मुला-मुलींचं भविष्य उज्ज्वल करण्यासाठी त्यांना लावा 'या' ५ सवयी!
By ऑनलाइन लोकमत | Published: November 3, 2018 12:10 PM2018-11-03T12:10:19+5:302018-11-03T12:11:27+5:30
प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की, त्यांच्या मुला-मुलींनी भविष्यात खूप मोठं व्हावं. अलिकडे तर पालक शिक्षणासोबतच आपल्या मुलांना खेळ आणि कलेसाठीही प्रोत्साहन देताना दिसत आहेत.
प्रत्येक पालकांचं स्वप्न असतं की, त्यांच्या मुला-मुलींनी भविष्यात खूप मोठं व्हावं. अलिकडे तर पालक शिक्षणासोबतच आपल्या मुलांना खेळ आणि कलेसाठीही प्रोत्साहन देताना दिसत आहेत. पुढे जाऊन आपल्या मुला-मुलींनी यश मिळवावं, नाव कमवावं हाच त्यांचा उद्देश असतो. त्यासाठी जमेल ते प्रयत्न करत असतात.
मुलांना यशाच्या पायऱ्या चढताना पाहायचं असेल तर त्यासाठी मुलांना काही गोष्टी बालपणापासूनच शिकवणे गरजेचे आहे. त्यांना यशस्वी झालेलं बघण्यासाठी काही बाबतीत तुम्हाला कठोर व्हावं लागतं. बालपणापासूनच तुम्हाला त्यांना काही सवयी लावाव्या लागतील. त्या कोणत्या सवयी आहेत हे आपण पाहुयात...
१) जिद्द
शाळेचा होमवर्क असो वा घरातील काही काम असो मुला-मुलींना हे शिकवा की, कोणतही काम करताना ते काम पूर्ण लक्ष देऊन करावं. तेव्हाच ते काम पूर्णत्वास जातं. तसंच कोणतही काम करण्यात मजा येते. याची सवय त्यांना लागली तर त्यांचं भविष्य उज्ज्वल होण्यास त्यांना याची मदत होईल.
२) स्वच्छता
आपल्या आजूबाजूला स्वच्छता ठेवणे ही केवळ एक चांगली सवयच नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर गोष्ट आहे. तुमच्या मुलांना त्यांच्या रुम्स स्वच्छ ठेवण्यासोबतच वस्तू जागेवर कशा ठेवायच्या याची सवय लावा. तसेच त्यांना स्वत:ची स्वच्छता कशी कराल हेही सांगा, इतकेच नाही तर त्यांचं महत्त्व सुद्धा पटवून सांगा.
३) जबाबदारी
अनेकदा तुम्ही पाहिलं असेल की, लहान मुलं खेळण्यासाठी त्यांची खेळणे बाहेर काढतात आणि खेळून झालं की, ती खेळणी तशीच त्या जागेवर ठेवतात. त्यांना जर त्यांच्या वस्तू जागेवर ठेवण्याची बालपणापासून सवय लावली तर त्याचा त्यांनाच फायदा होणार. त्यांना जबाबदारीची जाणीव होणार.
४) वेळचं महत्त्व
मुलांना वेळेचं महत्त्व शिकवणं फार गरजेचं आहे. हा वेळ तुम्ही योजना करुन खर्च केला तर त्याचा फायदा कसा होतो हे त्यांना शिकवा. वेळेचं महत्त्व शिकवणे हे त्यांच्यासाठी यशाची एक एक पायरी चढण्यासारखं आहे. त्यांना त्यांचा टाइमटेबल कसा करावा आणि त्यांच नियोजन कसं करावं हे शिकवा. या छोट्या छोट्या सवयी त्यांना वेळीच किंमत करायला शिकवतील.
५) बडेजाव
व्यक्तीने नेहमी सत्याची साथ दिली पाहिजे आणि आपल्या आत सत्याला जिवंत ठेवलं पाहिजे. जे त्यांच्याकडे आहे त्याचा बडेजाव किंवा दिखावा करु नये. मुलांना हे शिकवा की, सत्याची कास धरुन जीवन जगण्यात काय आनंद मिळतो. खोटं आणि दिखाव्याचं जगणं हे काही क्षणांचं असतं, हे त्यांना शिकवा.