मुलींच्या तुलनेत मुलं असतात जास्त रागीट - रिसर्च
By ऑनलाइन लोकमत | Published: December 14, 2018 01:36 PM2018-12-14T13:36:03+5:302018-12-14T13:37:03+5:30
संयुक्त राष्ट्र संघाची संस्थाय यूनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, १० ते १९ दरम्यान वय असलेल्या तरुणांची जगभरात एकूण १२० कोटी इतकी आहे.
संयुक्त राष्ट्र संघाची संस्थाय यूनिसेफच्या एका रिपोर्टनुसार, १० ते १९ दरम्यान वय असलेल्या तरुणांची जगभरात एकूण १२० कोटी इतकी आहे. यूनिसेफचा हा रिपोर्ट सांगतो की, २०११ च्या जनगणनेनुसार, भारतात तरुणांची संख्या २४ कोटींपेक्षा अधिक आहे. ही आकडेवारी भारताच्या लोकसंख्येचा एक चतुर्थांश भाग आहे. इतकेच नाही तर जगभरात सर्वात जास्त तरुण मंडळी ही विकसनशील देशांमध्येच आहे.
मुलांमध्ये असतो जास्त राग
लहान मुलांमध्ये रागीट स्वभाव हा त्यांच्या वयानुसार बदलत असतो. २०१४ मध्ये इंडियन जर्नल सायकॉलॉजिकल मेडिसीनमध्ये प्रकाशित एका रिसर्चनुसार, मुलांमध्ये मुलींच्या तुलनेत अधिक राग बघायला मिळतो. या रिसर्चमध्ये सहभागी असलेल्या १६ ते १९ वयोगटातील तरुणांमध्ये जास्त राग बघायला मिळाला. तर ज्या समूहाचं वय २० ते २६ वर्ष होतं, त्यांच्यात थोडा कमी राग बघायला मिळाला.
ही आकडेवारी दर्शवते की, किशोरावस्थेत अधिक राग बघायला मिळतो. त्याचप्रमाणे मुलींच्या तुलनेत मुलांमध्ये अधिक राग बघायला मिळतो. मात्र, या रिसर्चमधून हेही समोर आलं आहे की, १२ ते १७ वयोगटातील साधारण १९ टक्के मुली शाळेत कोणत्या ना कोणत्या भांडणात सहभागी असतात. हा रिसर्च भारतातील ६ प्रमुख शहरातील शाळांमधील तरुणांवर करण्यात आला. यात दिल्ली, बंगळुरु, जम्मू, इंदोर, केरळ, राजस्थान आणि सिक्कीममधील तरुणांचा समावेश होता.
काय आहे कारण?
मोबाइल गेमचा प्रभाव - मानसोपचारतज्ज्ञ लहान मुलं हिंसक होण्यामागे वेगवेगळी कारणे सांगतात. सर्वात मोठं कारण हे जाणून घेणं आहे की, लहान मुलांचे पालक त्यांच्यांवर किती नजर ठेवतात. मोठ्या शहरांमध्ये पालक आपल्या मुलांवर व्यवस्थित लक्ष ठेवू शकत नाहीत. लहान मुलांना व्यस्त ठेवण्यासाठी त्यांना मोबाइल फोन दिला जातो. त्यामुळे मुलं मोबाइलवर हिंसक प्रवृत्तीचे गेम खेळू लागतात.
२०१० मध्ये अमेरिकेतील सुप्रीम कोर्टाने निर्णय घेतला होता की, लहान मुलांना असे व्हिडीओ खेळू देऊ नये, ज्यातून हिंसक प्रवृत्तीसारख्या हत्या किंवा यौन हिंसेला प्रोत्साहन मिळेल. या निर्णयाच्या पाच वर्षांआधी कॅलिफोर्नियाच्या गव्हर्नरांनी त्यांच्या राज्यात व्हायलेंट व्हिडीओ कायदा केला होता. ज्यात १८ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना हिंसक व्हिडीओ गेमपासून दूर ठेवण्याचा उल्लेख होता.
आई-वडिलांचं नातं - जेव्हा लहान मुलं बघतात की, त्यांचे आई-वडील त्यांना शांत आणि सभ्य राहण्यासाठी सांगतात, पण स्वत: भांडणं करत असतात. त्यामुळे ते पाहून मुलंही राग आल्यावर हिंसक होतात. लहान मुलांचा मेंदू यावर अडलेला असतो की, सर्व गोष्टी त्यांच्या नुसारच व्हायला हव्यात. असं झालं नाही तर ते वेगळ्या प्रकारे प्रतिक्रिया देतात.