Join us  

थंडीत मुलायम त्वचेसाठी चेहऱ्याला लावा १ पदार्थ ; कोरडेपणा होईल दूर, त्वचा करेल ग्लो...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2022 1:45 PM

1 Easy Home Remedy for Dry Skin in Winter : थंडीच्या दिवसांत घरात सहज उपलब्ध असणारा १ पदार्थ चेहऱ्याला लावल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो

ठळक मुद्देचेहऱ्याचा कोरडेपणा तर दूर होतोच पण डाग दूर होण्यासही याची चांगली मदत होते. बाजारातली सौंदर्यप्रसाधने वापरण्यापेक्षा घरच्या घरी करता येतील असे सोपे उपाय केलेले केव्हाही चांगले

थंडीच्या दिवसांत कोरड्या हवेमुळे आपली त्वचाही खूप कोरडी पडते. काही वेळा त्वचेचा कोरडेपणा इतका वाढतो की त्यावर खाज येऊन त्वचेचा कोंडा पडण्यास सुरुवात होते. अशावेळी आपण त्वचेला तेल, मॉईश्चरायजर असे काही ना काही लावून त्याचा कोरडेपणा कमी करण्याचा प्रयत्न करतो. पण यामुळे त्वचा तात्पुरती ग्लो करते आणि पुन्हा आहे तशीच कोरडी दिसायला लागते. थंडीच्या दिवसांत त्वचा आधीच तडतडते आणि त्यात साबण किंवा मेकअपची काही प्रसाधने वापरल्यास त्यावर आणखी परिणाम होतो आणि त्वचेचा पोत खराब होतो (1 Easy Home Remedy for Dry Skin in Winter). 

(Image : Google)

यापेक्षा थंडीच्या दिवसांत घरात सहज उपलब्ध असणारा १ पदार्थ चेहऱ्याला लावल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो आणि त्वचा ग्लो करायलाही त्याची चांगली मदत होते. साय म्हणजेच मलाईचा चेहऱ्यावर लावण्यासाठी वापर केल्यास त्याचा अतिशय चांगला फायदा होतो. साधारणपणे आपण साय आवडीने खातो. त्यातून आपल्याला बरेच पोषणही मिळते. पण हेच पोषण आपल्या त्वचेला आणि चेहऱ्याला मिळावे यासाठी त्याचा उपयोग करता येऊ शकतो. सायीमध्ये असणारे लॅक्टीक अॅसिड आणि फॅटी अॅसिड त्वचा मॉईश्चराइज करण्यास मदत करतात. त्वचा ग्लोईंग होण्यासही साय लवण्याचा अतिशय चांगला उपयोग होतो. नियमितपणे हा उपाय केल्यास त्वचेचा रंग उजळण्यासही याचा चांगला उपयोग होतो. त्वचेत कोलेजनची निर्मिती होण्यासाठीही सायीचा चांगला उपयोग होतो. आता चेहऱ्यासाठी सायीचा कोणकोणत्या प्रकारे वापर करायचा ते पाहूया...

१. १ चमचा साय घेऊन त्यात अर्धा चमचा मध घालायचा. या मिश्रणाने चेहऱ्याचा चांगला मसाज करायचा. यामुळे चेहऱ्याचा रक्तप्रवाह तर चांगला होतोच पण चेहरा उजळण्यासही याची चांगली मदत होते.

२. १ चमचा ओटस आणि १ चमचा साय एकत्र करुन त्याचा होममेड स्क्रब तयार करता येतो. यामुळे चेहरा साफ होण्यास मदत होते. त्वचा एक्सफॉलिएट होण्यासाठी आणि डेड स्कीन निघून जाण्यासाठी हा उपाय अतिशय फायदेशीर ठरतो. 

(Image : Google)

३. कोरफड त्वचा आणि केसांसाठी फायदेशीर असते हे आपल्याला माहितच आहे. १ चमचा कोरफडीचा गर आणि अर्धा चमचा साय एकत्र करुन या मिश्रणाने चेहऱ्याला चांगला मसाज करावा. यामुळे चेहऱ्याचा कोरडेपणा तर दूर होतोच पण डाग दूर होण्यासही याची चांगली मदत होते. 

मात्र तुमच्या चेहऱ्यावर खूप मुरूम आणि रॅशेस असतील तर साय वापरणे शक्यतो टाळलेलेच बरे. कारण सायीमुळे या समस्या वाढण्याची शक्यता असते.  

टॅग्स :ब्यूटी टिप्सत्वचेची काळजीथंडीत त्वचेची काळजी