- मयूर पठाडेकुठलंही एखादं छोटं मोठं काम असो, त्यासाठी थोडा का वेळ लागणार असो, पण मुलं सोबत असली की इतका उच्छाद मांडतात की विचारायला सोय नाही. कशाला आपण इथे आलो आणि यांना सोबत आणलं असं आपल्याला होऊन जातं.. संयमाचीही परीक्षाच पाहिली जाते. अतिशय समंजस, सोशिक, मुलांना कधीही रागाऊ नये, त्यांना मारु नये अशा विचारांचे पालकही अशावेळी चिडतात..समजा एखाद्या कामासाठी आपण बॅँकेत गेलो आहे, पोस्टात गेलो आहे, शाळेत काही अर्जंट काम निघालं आहे.. तिथे किमान काही वेळ लागणार हे आपल्याला माहीत असतं आणि मुलांना घरी सोडून जाणंही शक्य नसतं किंवा तेवढी ती मोठी नसतात. अशावेळी मुलांना बरोबर न्यावंच लागतं. त्यावेळी मुलांबरोबर आई किंवा वडील यांपैकी एकटा पालकच असेल तर मग त्यांची खरोखरच तारांबळ उडते.मुलंही अगदी हुश्शार असतात. अशावेळी पालक आपल्याला काहीही करणार नाहीत, चारचौघांत ते आपल्याला मारणार नाहीत कि मोठ्यानं रागावणार नाहीत, हेही त्यांना माहीत असतं.. त्यामुळे त्यांच्या ‘प्रतिभे’ला आणखीच बहर चढतो आणि पालकांना सतावण्याचे एकसे एक अफलातून मार्ग ते शोधून काढतात.अशावेळी काय करायचं? कसं आवरायचं मुलांना?मुलांचंही बरोबरच असतं. जिथे त्यांना काहीही करता येत नाही, एकाच जागी बसून राहावं लागतं, त्यांना काहीही करण्यासारखं नसतं त्यावेळी तीही वैतागतात. काही अभ्यासकांनी त्यावर उत्तम उपाय सुचवला आहे. मुलांना त्यांच्या आवडीची गोष्ट करायला मिळाली किंवा पालकांनीच थोडासा ‘बावळट’पणा केला तर त्यांना खूप भावतो आणि ते रमतात.उदाहरणार्थ..मूल जर शाळेत जाणारं असेल, तर त्याच्या माहितीतलीच एखादी कविता मुद्दाम चुकीची म्हणायची.. पाढे, बाराखडी.. मुद्दाम चुकीची म्हणायची.. अर्थात ज्या गोष्टी मुलांना उत्तम येतात, त्याचाच उपयोग यासाठी करायला हवा. पालक चुकले आहेत हे मुलांना कळतंच.. मग ते आपल्या पालकांना दुरुस्त करतात. तुला कसं, काहीच येत नाही, मी तर किती हुशार असं त्यांना वाटतं..चेहºयाचे खेळ खेळणं.. मध्येच डोळे मोठ्ठे करणं, तोंड वेंगाडणं, नाक वेंगाडणं.. आपल्याकडे त्यावेळी उपलब्ध असलेल्या गोष्टींतूनच काहीतरी क्रिएटिव्ह करणं.. यासारख्या गोष्टी मुलांना आवडतात. मुलंही रमतात आणि आपलंही काम होतं..हुश्शार पालकांची हुश्शार पोरं पालकांची काही वेळा गोची करतातच. त्यावेळी त्यावरचा उपायही तसाच शोधावा लागतो..
..या खट्याळ मुलांना रमवायचं तरी कसं?
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 25, 2017 3:03 PM
त्यासाठी आपल्याही थोडंसं लहान व्हावं लागेल. बस्स..
ठळक मुद्देमुलांच्या आवडीच्या गोष्टीतूनच ती शिकतील संयम.पलकांनाही व्हावं लागेल मुलांप्रमाणे लहान.मुलांमधली क्रिएटिव्हिटी पालकांनीही दाखवली तर बºयाच गोष्टी होतील सोप्या.