(Image Credit : pixabay.com)
आपल्या एक्ससोबत मित्र बनून राहणे फारच कठिण काम आहे. कारण त्यांच्या संपर्कात राहिल्याने जुन्या आठवणींना उजाळा मिळत राहतो. अनेकांना पुढे नव्याने लाइफ सुरु करायला अडचणी येतात. इतकी वर्ष रिलेशनशिपमध्ये राहणे आणि नंतर वेगळं होऊन परत त्या व्यक्तीसोबत मित्रासारखं बोलणं, राहणं फार कठिण होतं.
फार कमी लोकांना ही स्थिती सांभाळणं जमतं. पण तुम्हाला जर खरंच तुमच्या एक्ससोबत मित्र बनून रहायचं असेल तर काही गोष्टींची काळजी घेणे फार महत्त्वाचे आहे. चला जाणून घेऊ त्या काही गोष्टी....
जुन्या आठवणींचा विषय काढू नका
कधीही आपल्या एक्ससोबत जुन्या गोष्टींवर बोलू नका. असे केल्याने तुमच्या जुन्या आठवणी ताज्या होतील. सोबत घालवलेले क्षण, प्रेमाच्या गप्पा आठवतील. आणि यामुळे तुमच्या मैत्री करण्याच्या प्रयत्नावर पाणी फेरलं जाऊ शकतं.
नवीन पार्टनरबाबत
जर खरंच तुम्हाला तुमच्या एक्ससोबत मैत्री करायची असेल तर कधीही तिच्या लव्हलाइफबाबत काही विचारु नका आणि आपल्या बाबतही काही सांगू नका. याने ती व्यक्ती इमोशनलही होऊ शकते. याने तुमची मैत्री होऊ शकणार नाही.
पॅचअप
अनेक कपल्स काही कारणांनी वेगळे होतात, पण चांगले मित्र म्हणून सोबत राहतात. अनेकदा चांगल्या मैत्रीमुळे या मैत्रीला पुन्हा नात्यात नात्यात बदलण्याचा निर्णय घेतात. जो तुमच्या मैत्रीसाठी चुकीचा निर्णय ठरु शकतो.