जास्त बुद्धीमान असल्याने रोमॅंटिक जोडीदार शोधणे कठिण, सर्व्हेतून खुलासा!
By ऑनलाइन लोकमत | Published: August 25, 2018 11:37 AM2018-08-25T11:37:55+5:302018-08-25T11:38:32+5:30
एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी अनेक वैशिष्ट्यांबाबत ३८३ तरुणांवर एक सर्व्हे केलाय की, त्यांना त्यांच्या साथीदारात काय हवंय.
जर कुणी जास्त बुद्धीमान आणि जास्त चिंता न करणारा व्यक्ती असेल तर त्याची ही खासियत असू शकते, पण त्याला त्याचं हे वेगळेपण महागातही पडू शकतं. कारण अशा व्यक्तींना रोमॅंटिक जोडीदार शोधण्यास अडचण येऊ शकते.
एका अभ्यासात हा दावा करण्यात आला आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलियाच्या अभ्यासकांनी अनेक वैशिष्ट्यांबाबत ३८३ तरुणांवर एक सर्व्हे केलाय की, त्यांना त्यांच्या साथीदारात काय हवंय. यात चार प्रमुख मुद्दे होते. ज्यात बुद्धीमत्ता, चिंता न करणे, दयाळू आणि शारीरिक आकर्षण.
हा अभ्यास ब्रिटीश जर्नल ऑफ सायकॉलॉजीमध्ये प्रकाशित करण्यात आला आहे. यात असे आढळून आले की, ९९ टक्के लोकांना आपल्या पार्टनरमध्ये जास्त बुद्धीमत्ता आणि जास्त चिंता करणे किंवा काळजी करणे ही खासियत नकोय.
तेच दयाळू आणि बुद्धीमत्ता हे दोन सर्वात महत्त्वपूर्ण गुण आहेत. ज्यातील कोणताही एक रोमॅंटिक साथीदारांमध्ये शोधला जातो.
यूडब्ल्यूएचे गिल्स गिग्नाक म्हणाले की, 'याआधी प्रकाशित झालेल्या अभ्यासातून हे दिसतं की, जास्त बुद्धीमान असण्याच्या गुणाबाबत लोकांमध्ये असुरक्षितता निर्माण होते. त्याप्रकारे जास्त चिंता किंवा काळजी न करणे याला आकांक्षा कमी असल्यासारखे पाहिले जाऊ शकते.