रिलेशनशिपमध्ये अनेक मुलांची अशी तक्रार असते की, त्यांची गर्लफ्रेंड छोट्या-छोट्या गोष्टींवरून रूसून बसते. कधी कधी तर अचानक फार रागावते. अशावेळी तिला समजावण्यासाठी फार कसरत करावी लागते. अनेकदा तर अशा प्रकारामुळे मुलंही रागावात आणि त्यामुळे नात्यामध्ये दुरावा येतो.
खरं तर असं सांगण्यात येतं की, काही मुलींचा स्वभाव प्रचंड मूडी असतो. त्यांना फार राग येतो. छोट्या-छोट्या गोष्टी त्या मनाला लावून घेतात आणि उदास होतात. अनेक मुलीं तर नुसत्या रूसुबाई असतात. परंतु जर पार्टनरने प्रेमाने समजावलं तर त्या आपला राग विसरून जातात. पण अशा गर्लफ्रेंडला हॅन्डल करताना बॉयफ्रेंडच्या तर नाकी अगदी नऊ येतात. जर तुमचीही गर्लफ्रेंड अशीच रूसुबाई किंवा नखरेवाली असेल तर, आज आम्ही काही खास टिप्स सांगणार आहोत. ज्यांच्या मदतीने तुम्ही त्यांचे सर्व नखरे हॅन्डल करून तुमचं नातं आणखी खुलवू शकाल.
1. सर्वात आधी स्वतःला समजावून सांगा जर तुमची गर्लफ्रेंड मूडी असेल तर सर्वात आधी तुम्ही स्वतःला समजावून सांगा. असं सांगितलं जातं की, अशा मुली सतत छोट्या छोट्या कारणांवरून नाराज होतात. रूसतात, चिडचिड करतात. ज्यादिवशी तुम्ही स्वतःला या सर्व गोष्टी समजावून सांगाल त्यावेळी तुम्ही या सर्व गोष्टी हॅन्डल करण्यासाठी मानसिकरित्या तयार व्हाल.
2. गर्लफ्रेंडचा मूड नक्की कधी खराब होतो हे जाणून घ्या
दिवसभरामध्ये तुमच्या गर्लफ्रेंडचा मूड नक्की कधी खराब होतो, हे जाणून घ्या. व्यवस्थित ऑब्जर्व करा. यादरम्यान तिला अशी कोणतीही गोष्ट सांगू नका, ज्यामुळे तिचा मूड आणखी खराब होईल. कारण अशावेळी तिचा राग आणखी वाढू शकतो. असं झालं तर तुम्हाला परिस्थिती हॅन्डल करणं आणखी कठिण होईल.
3. रागामध्ये ती काही बोलली तर ऐकून घ्या
जेव्हा तुम्ही जाणून घेता की, तुमची गर्लफ्रेंड मूडी आहे, त्यावेळी तुम्ही स्वतः सर्व गोष्टी हॅन्डल करण्यासाठी तयार असणं आवश्यक आहे. खराब मूडमध्ये ती काही म्हणाली तर ते शांतपणे ऐकून घेणं गरजेचं आहे. ज्यावेळी मूड नॉर्मल होईल त्यावेळी तिच्याशी प्रेमाने बोलून समजावण्याचा प्रयत्न करा.
4. तिच्यासमोर हट्टीपणा करू नका
गर्लफ्रेंड मूडी होत असेल तर परिस्थिती व्यवस्थित लक्षात घेऊन हाताळा. जर तुम्हीही तिच्यासारखेच वागलात तरमात्र परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते. तुम्हाला तिचं म्हणणं ऐकायचं नसेल तर नका ऐकू. पण तिच्यावर कोणत्याच गोष्टीसाठी जबरदस्ती करू नका.
5. रागावर नियंत्रण ठेवा.
जेव्हाही तुमची गर्लफ्रेंड मूड होत असेल, चिडचिड करत असेल किंवा प्रचंड रागात असेल, त्यावेळी तुम्ही स्टेबल असाल तरच तिथे थांबा. नाहीतर तिच्या समोर थांबू नका. काही लोकांना एकट्यामध्ये स्वतःचा मूड सावरून घेण्याची सवय असते. थोड्या वेळानंतर जाऊन तिला प्रेमाने समजावून सांगा.
टिप : वरील सर्व गोष्टी आम्ही केवळ माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. यातून आम्ही कोणताही दावा करत नाही. त्यामुळे कोणताही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणं फायदेशीर ठरतं.