(Image Credit : medium.com)
प्रत्येकाचच आपला परिवार, परिवारातील सदस्यांवर प्रेम असतं. आपल्यापासून दूर असलेल्या नातेवाईकांना आपल्या आयुष्यात महत्त्वाचं स्थान असतं. प्रत्येकाच्या या नातेवाईकांमध्ये असेही काही नातेवाईक असतात जे सतत तुमच्या पर्सनल लाइफबाबत प्रश्नांचा भडीमार करत असतात. मग कधी ठरतंय लग्न? तुझा बॉयफ्रेन्ड आहे का?(किंवा गर्लफ्रेन्ड आहे का?), जर तुमचं नुकतंच लग्न ठरलेलं असेल तर ते तुम्हाला लगेच फॅमिली प्लॅनिंगबाबतही प्रश्न विचारतात. या सततच्या प्रश्नांचा कधीना कधी प्रत्येकालाच त्रास होत असतो. खासकरुन मुलींना अशा प्रश्नांचा फार जास्त सामना करावा लागतो. पण आता अशा नातेवाईकांचं टेन्शन सोडा. कारण अशा नातेवाईकांची काळजी कशी घ्यायची याच्या टिप्स आम्ही तुम्हाला देत आहोत.
उद्देश जाणून घ्या
काही नातेवाईक हे काहीही कारण नसताना प्रश्न विचारतात तर काही नातेवाईकांना उगाचच तुमच्या पर्सनल लाइफमध्ये नाक खूपसायची सवय असते. त्यामुळे त्यांचा हे प्रश्न विचारण्यामागचा उद्देश काय आहे हे आधी समजून घ्या. त्यानंतर तुम्ही ठरवा की त्यावर उत्तर द्यायचं किंवा नाही.
गप्प बसा किंवा स्माईल द्या
त्यांचा प्रश्न विचारण्यामागचा उद्देश जाणून घेतल्यावर तुम्हाला वाटत असेल की, त्यांना उत्तर द्यायला हवं तर जे आहे ते खरं सांगा किंवा केवळ स्माईल देऊन उत्तर देणं टाळू शकता. जर ते केवळ तुम्हाला त्रास देण्यासाठी प्रश्नांचा भडीमार करत असतील तर तुम्हाला जमेल तितकं गप्प बसा किंवा तुम्हाला काय करायचंय? असा प्रश्नही करु शकता.
प्रश्नावर प्रश्न
तुम्ही आधी अनेक प्रयत्न करुनही समोरची व्यक्ती प्रश्न विचारणं थांबवत नसेल तर तुमच्या पर्सनल बाबींमध्ये लुडबूड करत असेल तर तुम्ही त्यांच्या प्रश्नावर प्रति प्रश्न करु शकता. पण असं करताना समोरच्याला राग येऊ नये याचीही काळजी तुम्हाला घ्यावी लागेल. म्हणजे जर तुम्हाला कुणी तू लग्न कधी करणार आहेस? असं विचारत असेल त्यांना उत्तर द्या की, "मलाच माहीत नाही? तुम्हीच माझ्यासाठी एखादा लाइफ पार्टनर का शोधत नाही?".
तुमचं लाइफ किती बोरींग हे सांगा
काही लोक हे तेव्हा तुमच्या लाइफमध्ये इंटरेस्ट घेतात जेव्हा त्यांना तुमचं लाइफ त्यांच्या लाइफपेक्षा वेगळं वाटतं. अशांचे प्रश्न थांबवायते असेल किंवा त्यांना गप्प करायचं असेल तर तुम्ही तुमचं लाइफ फारच सामान्य किंवा बोरींग असल्याचं सांगू शकता. याने त्यांचा तुमच्या लाइफमधील इंटरेस्टच कमी होईल आणि त्यांचे प्रश्नही थांबतील.
गरज असेल तेव्हा अंतर ठेवा
काही वेळा असंही होतं की, तुम्हीच तुमच्या पसर्नल लाइफबाबत फार गोष्टी उघड केल्या की त्याचा फायदाही काहीजण घेतात. अशावेळी अशा लोकांपासून एक अंतर ठेवा. तुमच्या या वागण्यातूनच कदाचित त्यांना त्यांच्या प्रश्नाचं उत्तर मिळेल.
शेवटचा उपाय - त्यांना गप्प बसण्यास सांगा
खूप प्रयत्न करुनही, वेगवेगळी उत्तरे देऊनही किंवा तुम्ही टाळाटाळ करुनही समोरच्या व्यक्तीला हे कळत नसेल. तेव्हा चांगल्या शब्दात सांगा की, त्यांना तुमच्या पसर्नल लाइफबाबत प्रश्न विचारणे टाळावे. खरंतर हे करणं तसं सोपं नाही. पण काही लोकांना स्पष्टपणे आणि जोरात सांगितल्याशिवाय कळतही नाही. त्यामुळे त्यांना तुम्हाला काय वाटतं ते स्पष्टपणे सांगा.