अनेक रिसर्चमधून हे समोर आलं आहे की, मुलांपेक्षा मुली जास्त फ्लर्टिग करतात. पण तुम्हाला जर वाटत असेल की, तुम्ही कोणत्याही मुलाला तुमच्याकडे आकर्षित करू शकता, तर तुम्ही चुकताय. कारण योग्य पद्धतीने फ्लर्टिग येणे गरजेचं आहे. फ्लर्टिंग करण्याचे काही नियम आहेत. जर हे नियम तुमच्या लक्षात आलेत तर समोरच्या व्यक्तीच्या मनात घर करायला जराही वेळ लागणार नाही. फ्लर्टिंग जर मजेदार होऊ शकते तर तुम्हाला अडचणीतही टाकू शकते. त्यामुळे फ्लर्टिंग करताना काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे.
सर्वातआधी महत्त्वाचं असतं ते स्वत:ला समजून घेणं. आधी स्वत:चं मूल्यांकन करा. तुम्हाला तुमच्या काही कमतरता दिसत असतील त्या दूर करा. त्यानंतर तुम्ही फ्लर्टिंग करा. पण ज्यांच्यासोबत फ्लर्टिंग करणार आहात तो तुमच्यासाठी योग्य आहे की नाही हे आधी जाणून घ्या.
समोरच्याचं नेचर समजून घ्या
असं नाहीये की, तुम्ही उठाल आणि कुणासोबतही फ्लर्टिंग सुरू कराल. पण तरीही तुम्हाला याची काळजी घ्यावी लागेल की, तुम्ही कुणासोबत फ्लर्टिंग करत आहात. अन्यथा तुम्हाला महागात पडू शकतं. काही मुलांना हे अजिबात आवडत नाही की, एखाद्या मुलीने त्यांच्यासोबत फ्लर्ट करावं. तुम्हाला प्रत्येक मुलासोबत बोलणं तुम्हाला कमी करावं लागले.
कॉमन सेन्स आणि ह्यूमर
फ्लर्टिंगचा सर्वात चांगला फंडा म्हणजे सिंपल राहणे. म्हणजे तुमच्या बोलण्यात गंभीरता कमी आणि गंमत अधिक असावी. पण बोलताना असं काही बोलू नका की, समोरच्या व्यक्तीला कळायला उशीर लागेल किंवा समजणारच नाही. त्यासाठी तुम्हाला कॉमन सेन्ससोबतच ह्यूमरचा वापर करता यायला हवा. फ्लर्टिंग तेव्हाच चांगली केली जाऊ शकते, जेव्हा समोरची व्यक्ती तुमच्यासोबत सहज वाटेल. जर त्या व्यक्ती तुमच्यासोबत सहज किंवा मोकळेपणा वाटत असेल तरीही तुम्ही पुढाकार घेणे गरजेचे असते. तुम्हाला तुमची कम्फर्ट लेव्हल तयार करणे गरजेचं असतं.
वेळ चुकीची असू नये
फ्लर्टिंगसाठी वेळही महत्त्वाची असते. वेळेचं भान ठेवून फ्लर्टिंग केलं पाहिजे. छोट्याशा चुकीमुळेही तुम्ही अडचणीत येऊ शकता. त्यामुळे गरजेचं आहे की, योग्य वेळेची वाट बघा. त्यासाठी आधी तुम्हाला वातावरण समजून घ्यायला हवं आणि समोरच्या व्यक्तीच्या आवडी-निवडीवर लक्ष द्यायला हवं.
पुढाकार घेण्यास संकोच नको
काही तरूणी फ्लर्टिंगमध्ये पुढाकार घेण्यास संकोच व्यक्त करतात. कारण त्यांना असं वाटत असतं की, समोरचा तरूणाला स्वत:हून फ्लर्टिंगचा पुढाकार घेणाऱ्या मुली पसंत नसतील. पण मजेदार बाब ही आहे की, जास्तीत जास्त तरूणांना त्याच मुली अधिक आवडतात, ज्या फ्लर्टिंगसाठी स्वत:हून पुढाकार घेतात. हेही लक्षात घ्या की, फ्लर्टिंग करताना तरूण त्याच मुलींसोबत अधिक फ्लर्ट करतात ज्या स्टाइलमध्ये राहतात. त्यामुळे तुम्हाला तुमच्या स्टाइलवरही लक्ष द्यावं लागेल.
मोठी स्माइल म्हणजे इंटरेस्ट
हास्याने प्रत्येकाचच मन जिंकलं जातं. त्यामुळे जेव्हाही कुणासोबत फ्लर्ट करायचं असेल तर मोकळेपणाने हसा. कारण मुलांना मुलींचं मोकळेपणाने हसणं पसंत असतं. तो समोर बसला असले तर त्याच्याकडे बघून स्माइल करा. उत्तरादाखल समोरूनही स्माइल आली तर समजून घ्या की, फ्लर्टिंगमध्ये तुम्हीही यशस्वी झाला आहात.
फ्लर्टिंगमध्ये फिल गुड फॅक्टर
फ्लर्ट हा शब्द ऐकून अनेकांच्या मनात हाच विचार येतो की, समोरची व्यक्ती तुम्हाला प्रभावित करण्यासाठी तुमचं खोटं कौतुक करत आहे. जास्तीत जास्त लोकांना हे नकारात्मक वाटतं. पण तुम्हाला आश्चर्य वाटेल की, फ्लर्टिंगमध्ये एक फिल गुड फॅक्टर असतो, तुमच्यासोबत समोरच्या व्यक्तीलाही एनर्जेटिक करतो.