लग्नासाठी कसा मुलगा हवाय भारतीय तरुणींना?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 4, 2019 01:21 PM2019-01-04T13:21:40+5:302019-01-04T13:21:56+5:30
बदलत्या वेळेनुसार आज भारतीय तरुणींचे विचारही बदलत आहेत. जी एक चांगली गोष्ट आहे. आता त्या आधीसारख्या केवळ 'हो' ला 'हो' लावत नाहीत.
(Image Credit : crescentproject.org)
बदलत्या वेळेनुसार आज भारतीय तरुणींचे विचारही बदलत आहेत. जी एक चांगली गोष्ट आहे. आता त्या आधीसारख्या केवळ 'हो' ला 'हो' लावत नाहीत. लग्नाआधी त्यांना त्यांच्या होणाऱ्या जोडीदारासमोर त्यांचे काही विचार आणि अटीही ठेवायच्या आहेत. जेणेकरुन पुढे जाऊन त्यांना कोणत्याही प्रकारच्या अडचणींचा सामना करावा लागू नये.
शादी डॉट कॉमने भारतातील सिंगल तरुणींचे विचार जाणून घेण्यासाठी, लग्नाबाबत त्यांचे विचार जाणून घेण्यासाठी एक सर्व्हेक्षण केलं. शादी डॉट कॉमच्या या ऑनलाइन सर्व्हेमध्ये २५ ते ३४ वर्षाच्या १२ हजार ५०० पेक्षाही जास्त सिंगल तरुणींनी उत्तरे दिली. सिंगल तरुणींना विचारले गेले की, लग्नासाठी 'हो' म्हणण्याआधी त्यांच्या काही अटी आहेत का? यावर ७१.३ टक्के तरुणींनी 'हो' असं उत्तर दिलं. ५.८ टक्के तरुणींनी नाही असं उत्तर दिलं. तर २२.९ टक्के तरुणींनी विचार करावा लागेल असं उत्तर दिलं.
या सर्व्हेनुसार, काही अटींमध्ये लग्नानंतर नाव न बदलण्याची अट, लग्नानंतर स्वतंत्र राहण्याची इच्छा, पुरुषाने परिवाराची जबाबदारी घ्यावी, तिच्या आई-वडिलांना त्याच्या आई-वडिलांसारखाच मान देणे यांसारख्या अटी प्रामुख्याने होत्या.
शादी डॉट कॉमचे सीइओ गौरव रक्षित यांनी याबाबत सांगितले की, या सर्व्हेतून हे समोर आलं की, भारतीय मानसिकता कशाप्रकारे बदलत आहे. भारतीय तरुणी आता बहुआयामी व्यक्तिमत्वाच्या रुपात समोर येत आहेत आणि आपल्या निवडीबाबत अधिक आत्मविश्वासू आहेत.