दिवसाला साधारण १०० केस गळणे हे सामान्य असते असे म्हटले जाते. कारण त्याच प्रमाणात नवीन केसांचीही डोक्यात निर्मिती होत असते. हे जरी खरे असले तरी आपल्या कंगव्यात किंवा केस विंचरल्यावर केस हातात आले की आपल्याला टेन्शन येते आणि केस गळून आता आपले टक्कल दिसायला लागणार अशी भिती वाटते. आपले केस अजिबात गळू नयेत आणि ते छान जाड, लांब असावेत अशी प्रत्येक महिलेची इच्छा असते. मात्र आपला आहार, ताणतणाव, अनुवंशिकता, आपण वापरत असलेली उत्पादने यानुसार केसगळतीचे प्रमाण कमी अधिक होत असते. केसगळती नियंत्रणात यावी यासाठी आपण घरच्या घरी काही सोपे उपाय करतो, काहीवेळा पार्लरमध्येही जातो. मात्र त्याचा उपयोग होतोच असे नाही. केस गळतीचे प्रमाण कमी होण्यासाठी आज आपण १ सोपा उपाय पाहणार आहोत. यामुळे केस गळणे तर कमी होईलच पण केस दाट-मजबूत होण्यासही मदत होईल (1 easy trick to reduce hair fall).
उपाय काय?
१. एका बाऊलमध्ये २ चमचा आवळा पावडर आणि २ चमचे जास्वंद पावडर घ्यायची.
२. यामध्ये २ ते ३ चमचे दही घालून हे मिश्रण चांगले एकजीव करायचे.
३. हा पॅक केसांना सगळ्या बाजुने लावायचा आणि साधारणपणे १ तास केसांवर हा पॅक तसाच ठेवायचा.
४. गरज वाटल्यास या पॅकमध्ये थोडे तेल टाकले तरी चालते.
५. त्यानंतर नेहमीप्रमाणे शाम्पूने केस धुवायचे.
६. आठवड्यातून १ ते २ वेळा हा प्रयोग नक्की करु शकतो.
फायदे
१. आवळा पावडरमुळे केस काळे होण्यास मदत होते.
२. जास्वंदामुळे केस मजबूत आणि दाट होतात. तसेच केसांचे आयुष्य वाढवण्यासाठी जास्वंद उपयुक्त ठरतो.
३. केस चमकदार होण्यास या उपायाचा अतिशय चांगला फायदा होतो.
४. दही केसांचे पोषण होण्यासाठी अतिशय फायदेशीर असते.