'या' संकेतांवरुन ओळखा तुम्हाला नात्यातून बाहेर पडण्याची आहे गरज!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 16, 2018 01:01 PM2018-10-16T13:01:09+5:302018-10-16T13:17:22+5:30
कोणतीही नाती ही फार नाजूक असतात त्यामुळे नाती फार काळजीने जपावी लागतात. कोणतही रिलेशनशिप पुढे घेऊन जाण्यासाठी खूपकाही द्यावं लागतं, पण त्यानंतरही काही कारणांनी नातं कमजोर होऊन तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं.
(Image Credit : www.independent.co.uk)
कोणतीही नाती ही फार नाजूक असतात त्यामुळे नाती फार काळजीने जपावी लागतात. कोणतही रिलेशनशिप पुढे घेऊन जाण्यासाठी खूपकाही द्यावं लागतं, पण त्यानंतरही काही कारणांनी नातं कमजोर होऊन तुटण्याच्या उंबरठ्यावर येतं. अशात काय तुम्हाला स्वत:ची किंमत माहीत आहे? काय तुम्हाला माहीत आहे की, नात्याच्या कोणत्या वळणावर तुम्हाला पुढे एकट्याने निघून जाण्याची गरज आहे? चला जाणून घेऊ असेच काही संकेत केव्हा प्रेमाच्या नात्यातून तुम्हाला बाहेर पडायचं आहे.
तुमचा फायदा घेतला जात असेल तर....
काय नात्यात तुमचा केवळ फायदा घेतला जात आहे? ही गुलामी करण्यासारखंच आहे. जेव्हा दोन लोक प्रेमात असतात तेव्हा समानतेची भावना असते किंवा सामान्यपणे असायला हवी. पण जेव्हा नात्यातील समानता संपलेली असते आणि नातं केवळ तुम्ही एकट्यांनी धरुन ठेवलं असेल तर फायदा काय? केवळ तुमचा फायदा घेतला जात असेल आणि हे तुम्हाला कळत असेल तर या नात्यातून वेळीच बाहेर पडलेले बरे...
आधीसारखा सन्मान नसेल तर...
वेळेनुसार नात्यात काही चढ-उतार येत असतात. पण सन्मान ही कोणत्याही व्यक्तीसाठी महत्त्वाची बाब आहे. आत्मसन्मानाबाबत कोणतीही व्यक्ती तडजोड करत नाही. व्यक्ती खाणं, पिणं, कपडे, राहणं याबाबत अॅडजस्ट करु शकतो, पण आत्मसन्मान या गोष्टींपेक्षा मोठी बाब आहे. जर तुम्ही तुमच्या पार्टनरचा सन्मान करत असाल आणि त्याबदल्यात तुम्हाला अपमान मिळत असेल तर हा नात्यातून बाहेर पडण्याचा संकेत आहे.
संधी देऊन थकला आहात?
दुसरी संधी देण्याचीही एक सीमा असते. जर तुमचा/तुमची पार्टनर नेहमी माफ न केल्या जाणाऱ्या चुका करत असेल आणि त्यांनतरही तो व्यक्ती तुम्हाला माफी मागायला येत असेल, तुम्ही समोरच्या व्यक्तीवर प्रेम करता म्हणून सतत माफ करत असालही. पण प्रश्न हा आहे की, अशा किती संधी देणार? दुसरी संधी देण्याचीही एक लिमिट असते. तुम्ही जितक्या जास्त संधी द्याल तितका तुमचा फायदा घेतला जाणार. अशाप्रकारच्या नात्यात पुढे जाण्यात काहीच अर्थ उरत नाही.
आधीसारखं प्रेम नसेल तर...
कोणतही नातं ओझं म्हणून केवळ ओढून-ताणून जपत असाल तर अशा नात्यात राहण्याचा काय अर्थ? कोणतीही गोष्ट प्रमाणापेक्षा जास्त ताणली की, ती खराब होते. प्रेमाचं नातं तर फार नाजूक असतं. असं ओझं म्हणून केवळ जपायचं म्हणून जपल्या जाणाऱ्या नात्याचा काहीच अर्थ उरत नाही. दोघांसाठीही फायद्याचं हे ठरेल की, तुम्ही आता थांबावं.
कधीही न संपणारी भांडणे
भांडणं ही कोणत्याही नात्यात होत असतात. पण ही भांडणं कधीच संपत नसतील तर काय? जर हे तुमच्या रोजच्या जगण्याचा भाग झाले तर? जर तुम्ही रोज भांडत असाल आणि त्यानंतरही कोणत्याही निष्कर्षावर पोहोचत नसाल तर हे नातं थांबवलेलं बरं.