Valentine Day : ७ फेब्रुवारीला पहिला रोज डे, जाणून घ्या कोणत्या दिवशी कोणता डे!
By ऑनलाइन लोकमत | Published: February 6, 2019 04:27 PM2019-02-06T16:27:21+5:302019-02-06T16:30:10+5:30
फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डे ची.
(Image Credit : The News Recorder)
फेब्रुवारी महिन्याला सुरूवात झाली की, तरूणांमध्ये उत्सुकता असते ती १४ फेब्रुवारीची म्हणजेच व्हॅलेंटाइन डे ची. पण या व्हॅलेंटाइन डे ची सुरूवात एका आठवड्यापूर्वीच होते. लोक आपल्या पार्टनरला फूल, गिफ्ट देऊन प्रेम व्यक्त करतात. कुणी पार्टनरला रोमॅंटिक डेटला घेऊन जातं. चला जाणून घेऊ कोणत्या दिवशी कोणता डे साजरा केला जाणार आहे.
व्हॅलेंटाइन डे चा इतिहास
व्हॅलेंटाइन डे साजरा करण्याचा इतिहासही फारच रोमांचक आहे. तिसऱ्या शतकात रोममध्ये एक क्लॉडिअस नावाचा राजा होता. हा राजा फारच कठोर होता. त्याचं मत होतं प्रेम आणि लग्न हे मनुष्याला कमजोर करतात. त्याने त्याच्या सैनिकांना लग्न आणि प्रेम न करण्याचा आदेश दिला होता.
क्लॉडियसच्या राज्यात एक संत होते. त्यांचं नाव होतं व्हॅलेंटाइन. त्यांनी राजाच्या आदेशाला न जुमानता प्रेमाचा प्रसार आणि प्रचार करण्यास सुरूवात केली. इतकेच काय तर काही सैनिकांचं लग्नही करून दिलं. जेव्हा राजाला याची माहिती मिळाली तेव्हा राजाने संत व्हॅलेंटाइनला फाशीची शिक्षा दिली. १४ फेब्रुवारीला त्यांना फाशी देण्यात आली होती. तेव्हापासून हा दिवस प्रेमदिवस म्हणून साजरा केला जातोय.
व्हॅलेंटाइन डे वीक
७ फेब्रुवारी - रोज डे
८ फेब्रुवारी - प्रपोज डे
९ फेब्रुवारी - चॉकलेट डे
१० फेब्रुवारी - टेडी डे
११ फेब्रुवारी - प्रॉमिस डे
१२ फेब्रुवारी - हग डे
१३ फेब्रुवारी - किस डे
१४ फेब्रुवारी - व्हॅलेंटाइन डे