मुलींच्या Food Habits सांगतात त्यांच्या लव लाइफचं सीक्रेट!

By ऑनलाइन लोकमत | Published: July 5, 2019 05:16 PM2019-07-05T17:16:49+5:302019-07-05T17:26:04+5:30

आपण नेहमी ऐकतो की, मुली मुलांपेक्षा जास्त फूडी असतात. त्यांना नवनवीन किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. काही मुलींसाठी गोड गोलगप्पे म्हणजेच पाणी-पुरी, तर काहींना आइसक्रिम खाणं फार आवडतं.

Know girls love life secrets in her food habits | मुलींच्या Food Habits सांगतात त्यांच्या लव लाइफचं सीक्रेट!

मुलींच्या Food Habits सांगतात त्यांच्या लव लाइफचं सीक्रेट!

googlenewsNext

आपण नेहमी ऐकतो की, मुली मुलांपेक्षा जास्त फूडी असतात. त्यांना नवनवीन किंवा त्यांच्या आवडीचे पदार्थ खायला प्रचंड आवडतात. काही मुलींसाठी गोड गोलगप्पे म्हणजेच पाणी-पुरी, तर काहींना आइसक्रिम खाणं फार आवडतं. पण आज आम्ही तुम्हाला मुलींच्या फूड हॅबिट्सनुसार त्यांच्या लव लाइफच्या सिक्रेट्सबाबत सांगणार आहोत. खरं तर मुलांसाठी मुलींचा स्वभाव त्यांच्या आवडीनिवडी ओळखणं एखाद्या टास्कपेक्षा कमी नसतं. पण मुलींच्या फूड हॅबिट्सवरून तुम्हाला मुलींना ओळखणं आणखी सोपं होईल. 

आईसक्रिम 

आईसक्रिमचं नाव ऐकताच असं एकादचं असेल जो नाही म्हणू शकतो. असं मानलं जातं की, जास्तीत जास्त मुलींना चॉकलेट आणि स्ट्रॉबेरी आईसक्रिम खाणं आवडतं. परंतु कदाचितच तुम्हाला हे माहीत असेल की अशा मुली स्वभावाने रोमॅन्टिक आणि नॉटी असतात. 

कॉफी

कॉफी आवडणाऱ्या मुलींचा स्वभाव रोमॅन्टिक असतो. आत्मनिर्भरता आणि क्लपनाशीलता यांच्या व्यवहारामध्ये स्पष्टपणे जाणवते. एवढचं नाही तर या मुली आपल्या लाइफ पार्टनरप्रति पूर्णपणे प्रामाणिक असतात. परंतु कॉफी लवर्स गर्ल्स थोड्या जास्त खर्च करणाऱ्या असतात. तसेच आपल्या पार्टनरसाठी खर्च करताना त्या अजिबात विचार करत नाहीत.


 
चॉकलेट

चॉकलेट खाणं जवळपास सर्वच व्यक्तींना आवडतं. परंतु चॉकलेट आवडणाऱ्या व्यक्ती नाजूक असतात. एवढचं नाही तर, या स्मार्ट आणि डॅशिंग मुलांकडे लगेच आकर्षित होतात. सरळ आणि थेट बोलणाऱ्या चॉकलेट लवर्स मुली आपल्या पार्टनरला धोका देत नाहीत. तसेच त्यांना त्यांच्या पार्टनरने धोका दिला तर त्या सहन करू शकत नाहीत. 

मिठाई

ज्या मुली ईमानदार आणि सरळ स्वभावाच्या असतात. त्यांना रागही फार लगेच येतो. परंतु या कठिण काळातही पार्टनसोबत असून त्या साथ कधीच सोडत नाहीत. 

गोल-गप्पे

गोल-गप्पे आवडणाऱ्या मुली आंबट-गोड स्वभावाच्या असतात. त्यांना आपल्या आयुष्य हसत-खेळत मजा करत घालवायला आवडतं. जर लव लाइफबाबत बोलायचं झालं तर, त्या आपल्या रिलेशनशिपमध्ये फार रोमॅन्टिक असतात. 

चहा

ज्या व्यक्ती सर्वात जास्त चहा पितात, त्या नम्र आणि लाजाळू असतात. चहा आवडणाऱ्या मुली  महत्वाकांक्षी असून आपल्या कुटुंबाच्या सर्व जबाबदाऱ्या त्या व्यवस्थित पार पाडतात. अशा मुली प्रत्येक छोट्या गोष्टींमध्ये आपला आनंद शोधतात. एवढचं नाही तर कुटुंबातील सर्व व्यक्तींना आनंदी ठेवण्यासाठी त्या सतत प्रयत्नशील असतात. 

बटाटा 

बटाटा आणि त्यापासून तयार करण्यात आलेले पदार्थ आवडणाऱ्या व्यक्ती सरळ स्वभावाच्या असतात. एवढचं नाही तर या आपल्या पार्टनरला धोका देत नाहीत. खास गोष्ट म्हणजे की, या मुली आत्मनिर्भर असतात आणि त्यांना मित्रमंडळींसाठी खर्च करायला आवडतं. 

नॉनव्हेज

एनर्जेटिक मुलींना नॉन-व्हेज खाणं फार आवडतं. एवढचं नाही तर यांचा सेन्स ऑफ ह्यूमर उफार उत्तम असतो. लव्ह मॅरेजमध्ये विश्वास ठेवण्याऱ्या या मुली आपल्या पार्टनरची साथ कधीच सोडत नाहीत. पण शाकाहारी मुलींच्या तुलनेत या मुली स्पष्ट बोलणाऱ्या असतात. 

तांदूळ

ज्या मुलींना तादूंळ किंवा भात खाणं आवडतं त्या आपल्या प्रेम स्पष्टपणे व्यक्त करतात. एवढचं नाही तर स्पष्ट विचार असल्यामुळे पार्टनराल प्रपोज करतानाही त्या मागे-पुढे पाहत नाहीत. परंतु यांना प्रेमामध्ये दिखावा करणं अजिबात आवडत नाही, असं मानलं जातं. 

टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही.

Web Title: Know girls love life secrets in her food habits

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.