पालकांसमोर PPP च्या माध्यमातून डिमांड ठेवत आहेत लहान मुलं!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2018 11:05 AM2018-12-29T11:05:55+5:302018-12-29T11:14:44+5:30
डिजिटल विश्वात लहान मुलं डिजिटल गोष्टींचा वापर किती करतात हे काही आता वेगळं सांगायला नको. पण या डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून ते नातीही कशी मेंटेन करतात याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत.
(Image Credit : www.magicdesktop.com)
डिजिटल विश्वात लहान मुलं डिजिटल गोष्टींचा वापर किती करतात हे काही आता वेगळं सांगायला नको. पण या डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून ते नातीही कशी मेंटेन करतात याची अनेक उदाहरणे समोर येत आहेत. त्यातील एक उदाहरण सध्या चर्चेत आहे. या उदहरणावरुन लहान मुलांच्या जीवनात डिजिटल प्रॉडक्टचा कसा प्रभाव वाढतोय हे दिसतं.
अमेरिकेतील टेक्सास इथे राहणारी ८व्या वर्गात शिकणाऱ्या मुलीने तिच्या आईकडे काही गिफ्ट मागितले. पण आईने नकार देऊ नये म्हणून मेकनाह गॅटिका नावाच्या या मुलीने चक्क PPP पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार करुन आईकडे डिमांड केली. मेकनाह ही साउथ कोरियन बॉय बॅन्ड बीटीएसची फार मोठी फॅन आहे. त्यामुळे ख्रिसमस गिफ्टची लांबलचक यादी करताना तिने बीटीएसचे रेकॉर्ड अलबम, प्यूमा स्नीकर्स, बीटीएसचे पोस्टर्स आणि स्लिपर्सची मागणी केली. तिला हे माहीत होतं की, आईला या वस्तू सरळ सरळ मागितल्या तर ती देणार नाही. त्यामुळे १३ वर्षाच्या या मुलीने ८५ स्लाइडची एक पॉवर पॉइंट प्रेझेंटेशन तयार केलं.
डिजिटल पद्धतीने नात्यांची घडी
या प्रेझेंटेशनच्या सुरुवातीच्या काही स्लाइडमध्ये मेकनाहने साउथ कोरियन पॉप म्युझिक सेंसेशनचे काही फोटो लावले होते. ते किती लोकप्रिय आहेत, हे दाखवण्यासाठी तिने हे फोटो लावले होते. त्यात त्यांचे काही व्हिडीओ सुद्धा तिने एम्बेड केले होते. त्यानंतर हळूहळू एकानंतर एक स्लाइडमध्ये मेकनाहने आपल्या मागण्यांबाबत सांगितले. हेही सांगितलं की, तिच्यासाठी या वस्तू किती महत्त्वाच्या आहेत. यावरुन हे समोर येतं की, आत्ताची पिढी ही डिजिटल विश्वात जगात आहे. त्यामुळे ते नातीही डिजिटल प्रॉडक्टच्या माध्यमातून मेंटेन करत आहेत. मेकनाह हे एकच उदाहरण नाही तर अशी अनेक लहान मुले अशाप्रकारचं प्रेझेंटेशन तयार करुन आपल्या मागण्या पूर्ण करुन घेत आहेत.
शाळेतील प्रोजेक्टसाठीही पीपीपीचा वापर
शाळेतील प्रोजेक्टसाठी जास्तीत जास्त मुलांना स्लाइड शो तयार करण्यासाठी सांगितलं जातं. त्यामुळे लहान मुलं टेक्नॉलॉजीसोबत चांगल्याप्रकारे जुळले जात आहेत. तसेच त्यांना यात सहजता वाटते आहे. मुलांना अशाप्रकारे पाहून पालकांनाही आनंद होतो आणि कोणतीही तक्रार न करता मुलांच्या मागण्या पूर्ण करतात.
लहान मुलांबाबत सांगायचं तर पॉलिश्ड प्रेझेंटेशनमुळे त्यांचे अनेक उद्देश सफल होतात. पहिला हा की, लहान मुलं स्लाइड शो च्या माध्यमातून पालकांना सहजपणे समजावून सांगू शकतात की, ते जे मागत आहेत ते त्यांच्यासाठी किती गरजेचं आहे. तसेच ते त्यांच्या मागण्यांच्या समर्थनात तसं वातावरण तयार करु शकतात. जेणेकरुन पालक मुलांच्या मागण्यांना नाही म्हणू शकत नाहीत.