लहान मुलं असतात 'देवाचं रुप', रिसर्चमधून खुलासा!

By ऑनलाइन लोकमत | Published: January 7, 2019 11:06 AM2019-01-07T11:06:06+5:302019-01-07T11:08:04+5:30

तुम्ही हे नेहमीच ऐकलं असेल लहान मुलं हे मातीसारखी असतात. त्यांना कसंही रुप दिलं तर ती तशी होतात. त्यासोबतच लहान मुलं ही देवाचं रुप असतात.

Study shows that babies know moral values | लहान मुलं असतात 'देवाचं रुप', रिसर्चमधून खुलासा!

लहान मुलं असतात 'देवाचं रुप', रिसर्चमधून खुलासा!

(Image Credit : standard.co.uk)

तुम्ही हे नेहमीच ऐकलं असेल लहान मुलं हे मातीसारखी असतात. त्यांना कसंही रुप दिलं तर ती तशी होतात. त्यासोबतच लहान मुलं ही देवाचं रुप असतात. लहान मुलांमध्ये काही वाईट नसतं. ते जसजसे मोठे होतात तेव्हा ते आजूबाजूला बघूनच चांगल्या-वाईट गोष्टी शिकत असतात. एका रिसर्चमधून याचा खुलासा झाला आहे की, लहान मुलांच्या मनात काहीच वाईट नसतं. इतकेच नाही तर लहान वयापासूनच त्यांना नैतिकता समजू लागते, तसाच ते चांगलं आणि वाईट यात फरक करु शकतात.

कसा केला प्रयोग?

एका अभ्यासात १ वर्षापेक्षा कमी वयाच्या लहान मुलांना काही पुतळे दाखवण्यात आलेत. हे पुतळे वेगवेगळ्या रंगांचे होते. लाल रंगाचा पुतळा डोंगरावर चढण्याचा प्रयत्न करीत असतो, पण त्याला निळ्या रंगाचा पुतळा खाली ढकलतो. तेच पिवळ्या रंगाचा एक पुतळा लाल पुतळ्याला डोंगरावर चढण्यासाठी मदत करतो. 

हेच पुतळे काही वेळांनी लहान मुलांना खेळण्यासाठी देण्यात आले. यातील जास्तीत जास्त मुलांनी खेळण्यासाठी पिवळ्या रंगाचा पुतळाच निवडला. नंतर रंगामुळे तर लहान मुलांची या पुतळ्याची निवड केली नसेल ना, हे जाणून घेण्यासाठी मुलांना पुन्हा तोच खेळ दाखवण्यात आला. पण यावेळी रंगांच्या भूमिका बदलण्यात आल्या होत्या. त्यानंतर पुन्हा त्यांना हे पुतळे खेळण्यासाठी देण्यात आले. प्रत्येकवेळी मुलांनी मदत करणाऱ्या पुतळ्याचीच खेळण्यासाठी निवड केली. येल यूनिव्हर्सिटी द्वारे करण्यात आलेल्या या शोधात ७ महिन्यांचं बाळही नैतिकता समजण्यात सक्षम आढळलं. 

आणकी एक प्रयोग

यासोबतच क्योटो यूनिव्हर्सिटी द्वारे करण्यात आलेल्या एका शोधात लहान मुलांना एक व्हिडीओ दाखवण्यात आला. या व्हिडीओमध्ये एक पीडित, एक वाईट आणि एक मदत करणारी व्यक्ती दाखवण्यात आली. इथेही लहान मुलांनी मदत करणाऱ्याला अधिक पसंती दिली. यातून हे स्पष्ट होतं की, मोठे झाल्यावर भलेही नैतिकता आपल्यासाठी एक पर्याय ठरतो, पण लहान मुलं चांगलं आणि वाईट यात करुन नेहमी चांगल्याच्याच सोबत असतात. 

लहान मुलांवर चांगले संस्कार करणं आता फारच कठीण काम झाल्याचं बघायला मिळतं, असं म्हटल्यास वावगं ठरु नये. कारण नोकरीसाठी पालक अनेक तास घराबाहेर असतात. ते आपल्या मुलांना हवा तसा वेळ देऊ शकत नाहीत. त्यांच्याशी निट बोलू शकत नाहीत. बालपणी झालेले संस्कार हे त्यांच्यावर खोलवर परिणाम करतात. त्यावरच त्यांना पुढील पाया ठरतो. मात्र या शोधातून लहान मुलांबाबतची एक अशी गोष्ट समोर आली आहे, ज्यामुळे अनेक पालकांचा ताण कमी होऊ शकतो. त्यांना या जोडीने जर चांगल्या गोष्टी शिकता आल्या तर त्यांना विकासही अधिक चांगला होऊ शकतो. 

Web Title: Study shows that babies know moral values

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.