नात्यामध्ये प्रत्येकालाच आपल्या पार्टनरकडून अपेक्षा असतात. प्रत्येकवेळी आपण ऐकतो की, मुली आपल्या पार्टनरकडून खूप अपेक्षा ठेवतात. पण हा गैरसमज चुकीचा आहे. मुलांनाही आपल्या पार्टनरकडून फार अपेक्षा असतात. फरक फक्त इतकाच असतो की, मुलं मुलींप्रमाणे आपल्या अपेक्षा लगेच एक्सप्रेस करत नाहीत. पण जर त्यांच्या मनातल्या गोष्टी पार्टनरने समजून घेतल्या तर त्यांना फार आनंद होतो. जाणून घेऊयात अशा काही गोष्टी ज्या प्रत्येक मुलाला आपल्या पार्टनरच्या तोंडून ऐकायला आवडतात.
1. तुझ्यासोबत सुरक्षित वाटतं
प्रत्येक मुलाची अपेक्षा असते की, त्याची पार्टनर त्याच्यासोबत सुरक्षित फिल करावं. तिने स्वतः त्याच्यासोबत असताना ती फार सुरक्षित फिल करते असं सांगणं त्याला अपेक्षित असतं.
2. तुझा लूक बेस्ट असतो
मुलींना चांगलं तयार व्हायला फार आवडतं. जेव्हा त्या आपल्या बॉयफ्रेंन्डला भेटण्यासाठी जातात तेव्हा त्यांचा प्रयत्न सुंदर दिसण्याचाच असतो. जेणेकरून त्यांचा बॉयफ्रेंन्ड त्यांची तारिफ करेल. पण मुलांच्याही अपेक्षा अशाच असतात. त्यांनाही असं वाटत असतं की, त्याच्या गर्लफ्रेंडने त्यांच्या ड्रेसिंग स्टाईल, लूक आणि फिटनेसवरून त्यांची तारिफ करावी.
3. तुझी सोबतच पुरेशी आहे
रिलेशिपनंतर काही दिवसांनी भाडणं वाढू लागतात. तेव्हा मुली चटकन म्हणून जातात की, आता तू पहिल्यासारखा नाही राहिलास. तू माझ्यावर प्रेम करत नाहीस. पण प्रत्येक मुलाची अशी इच्छा असते की, त्याच्या गर्लफ्रेंन्डने असं म्हणावं की, मला फक्त तुझीच साथ पाहिजे, त्याशिवाय दुसरं काही नको.
4. तू माझा बेस्ट फ्रेंड आहे
गर्लफ्रेंड असो किंवा बायको, मुलं फार पझेसिव्ह असतात. त्यांची इच्छा असते की, तिनं आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. तसेच ती आपल्या सतत सोबत हवी असंही त्यांना वाटत असतं. अशातच जर तिने इतरांपेक्षा तू माझा बेस्ट फ्रेंड आहेस असं म्हटलं तर ते फार खूश होतात.
5. माझा तुझ्यावर विश्वास आहे
प्रत्येक नातं हे विश्वासाच्या जोरावर टिकून असतं. एखाद्याचा विश्वास जिंकणं फार कठीण आहे. परंतु हे प्रत्येक नात्यासाठी महत्त्वाचंही असतं. अशातच जर पार्टनर मुलाला येऊन म्हणाली की, माझा तुझ्यावर विश्वास आहे. तर मुलं फार खूश होतात.