लहानपण हरवून बसतात. खेळणं बागडणं गमावतात. अशा परिस्थितीत ही  मुलं स्वतः चं एकटय़ाचं जग निर्माण करतात, ज्यात कोणालाच प्रवेश नसतो अथवा अशी मुलं घाबरट देखील बनतात. 
आपण आपल्या मुलांना अंतरंगाची ओळख करून दिली. त्यांचा बिनशर्त स्वीकार केला. ते स्वतर्‍साठी पूर्ण आहेत ही भावना त्यांच्यात रूजवली तर ते स्वतः ला आणि आपल्यालाही सहज स्वीकारतील.
( लेखिका समूपदेशक आहेत.)

yogita1883@gmail.com 

Web Title: do you taunt your children often?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.