चेहऱ्यावरील अनावश्यक केस काढण्यासाठी विशेष करून महिला अनेक उपायांचा वापर करतात. शरीराच्या काही अवयवांवरचे हे अतिरिक्त केस महिला थ्रेडींग किंवा वॅक्सिंगने किंवा इतर पद्धतीने काढतात. महिला हात, पाय, अंडरआर्म्स, आयब्रो, अप्पर लिप्स, फेशियाल हेअर यांसारख्या भागांवरचे केस हमखास काढतात. चेहऱ्याची सुंदरता अधिक उठून दिसावी म्हणून महिला आयब्रो व अप्पर लिप्स व चेहऱ्यावरील फेशियल हेअर काढतात. आयब्रो,अप्पर लिप्स व फेशियल हेअरमुळे जशी चेहेऱ्याची सुंदरता वाढते तशीच त्यात जर काही चूक झाली तर चेहेरा विचित्र दिसू शकतो. आयब्रो आणि अप्पर लिप्स व चेहऱ्यावरील फेशियल (Facial Hair) हेअर या भागावरील केसांची वाढ लगेच होत असल्याकरणाने महिला ते काढण्यासाठी पार्लरमध्ये जातात.
आयब्रो, अप्पर लिप्स व फेशियल हेअर या भागांवरील स्किन तशी फारच नाजूक असते. थ्रेडींग किंवा वॅक्सिंग करताना या नाजूक भागाला देखील इजा होऊ शकते. चेहेऱ्याची सुंदरता अधिक खुलून येण्यासाठी आयब्रो, अप्पर लिप्स, फेशियल हेअर रिमूव्हल करत असलो तरीही ते करताना फार दुखते. काहीवेळा त्या भागावर रॅश येणे, रिअॅक्शन्स, सूज येणे, स्किन लाल होणे यांसारख्या छोट्या - छोट्या समस्या उद्भवतात. जर आपण पार्लरमध्ये जाऊन फेशियल हेअर रिमूव्हल (face packs to remove facial hair naturally at home) करत असाल तर ते करताना थोडी काळजी घेणे गरजेचे आहे जेणेकरुन स्किनला कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही. पार्लरमध्ये जाऊन फेशियल हेअर रिमूव्हल सारखी महागडी ट्रिटमेंट्स करण्यापेक्षा आपण घरच्या घरी साध्या सोप्या पद्धतीने हे फेशियल हेअर काढू शकतो(1 EASY AND NATURAL HOME REMEDIES TO REMOVE FACIAL HAIR).
फेशियल हेअर काढण्यासाठी लागणारे साहित्य :-
१. कॉर्न फ्लॉवर - १ टेबलस्पून२. हळद - चिमूटभर ३. पाणी - गरजेनुसार
देवघरातली पांढरीशुभ्र गोष्ट फार मोलाची, डोक्याला लावा केसातला कोंडा होईल काही दिवसांत गायब...
फेशियल हेअर काढण्यासाठी मास्क बनवण्याची कृती :-
एक मोठा बाऊल घेऊन त्यात एक चमचा कॉर्नफ्लॉवर घ्यावे. आता त्यात चिमूटभर हळद घालून हे मिश्रण मिक्स करून घ्यावे. आता त्यात दोन चमचे पाणी घाला. त्यानंतर हे मिश्रण एका वेगळ्या भांड्यात घेऊन गॅसच्या मंद आचेवर गरम करण्यासाठी ठेवा. थोड्या वेळाने ते गरम होण्यास सुरुवात होईल. १० ते १५ मिनिटांत हे मिश्रण गरम होईल आणि पूर्णपणे घट्ट होऊ लागेल. आपला फेशियल रिमूव्हल पील ऑफ मास्क वापरण्यासाठी तयार आहे.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
चॉकलेट खा आणि चेहऱ्यालाही लावा ! १ चमचा कोको पावडर आणेल चेहऱ्यावर चमचमता आनंदी ग्लो...
अशा प्रकारे हा मास्क वापरा...
हा तयार झालेला फेशियल रिमूव्हल पील ऑफ मास्क थोडा थंड करुन घ्यावा. आता चेहरा पाण्याने धुवून पूर्णपणे स्वच्छ करा. चेहऱ्यावर कोणत्याही प्रकारचे क्रिम, मेकअप किंवा कॉस्मॅटिक प्रॉडक्ट्स नाही हे लक्षात ठेवा. चेहरा पूर्णपणे पुसून घ्या आणि लाकडी चमच्याच्या मदतीने हा मास्क चेहऱ्यावर जिथे फेशियल हेअर असतील तिथे लावा. आता ते चेहऱ्यावर लावल्यानंतर व्यवस्थित सुकल्यानंतर केसांच्या उलट दिशेने ओढून काढा. अशा प्रकारे नको असलेले केस सहज निघून येतील. हा फेशियल रिमूव्हल पील ऑफ मास्क दोन ते तीन वेळा वापरल्यानंतर चेहऱ्यावरील केसांची वाढही कमी होते.