फ्लर्टिंगच्या पद्धतीवरुन कळतं तुम्हाला कसं रिलेशनशिप हवंय!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 8, 2019 12:39 PM2019-01-08T12:39:21+5:302019-01-08T12:45:09+5:30
एखाद्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट दाखवण्यासाठी आणि त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लोक फ्लर्टिंगचा आधार घेतात.
(Image Credit : beautyhealthtips.in)
तरुणांमध्ये फ्लर्टिंग करणं एक सामान्य बाब आहे. एखाद्या व्यक्तीमध्ये इंटरेस्ट दाखवण्यासाठी आणि त्या व्यक्तीचं लक्ष आपल्याकडे आकर्षित करण्यासाठी लोक फ्लर्टिंगचा आधार घेतात. प्रत्येक व्यक्तीची फ्लर्ट करण्याची पद्धत वेगळी असते. याबाबतीत कुणी फारच बिनधास्त तर फार लाजाळू असतात.
कशासाठी फ्लर्टिंग?
आता एका रिसर्चनुसार हे समोर आलं आहे की, ज्याप्रकारचं रिलेशनशिप तुम्हाला हवं असतं, त्याप्रकारेच तुम्ही फ्लर्ट करता. फ्लर्टिंगसाठी काही लोक सामान्य व्यवहाराचा वापर करतात, तर काही लोक असामान्य पद्धतीचा वापर करतात.
(Image Credit : www.lovepanky.com)
काय सांगतो रिसर्च?
एका रिसर्चमध्ये साधारण १३०० लोकांना सहभागी करुन घेण्यात आले होते आणि असं आढळलं की, काय ते नेहमी सरळ सरळ पध्दतीने फ्लर्ट करतात किंवा ते नेहमी वेगळ्या पद्धतीचा वापर करतात. सरळ सरळ पद्धतीने फ्लर्ट करण्यात नजरेस नजर मिळवणे, केसांशी खेळणे, सल्ला मागणे यांसारख्या आणखीही काही गोष्टींचा समावेश होतो. तर काही लोक समोरच्या व्यक्तीचं लक्ष वेधण्यासाठी कविता करतात किंवा त्यांच्या आईसाठी तसेच परिवारातील सदस्यांसाठी गिफ्ट खरेदी करुन फ्लर्ट करतात. त्यांच्या या फ्लर्ट करण्याच्या पद्धतीवरुन त्यांना कसं रिलेशनशिप हवंय हे कळून येतं. त्यांना मजबूत आणि फार काळ चालणारं रिलेशनशिप हवंय कि काही वेळासाठी त्यांना नातं जोडायचंय.
(Image Credit : deythere.com)
मजेदार बाब ही आहे की, जास्तीत जास्त लोक टिपिकल फ्लर्टिंग करण्याची पद्धतच वापरतात. ज्या लोकांना कमी काळासाठी रिलेशनशिप हवं असतं ते सुद्धा या सामान्य आणि सरळ सरळ पद्धतीनेच फ्लर्ट करत असतात. या रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, काही लोकांना कुणाच्या फ्लर्टिंगचं टारगेट होणंही पसंत असतं. फ्लर्टिंगच्या माध्यमातून लोक समोरच्या व्यक्तीत त्यांचा असलेला इंटरेस्ट दर्शवतात. तसेच यात रिजेक्ट झाल्यावर निराश होण्याची गरजही नाही.