जादूच्या झप्पीमुळे नातं होतं आणखी घट्ट!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 3, 2018 04:02 PM2018-08-03T16:02:06+5:302018-08-03T16:02:22+5:30
मुन्नाभाईची जादूची झप्पी आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. चित्रपटात संजय दत्त वैतागलेल्या माणसांना जादूची झप्पी देऊन शांत करतानाही आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? खऱ्या आयुष्यातही ही जादूची झप्पी आपल्याला फायदेशीर ठरते.
मुन्नाभाईची जादूची झप्पी आपल्या सर्वांना ठाऊकच आहे. चित्रपटात संजय दत्त वैतागलेल्या माणसांना जादूची झप्पी देऊन शांत करतानाही आपण पाहिलं आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? खऱ्या आयुष्यातही ही जादूची झप्पी आपल्याला फायदेशीर ठरते. नातं कोणतही असलं तरीही ते प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर उभं असतं. कधीकधी नात्यांमध्ये दुरावा येतो, भांडण होतात. काही वेळेस तर नात्यांमध्ये फूटही पडते. पण अशातही आपल्या पार्टनरवर असलेलं प्रेम व्यक्त करण्याचा सर्वात सोपा मर्ग म्हणजे तुमच्या पार्टनरला जादूची झप्पी द्या. जादूच्या झप्पीतील जादूमुळे तुमच्यातील दुरावा दूर होतो. तसेच नातं अधिक मजबूत होण्यासाठीही फायदेशीर ठरेल. पण तुम्हाला हे ठाऊक आहे का? जादूची झप्पी जशी नात्यासाठी चांगली असते त्याचप्रमाणे तुमच्या आरोग्यासाठीही चांगली असते. जाणून घेऊयात जादूच्या झप्पीचे आरोग्यदायी फायदे...
1. जर तुम्हाला एकटेपणा सतावत असेल किंवा मनात कोणती भीती असेल तर आपल्या पार्टनरला एक जादूची झप्पी द्या. असे केल्यानं तुमच्या मनातील भीती आणि एकटेपणा दूर होतो. पार्टनरला झप्पी दिल्यानं आपलेपणाची जाणिव होते. तसेच डोकं शांत होण्यास मदत होते.
2. कोणत्याही नात्यामध्ये छोटी छोटी भांडणं होतातच. पण ही भांडणं वाढवण्यापेक्षा समोरच्या व्यक्तीला प्रेमानं जवळ घेतलं तर भांडण संपतं.
3. अनेकदा घरातील आणि ऑफिसमधील कामाचा ताण यांमुळे आपल्या माणसांकडे दुर्लक्ष होतं. पण जर तुम्ही तुमच्या पार्टनरला एखादी झप्पी द्याल. तर त्यामुळे तुमच्यातील सर्व रूसवे फुगवे दूर होतील.
4. नात्यामध्ये कधी कधी एक क्षण असाही येतो की, ज्यामध्ये एकमेकांना काही न सांगता एकमेकांच्या मनातल्या गोष्टी समजतात. अशावेळी झप्पी दिल्यानं पॉझिटिव्ह एनर्जीचा संचार होते. तसेच नर्वसनेस दूर होतो आणि सेल्फ कॉन्फिडंस वाढतो.