(Image Credit: bestofshayari.blogspot.com)
मुलींचं मन जिंकणं काही सोपं काम नाहीये. पण काही गोष्टींकडे खास लक्ष दिलं गेलं नाही तर तुम्हाला महागात पडू शकतं. मुलींचं मन जिंकण्यासाठी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. इतकेच नाही तर मुलीला अचानक प्रपोज करण्याऐवजी तिच्याशी आधी मैत्री करा. प्रपोज करण्याआधी मुलीच्या भावना जाणून घ्या, असंही असू शकतं की, ती तुमच्यात इंटरेस्टेड नसेल. पण खरंच मुलींच्या मनात जागा मिळवणं फार कठिण काम आहे. त्यामुळे चला मुलींचं मन जिंकण्याच्या काही खास टिप्स जाणून घेऊ....
हसून संवाद साधा
मुलींचं मन जिंकण्यासाठी तुम्हाला अशा काही गोष्टी कराव्या लागतील ज्याने त्या इम्प्रेस होईल. मुलीचं मन जिंकण्यासाठी किंवा त्यांना इम्प्रेस करण्यासाठी तुम्हाला त्यांच्याशी हसत संवाद साधावा लागेल. हसतानाही तुम्ही कसे हसता याची काळजी घ्या. मित्रांसोबत असताना जसे तुम्ही नेहमी हसता तसं हसून चालणार नाही.
गंमती-जमती
मुलींच्या मनात जागा मिळवायची असेल तर नेहमी केवळ गंभीर किंवा इमोशनल गोष्टी करुन चालणार नाही. काही गंमतीदार गोष्टीही कराव्या लागतील. एका शोधानुसार, चांगली स्टोरी टेलर मुलं मुलींना अधिक आवडतात. त्यामुळे तुम्ही जे बोलता याकडेही लक्ष द्या. मुलींसोबत बोलायचं असेल तर आधी त्यांचा मूड कसा आहे, त्या नाराज आहे का, या गोष्टी जाणून घ्या. जर त्या नाराज असेल तर त्यांना हसवण्याचा प्रयत्न करा. मुलींना संकोची मुलं अजिबात आवडत नाहीत. अशात जर तुम्ही मुलींशी बोलताना अडखळत असाल आणि तुम्हाला भीती वाटत असेल तर त्या मुलीही तुमच्याशी बोलणार नाहीत.
बॉडी लॅग्वेजकडे द्या लक्ष
त्या मुलींच्या मनात तुम्हाला जागा मिळवायची आहे तर मुलीच्या बॉडी लॅंग्वेजकडे लक्ष देणेही महत्वाचे आहे. ती तुम्हाला भेटताना कशी भेटते. तुम्हाला भेटताना आणि इतरांना भेटताना तिच्यात काय वेगळेपणा असतो हे बघा. तुमच्याशी बोलताना तिचे हावभाव कसे आहेत हे बघा. कोणत्याही बाबतीत घाई करुन उपयोग नाही. खासकरुन मनाचा विषय असताना तर फार जपून पाऊल टाकावे लागते.
ती काय बोलते ते ऐका
काही मुलींना बोलण्याची फार सवय असते. अशात त्यांना असं वाटत असतं की, त्यांचं बोलणं ऐकणारा कुणीतरी असावा. त्यामुळे जेव्हाही तुम्ही त्या मुलीला भेटाल तेव्हा तिचं आधी ऐकून घ्या, तुम्ही कमी बोला. असं नाहीये की, तुम्ही काहीच बोलायचं नाही. पण आधी तिचं बोलणं पूर्ण होऊ द्या. नंतर तुम्ही बोला.
बोलण्याची कला असावी
मुलींशी बोलताना याची काळजी घ्या की, तुम्ही कमी बोलावं आणि तुमच्या डोळ्यांनी अधिक. काहीही बोलायचं असेल तर थेट डोळ्यात बघून बोला. तुमच्यात बोलण्याची कला असली पाहिजे. त्याहूनही महत्वाचं म्हणजे तुमच्या बोलण्यात महिलांविषयी सन्मान असावा. शब्दांचा वापर योग्य असावा. तुमचे सकारात्मक विचार त्यांना सांगा. खासकरुन तिच्या छोट्या छोट्या गोष्टींचं कौतुक करा कारण मुलींना त्यांचं कौतुक ऐकायला आवडतं.
व्यवस्थित रहा
खरंतर तुम्ही जसे आहात तसे समोरच्याने तुम्हाला स्विकारायला हवे. पण तरीही काहींची अशी अपेक्षा असते की, त्यांचा पार्टनर हा व्यवस्थित राहणारा, चांगला ड्रेस सेन्स असणारा असावा. त्यामुळे मुलींना भेटताना तुम्ही कसे जाता या गोष्टींची काळजी घ्या. नक्कीच ती मुलगी इम्प्रेस होईल.