- मयूर पठाडेतुमची मुलं कुठला खेळ खेळतात? मुळात एखादा खेळ खेळतात का? अर्थातच बरीच मुलं खेळतही असतील, पण मुलांना सगळ्याच गोष्टी आल्या पाहिजेत आणि प्रत्येक गोष्टीत ते पुढेच असले पाहिजेत, तसंच खेळांतही त्यांनी पुढेच असलं पाहिजे, स्टेट लेवल, नॅशनल लेवलपर्यंत त्यांनी गेलं पाहिजे, कारण एकतर परीक्षेत त्याचा गुणांसाठी फायदा होतो, न जाणो, कदाचित त्यात गेलाच पुढे, तर भविष्यात सचिन तेंडुलकर, विराट कोहली किंवा सिंधू, सायना नाहीतर कदम्बी श्रीकांतही होईल, त्याचं करिअरच एकदम सुधरुन जाईल म्हणून त्याला तुम्ही एखाद्या स्पोटर््सला ‘टाकताहात’ का?..आजकाल बºयाच मुलांच्या बाबतीत भविष्यातील ‘स्पर्धेच्या’, करिअरच्या दृष्टीनं फायदा म्हणूनच पालकांकडून त्यांना स्पोर्टस्साठी आग्रह केला जातो. मुलांनी खेळणं अत्यावश्यकच आहे, कारण केवळ करिअरसाठी नाही, तर त्यांच्या आयुष्यासाठीही खेळ ही गोष्ट खूपच महत्त्वाची असते. मूल अनेक गोष्टी खेळाच्या माध्यमातूनच शिकत असतं. पण केवळ करिअरच्या दृष्टीनंच त्याकडे पाहिलं आणि त्यासाठीच मुलांच्या मागे दट्ट्या लावला तर त्याचा विपरितही परिणाम होऊ शकते. जी सोशल आणि सामाजिक स्किल्स मुलांनी आत्मसात करावीत, नैसर्गिक पद्धतीनं ती मुल्यं त्यांनी शिकावीत यासाठी खेळाचा आग्रह धरला जातो, ती सामाजिक स्किल्सच चुकीच्या पायावर उभी राहू शकतात. खेळाच्या माध्यमातून एकोपा, समंजसपणा, वैरभाव विसरणं, पराभवातूनही पुन्हा उभं राहण्याची सकारात्मक जिद्द आत्मसात करणं.. यासारखे जे गुण विकसित होतात.. त्यांनाच सुरुंग लागण्याची भीती केवळ करिअरसाठी खेळाची सक्ती करण्यानं होऊ शकते. केवळ मी, मला, मीच जिंकलं पाहिजे, मीच पुढे गेलं पाहिजे, तेही काहीही करुन अशा वृत्तीनं द्वेष, मत्सर, चिडचिडेपणा.. या गोष्टींत वाढच होते.त्यामुळे खेळा जरुर, त्यातल्या स्पर्धेचाही अनुभव जरुर घ्या, पण व्यक्तिगत स्पर्धेतून जर खेळाकडे पाहिलं जात असेल, तर त्यामुळे खेळाचं आणि मुलाचंही त्यात नुकसानच आहे, हे वेळीच लक्षात घ्यायला हवं..
तुमचं मूल स्पर्धेसाठी, करिअरसाठी खेळ खेळतं कि स्वत:च्या विकासासाठी?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 30, 2017 4:00 PM
जरा तपासा.. कदाचित आपणही त्याला त्यासाठी भरीस पाडलं असेल.. त्यात नुकसान सगळ्यांचंच आहे..
ठळक मुद्देआजकाल मुलांच्या बाबतीत भविष्यातील ‘स्पर्धेच्या’, करिअरच्या दृष्टीनं फायदा म्हणूनच पालकांकडून मुलांना स्पोर्टस्साठी आग्रह केला जातो.खेळातून नैसर्गिक पद्धतीनंच मुलांचा विकास झाला पाहिजे.मुलांनी खेळणं अत्यावश्यकच आहे, पण व्यक्तिगत स्पर्धेतून जर खेळाकडे पाहिलं जात असेल, तर त्यामुळे खेळाचं आणि मुलाचंही त्यात नुकसानच आहे.