Lokmat Sakhi >Beauty > केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...

केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...

Home remedies for hair loss on hairline : केस गळून गळून कपाळ खूपच मोठे दिसते, करुन पाहा हा उपाय...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2023 08:37 PM2023-09-18T20:37:17+5:302023-09-18T20:59:07+5:30

Home remedies for hair loss on hairline : केस गळून गळून कपाळ खूपच मोठे दिसते, करुन पाहा हा उपाय...

1 Best Natural Home Remedies to Prevent from Your Hair Loss on hairline Permanently. | केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...

केस गळाल्याने कपाळ खूप मोठे दिसते ? कपाळावरची केस गळती थांबवण्यासाठी १ सोपा उपाय...

सध्या आपल्यापैकी बरेचजण केसांच्या अनेक छोट्या - मोठ्या समस्यांमुळे हैराण झालेले दिसतात. केसांच्या समस्या या एक प्रकारच्या नसून अनेकांना वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या सतावत असतात. केसगळती, कोंडा, टक्कल पडणे, केस रुक्ष - निस्तेज होणे असे असंख्य प्रॉब्लेम्स केसांच्या बाबतीत असतात. यातील केस गळतीची समस्या खूपच कॉमन असलेली पहायला मिळते. काहींचे केस हे बरोबर डोक्याच्या मध्यभागी गळून टक्कल पडते, तर काहींचे केस संपूर्णच गळू लागतात. यासोबतच डोक्याच्या पुढील भागातील केस गळण्याची समस्या जास्त करून स्त्रियांमध्ये दिसून येते. स्त्रियांचे डोक्याच्या समोरील भागांतील केस हळूहळू गळू लागतात आणि मग कमी झालेले केस चटकन दिसून येतात(How can I reduce hair loss on my hairline?)

डोक्याच्या पुढील बाजूने केस गळणे हा अत्यंत कॉमन प्रकार आहे. पुढील बाजूने केस (1 Simple Way to Prevent and Treat a Receding Hairline) गळण्याचे प्रमुख कारण अनुवंशिक असू शकते. पण या शिवाय व्हिटॅमिन ए ची कमतरता, प्रोटीनची कमी तसेच अधिक स्ट्रेस मध्ये राहणे यामुळे सुद्धा फ्रंट साईड हेअर लॉस (Home remedies for hair loss on hairline) होऊ शकते. या शिवाय चुकीची आहारपद्धती व जीवनशैली देखील पुढील बाजूने मोठ्या प्रमाणात केस गळण्यास कारणीभूत आहेत. फ्रंट साईड हेअर लॉस (Home Remedy to Prevent Hair Loss and Regrowth Regrow hair on hairline) होऊ नये म्हणून आपण घरच्या घरी किचनमधील काही वस्तू वापरून हेअर मास्क बनवू शकतो. ज्याचा वापर करुन आपण डोक्याच्या समोरील भागात होणारा फ्रंट साईड हेअर लॉस कमी करुन शकतो(1 Best Natural Home Remedies to Prevent Hair Loss on hairline Permanently).

हा हेअर मास्क नेमका कसा बनवावा ? 

साहित्य :- 

१. आलं - १ इंचाचा आल्याचा तुकडा 
२. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 
३. एलोवेरा जेल - १ टेबलस्पून 
४. व्हिटॅमिन इ कॅप्सूल - १ कॅप्सूल 

देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...

बिया इतक्या छोट्या पण केसांच्या सौंदर्यात पडेल भर...आता घरीच बनवा केसांसाठी होममेड नैसर्गिक कंडिशनर !!

कृती :- 

१. सर्वप्रथम एका बाऊलमध्ये आल्याचे लहान - लहान तुकडे करुन घ्यावेत. 
२. आता या लहान तुकड्यांमध्ये खोबरेल तेल मिसळून हे मिक्सरमध्ये हलकेच फिरवून घ्यावे. 
३. आता हे मिश्रण एका गाळणीत घेऊन व्यवस्थित गाळून घ्यावे. 
४. गाळून घेतलेल्या मिश्रणांत एलोवेरा जेल व व्हिटॅमिन इ ची एक कॅप्सूल फोडून घालावी. 
६. आता हे सगळे मिश्रण चमच्याच्या मदतीने ढवळून एकजीव करून घ्यावे. 
 आपला हेअर मास्क वापरण्यासाठी तयार आहे.

स्वयंपाक घरांतील ४ गोष्टी वापरून बनवा नैसर्गिक हेअर सिरम...केस होतील मुलायम, चमकदार, घनदाट...

 

केसांचं नैसर्गिक सौंदर्य हरवलं ? केसांना लावा ४ प्रकारचे तेल, केस दिसतील काळेभोर - घनदाट..

हा हेअर मास्क कसा वापरावा ?

हा तयार झालेला हेअर मास्क आपल्या स्कॅल्पवर लावून २ ते ३ मिनिटे बोटांनी मसाज करावा. मसाज करताना हलक्या हातांनी मसाज करावा, जोरजोरात घासून मसाज करु नये. त्यानंतर किमान १ तास हा हेअर मास्क स्कॅल्पवर लावून ठेवावा. नंतर सौम्य शॅम्पूचा वापर करुन केस धुवून घ्यावेत. आठवड्यातून २ वेळा या हेअर मास्कचा वापर केल्यास फ्रंट साईड हेअर लॉसची समस्या दूर होऊन त्या भागावरील केस वाढण्यास मदत मिळते.

Web Title: 1 Best Natural Home Remedies to Prevent from Your Hair Loss on hairline Permanently.

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.