जेव्हा तुमचा पार्टनर तुमच्यावर संशय करत असेल किंवा नेहमीपेक्षा जास्त प्रश्न विचारत असेल तर तो असं वागण्याचं कारण म्हणजे त्याला असुरक्षित वाटतंय. जर तुम्ही अशावेळी त्याला किंवा विश्वास देऊ शकले नाही तर हे नातं तुटू शकतं. अशाच तीन गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. ज्यावरून तुम्ही ओळखू शकता की, तुमच्या पार्टनरला नात्याबाबत असुरक्षितता वाटत आहे. हे संकेत वेळी ओळखले तर तुम्ही नातं तुटण्यापासून वाचवू शकता.
सतत फोन बिझी का असतो?
काही लोकांना त्यांचा पार्टनर फोनवर जास्त बिझी राहिल्याने त्याच्यावर शंका येते. पण तुम्ही हे समजून घ्यायला हवं की, तुमच्या पार्टनरच्या आयुष्यात काही मित्र, नातेवाईक आणि लोक असतीलच ज्यांच्याशी तो किंवा ती बोलत असले. तुम्ही त्याच्या लाइफमध्ये आल्यावर तो ती नाती तर तोडू शकत नाही ना. जर तुम्हाला खरंच काही चुकीचं वाटत असेल तर तुम्ही दोघांनी यावर संवाद साधला पाहिजे.
दिवसभर ऑनलाइन राहतो, काय करतो?
आजकाल अनेक नाते हे सोशल मीडियावर तयार होतात. कधी कधी तर ही नाती तयार झाल्यावरही काही लोक सोशल मीडियातच अधिक वेळ घालवतात. अशात जेव्हा नातं नवं नवं असतं तेव्हा आपल्या सोबतच त्याने किंवा तिने बोलावं असं वाटत असतं. पण यामुळे गैरसमजही होऊ शकतात. अनेकांना असं वाटत असतं की, पार्टनर त्यांना इग्नोर करतोय. पण तसं नसेल तर नातं गैरसमजामुळे अडचणीत येऊ शकतं.
मित्रांनी मित्रासारखं रहावं
अनेकदा जेव्हा पार्टनर आपल्या मित्रांसोबत मोकळेपणाने हसतात आणि बोलतात, एकटे फिरायला जातात किंवा त्यांच्या घरी थांबतात या गोष्टी वाईट वाटू लागतात. अशात तुमचं डोकं मित्राच्या लिमिटबाबत विचार करू लागतं. पण मुळात असं असतं की, मैत्रिच्या नात्यात कोणतीही लिमिट नसते. अशावेळी गैरसमजातून अशा काही गोष्टी बोलल्या जातात ज्यामुळे पार्टनर्सला वाईट वाटून जातं. याने नातं अडचणीत येतं. त्यामुळे आपल्या पार्टनरवर विश्वास ठेवा आणि कोणताही ठोस पुरावा असल्याशिवाय गैरसमज करून घेऊ नका.
गैरसमज दूर होणे गरजेचे
असे कितीतरी गैरसमज आहेत ज्यामुळे अनेकांचं नातं सुरू होण्यापूर्वी बिघडायला लागतं. त्यामुळे अशा वाईट गोष्टी मनात येऊ देऊ नका आणि पार्टनरला असं काही बोलू नका ज्यामुळे त्यांना हर्ट होईल. काही वेळी पार्टनरबाबत तुम्हाला येणारी शंका बरोबरही असू शकते, पण अशावेळी पार्टनरसोबत थेट बोलावं. स्वत:हून काही शोधण्याच्या नादात तुम्ही नातं अडचणीत आणू शकता.