लहान मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी खास टिप्स!

By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 11:02 AM2018-12-13T11:02:46+5:302018-12-13T11:10:08+5:30

आजकालच्या दिवसेंदिवस बदलत चाललेल्या लाइफस्टाइलमध्ये मोठ्यांच्या आयुष्यासोबतच लहान मुलांच्या आयुष्यातही चॅलेंजेस वाढले आहेत.

Special Tips to Increase Confidence in Kids! | लहान मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी खास टिप्स!

लहान मुलांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासाठी खास टिप्स!

googlenewsNext

(Image Credit : The Independent)

आपल्या लहान मुलांनी इतरांप्रमाणे पुढे जावं, त्यांना डान्स करता यावा, त्यांना गाणं गाता यावं, त्यांना सर्व खेळ खेळता यायला हवे, त्यांनी ५० मुलांमध्ये उठून दिसावं असं प्रत्येक आई-वडिलांना वाटत असतं. त्यासाठी आई-वडिलही वाट्टेल ते करत असतात. पण आजकालच्या दिवसेंदिवस बदलत चाललेल्या लाइफस्टाइलमध्ये मोठ्यांच्या आयुष्यासोबतच लहान मुलांच्या आयुष्यातही चॅलेंजेस वाढले आहेत. स्पर्धा बघता पालक आपल्या मुलांना स्पर्धेत टिकून ठेवण्यासाठी तयार करतात. अर्थातच या सगळ्यांमुळे लहान मुलांवर दबाव वाढतो आणि यामुळे त्यांचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो. मात्र या समस्येला दूर करण्यासाठी काही टिप्स आम्ही सांगत आहोत. 

कौतुक करा

(Image Credit : www.oxfordlearning.com)

लहान मुलांचं जेव्हा आपल्या आई-वडिलांकडून कौतुक केलं जातं, तेव्हा त्यांच्यांसाठी यापेक्षा मोठं मोटिवेशन नसतं. असं आढळतं की, मुलांनी एखादी गोष्ट केली आणि त्याचं आई-वडिलांनी कौतुक केलं तर मुलं पुन्हा पुन्हा ती गोष्ट करतात. छोटे प्रश्न सोडवले असो किंवा प्राइज जिंकलं असो किंवा चांगलं चित्र काढलं असो त्यांचं कौतुक करावं. पण अनेक पालक आपल्या लहान मुलांचं कौतुक करताना दिसत नाहीत. त्यांनी मोबाइलमधून थोडा वेळ काढून मुलांच्या कौतुकालाही द्यावा. याने त्यांचा आत्मविश्वास वाढतो. 

अडचण स्वत: दूर करु द्या

(Image Credit : pbs.org)

दैनंदिन जीवनाशी निगडीत गोष्टी असो वा अभ्यासाशी संबंधित प्रश्न, प्रत्येक गोष्टीत त्यांची पूर्णपणे मदत करु नका. एकदा त्यांना समजावून सांगा. नंतर त्यांनाच येणाऱ्या समस्या सोडवू द्या. पण हे करत असताना त्यांच्यावर लक्ष ठेवा, जेणेकरुन त्यांना फारच जास्त अडचण येत असेल तर तुम्ही मदत करु शकाल. स्वत:चे प्रश्न स्वत: सोडवल्याने त्यांचा आत्मविश्वास तर वाढेलच सोबतच ते कुणावर अवलंबून राहण्याची त्यांना गरज पडणार नाही. तसेच ते स्वत:हून वेगळ्या गोष्टी करु लागतील.

संवाद साधा

तुमच्या लहान मुलांसोबत रोज बोला. तुम्ही भलेही त्यांचे आई-वडील असाल पण त्यांच्यासोबत मैत्रिचं नातंही ठेवा. याने ते तुमच्याशी त्यांच्या अडचणी शेअर करु शकतील. जर तुमच्या लहान मुलाला काही अडचण असेल आणि त्याला वाटत असेल की, ती गोष्ट तुमच्याशी शेअर करु शकणार नाही किंवा तसं केलं तर ओरडा पडेल, अशा स्थितीत मुल डिप्रेशनमध्ये जाऊ शकतं. याने तुमचं मुल कमजोर होऊ शकतं. 

इमोशनल ट्रेनिंग

(Image Credit : www.bigcitymoms.com)

तुमच्या मुलामधील किंवा मुलीमधील संवेदनशीलता दाबली जाऊ देऊ नका. त्यांना जवळ घ्या, दुसऱ्यांची मदत करायला शिकवा. या सवयींमुळे त्यांचे इमोशन्स टिकून राहतील. स्पर्धेच्या नादात अनेकदा लोक एकमेकांना नुकसान पोहोचवतात आणि त्यांच्या इमोशन्सचीही कमतरता बघायला मिळते. पण जर बालपणापासूनच त्यांना एकमेकांच्या इमोशन्सची काळजी घेण्याचं शिकवलं गेलं तर त्यांचा अनेकप्रकारच्या इमोशनल ट्रॉमापासून बचाव होऊ शकतो. 

योगाभ्यासाने होईल फायदा

(Image Credit : brakpanherald.co.za)

योगाभ्यास केल्याने आत्मशांती मिळते. याने मेंदू वेगवेगळ्या गोष्टींवर अधिक चांगलं लक्ष केंद्रीत करु शकतो. याने लहान मुलं चांगलं परफॉर्म करु शकतात. त्यामुळे त्यांना योगाभ्यासाची किंवा व्यायामाची सवय लावा. याने त्यांच्यातील आत्मविश्वास वाढेल. याने त्यांना स्वत:ला शांत कसं ठेवावं हे जाणून घेता येईल. तसेच त्यांची एकाग्रताही वाढेल.
 

Web Title: Special Tips to Increase Confidence in Kids!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.