ऑफिसमधील सहकाऱ्यावर मन आलंय? या गोष्टींची घ्या काळजी!

By ऑनलाइन लोकमत | Published: October 1, 2018 12:54 PM2018-10-01T12:54:49+5:302018-10-01T13:01:20+5:30

ऑफिसमधील सहकाऱ्याला डेट करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत.

These tips will help in blooming office romance | ऑफिसमधील सहकाऱ्यावर मन आलंय? या गोष्टींची घ्या काळजी!

ऑफिसमधील सहकाऱ्यावर मन आलंय? या गोष्टींची घ्या काळजी!

googlenewsNext

(Image Credit : www.humanresourcesonline.net)

ऑफिसमधील सहकाऱ्याला डेट करण्याचे फायदेही आहेत आणि नुकसानही आहेत. जेव्हा तुम्ही ऑफिसमध्ये आपला सर्वात जास्त वेळ घालवता तेव्हा सहाजिकच आहे की, तुमचा कुणी ना कुणी खास फ्रेन्ड असतो किंवा असेही म्हणूया की, तुम्हाला पहिल्या नजरेतच कुणी आवडायला लागतं. पण ऑफिसमधील रिलेशनशिप योग्य मार्गाने गेलं नाही तर तुम्ही ऑफिसमध्ये गॉसिपचं कारण ठरु शकता. जर तुम्हालाही ऑफिसमधील सहकाऱ्याशी प्रेम झालंय तर या काही टिप्सच्या माध्यमातून तुम्ही परिस्थिती योग्यप्रकारे हाताळू शकता. 

लगेच करु नका खुलासा

सर्वात पहिली आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर ऑफिसमध्ये तुम्हाला कुणी पसंत असेल किंवा कुणावर मन आलं असेल तर कुणालाही लगेच याबाबत सांगू नका. खासकरुन तेव्हा जेव्हा तुम्ही स्वत: तुमच्या नात्याला समजून घेत असता. आपल्या सहकाऱ्याला जाणून घेण्यासाठी वेळ घ्या आणि जेव्हा तुम्ही स्वत: यासाठी तयार असाल किंवा तुम्हाला वाटत असेल की, ती व्यक्ती तुमच्यासाठी परफेक्ट आहे तेव्हाच तुम्ही इतरांना सांगा. हेही लक्षात ठेवा की, प्रत्येक ऑफिसमधील पॉलिसी डेटिंग फ्रेन्डली नसते. 

पर्सनल आणि प्रोफेशनल लाइफ वेगळं ठेवा

जर तुमचं नातं अडचणीत असेल तर जे काही भांडणं किंवा समस्या आहेत त्या ऑफिस बाहेर सोडवा. आपल्या नात्यातील अडचणी, तुमचे वाद ऑफिसमधील लोकांसमोर नका येऊ देऊ. ऑफिसमध्ये पार्टनरसोबत जास्त क्लोज होऊन बसणे किंवा याप्रकारच्या काही गोष्टी टाळा. कारण याने तुमच्या इमेजवर प्रभाव पडू शकतो. 

ऑफिस ई-मेल किंवा चॅटवर पर्सनल गोष्टी

वेळचं भान ठेवून संवाद साधा. म्हणजे जर तुम्ही ऑफिसमध्ये आहात तर कामासंबंधीच जास्त बोला. जर कधी पर्सनल बोलणी करायची असेल तर ऑफिशिअल ई-मेल किंवा चॅटचा वापर करणं टाळा. कारण तुमचा ई-मेल, चॅट किंवा नंबर ट्रॅक केला जाऊ शकतो. 

इतरांसोबत लव्ह लाइफ शेअर करु नका

सगळ्यांच्याच लाइफमध्ये काहीना काही समस्या, अडचणी असतात. पण याचा अर्थ हा नाही की, आपल्या लव्ह लाइफबाबत इतर सहकाऱ्यांशी चर्चा करावी किंवा त्यांच्याकडे तक्रार करावी. कदाचित तुमच्या पाठीमागे तुमच्या याच गोष्टींवर गॉसिप होऊ शकते. 

ऑफिसमध्ये रिलेशनशिप वर्क होत नसेल तर

जर तुम्हाला वाटत असेल की, तुमचं रिलेशनशिप वर्क होत नाहीये. तर यावर शांतपणे चर्चा करुन हे आनंदाने वेगळे व्हावे. याबाबत कुणाशी चर्चा करत बसू नका. हे जरा कठीणच आहे पण पुढे लाइफ आणखी किचकट करण्यापेक्षा वेळीच या नात्यातून बाहेर पडलेलं बरं. 

एकाच टिममध्ये काम करत असाल तर..

जर तुम्ही एकाच टिममध्ये काम करत असाल किंवा एकाच प्रोजेक्टवर काम करत असाल तर दोघांमध्ये स्पर्धा सुरु होऊ शकते. इतकेच नाही तर विचारांवरुनही समस्या होऊ शकतात. तसेच तुम्ही ऑफिसमधील राजकारणाचीही शिकार होऊ शकता. अशात दोघांनी योग्य प्रकारे बोलणे महत्त्वाचे आहे. या संधीचा फायदा नातं मजबूत करण्यासाठी घ्यावा. 
 

Web Title: These tips will help in blooming office romance

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.