पार्टनरसोबत 'या' गोष्टी करण्याचे फायदे वाचून व्हाल अवाक्, जाणून घ्या कोणत्या...
By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2019 02:41 PM2019-07-20T14:41:10+5:302019-07-20T14:47:22+5:30
रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये ह्यूमर किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १ लाख ५० हजार लोकांचा अभ्यास केला.
कपल्ससाठी एक आनंदाची बातमी आहे. एका रिसर्चमधून समोर आलं आहे की, जे कपल्स एकमेकांसोबत गमती-जमती करतात किंवा लाइट मूडमध्ये एकमेकांची गंमत करतात, ते फार जास्त काळ सोबत राहण्याची शक्यता असते. म्हणजे अशा कपल्सचं नातं इतरांच्या तुलनेत अधिक जास्त काळ मजबूत राहतं.
हसण्याचा अर्थ खिल्ली उडवणे नाही
(Image Credit : Stocksy United)
गमती-जमती करण्याचा अर्थ म्हणजे पार्टनरची खिल्ली उडवणे नाही. रिसर्चमध्ये हे स्पष्टपणे सांगण्यात आलं आहे की, जे जोक्स केवळ दोन व्यक्तींमध्येच होऊ शकतात आणि ज्यांचा उद्देश केवळ हसणे हा असतो, या जोक्सच्या माध्यमातून नातं अधिक मजबूत होतं. पण जे कपल्स एकमेकांसोबत अश्लिल गंमत करतात किंवा एकमेकांना चिडवण्याचा प्रयत्न करतात, त्यांचं नातं जास्त काळ चालत नाही. कारण याप्रकारच्या जोक्सवरून असं दिसतं की, तुमच्या नात्यात काही तरी चुक आहे.
रोमान्ससोबत सेन्स ऑफ ह्यूमर गरजेचा
अमेरिकेतील यूनिव्हर्सिटी ऑफ कन्सासचे प्राध्यापक जेफ्री हॉल सांगतात की, 'रोमॅंटिक पार्टनर्समध्ये हसणं, एकमेकांची गंमत करणं गरजेचं असतं. कारण याने त्यांच्या नात्यात बॉंडिंग मजबूत होते. तसेच नात्यात सुरक्षेची भावनाही तयार होते. इतकेच नाही तर जेव्हा तुम्ही पार्टनरसोबत आनंद शेअर करता तेव्हा दोघांमधील रोमॅंटिक अट्रॅक्शनही वाढतं'.
(Image Credit : Refresh Mental Health)
रोमॅंटिक रिलेशनशिपमध्ये ह्यूमर किती महत्त्वाचा आहे हे जाणून घेण्यासाठी अभ्यासकांनी १ लाख ५० हजार लोकांचा अभ्यास केला. पर्सनल रिलेशनशिप नावाच्या जर्नलमध्ये प्रकाशित या रिसर्चचे निष्कर्ष सांगतात की, जे कपल्स एकत्र गंमत करतात, किंवा ज्या जोक्सचा उद्देश केवळ हसवणे आहे असे जोक्स सांगतात, यातून एकमेकांना चिडवणे किंवा कमीपणा दाखवणे हा उद्देश नसेल तर अशा कपल्सचं नातं जास्त काळ टिकून राहतं.
असा सेन्स ऑफ ह्यूमर नुकसानकारक
(Image Credit : Elite Daily)
अशाप्रकारे गंमती-जमती करण्याचा अर्थ असा नाही की, गरजेपेक्षा जास्त ह्यूमर नात्यात आणावा. जर तुमचा सेन्स ऑफ ह्यूमर फार जास्त आक्रामक असेल तर हेही तुमच्या नात्यासाठी नुकसानकारक ठरू शकतं. तुमच्या नात्यावर याचा वाईट प्रभाव पडू शकतो.