Lokmat Sakhi >Beauty > १ चमचा साखर-१ चमचा बेसन -१ चमचा टोमॅटोचा रस; चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो...

१ चमचा साखर-१ चमचा बेसन -१ चमचा टोमॅटोचा रस; चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो...

1 Easy Homemade Face Masks For A Party-Ready Glowing Skin : महागडे उपाय कशाला हा सोपा उपाय करुन तुम्ही एकदम पार्टी रेडी होऊ शकता, चेहरा चकाकेल इतका ग्लो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2023 07:52 PM2023-05-11T19:52:14+5:302023-05-11T20:04:52+5:30

1 Easy Homemade Face Masks For A Party-Ready Glowing Skin : महागडे उपाय कशाला हा सोपा उपाय करुन तुम्ही एकदम पार्टी रेडी होऊ शकता, चेहरा चकाकेल इतका ग्लो

1 Simple Homemade Face Masks To Get Your Skin Ready For All Those Parties | १ चमचा साखर-१ चमचा बेसन -१ चमचा टोमॅटोचा रस; चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो...

१ चमचा साखर-१ चमचा बेसन -१ चमचा टोमॅटोचा रस; चेहऱ्यावर येईल झटपट ग्लो...

वयाच्या कुठल्याही टप्प्यावर आपल्या चेहेऱ्यावर ऐन विशीतल्या तरुणीसारखा ग्लो असावा, असं प्रत्येक स्त्रीलाच वाटत. यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये जाऊन आपल्या चेहेऱ्याची विशेष काळजी घेतात. मात्र, पार्लरमध्ये जाऊन चेहेऱ्याला सुंदर, तेजस्वी आणि टवटवीत करण्यासाठी चेहेऱ्याला अनेक प्रकारची उत्पादने लावली जातात. मात्र, ही उत्पादने विविध केमिकल्सने बनवलेली असतात. त्यामुळे चेहेऱ्याची हानी होण्याची शक्यता असते. विविध केमिकलयुक्त उत्पादने वापरल्यामुळे चेहरा लवकर खराब होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे आपल्या चेहेऱ्याचे सौंदर्य लवकर खराब होऊ शकते.  

बऱ्याचदा स्त्रियांना दिवसभराच्या कामामुळे स्वत:च्या चेहेऱ्याकडे किंवा त्वचेकडे पाहण्यासाठी वेळ नसतो. त्यामुळे त्या आपल्या चेहेऱ्याकडे फारसे लक्ष देत नाहीत. अशावेळी चेहेऱ्यावर काळपटपणा साचून राहून चेहेरा डल किंवा थकलेला दिसतो. तसेच हा डल, थकलेला, काळवंडलेला चेहेरा घेऊन आपण सण, समारंभ, फंक्शन अशा प्रसंगी उपस्थित राहू शकत नाही. अशावेळी बहुतेक स्त्रिया वेगवेगळे महागडे उपाय करुन पाहतात. महागड्या ब्युटी ट्रिटमेंट्स, क्रिम्स, लोशन, फेसपॅक यांचा चेहेऱ्याच्या नाजूक त्वचेवर भडीमार केला जातो. यामुळे चेहेऱ्याची त्वचा अधिकच खराब होऊ लागते. यासाठी हे सगळे महागडे उपाय करण्यापेक्षा आपण घरच्या घरी एक सोपा झटपट होणारा उपाय अगदी सहज करुन पाहू शकतो(1 Easy Homemade Face Masks For A Party-Ready Glowing Skin).

चेहेऱ्यावरचा स्किन ग्लो वाढवण्यासाठी नेमकं काय कराव ? 

सगळ्यांत आधी एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून कॉफी, १ टेबलस्पून तांदुळाचे पीठ, १ टेबलस्पून बेसन, १ टेबलस्पून साखर, १ टेबलस्पून टोमॅटोचा रस घालून हे सगळे जिन्नस चमच्याने व्यवस्थित ढळवून एकजीव करुन घ्यावे. हे मिश्रण व्यवस्थित एकजीव केल्यानंतर चेहऱ्याला लावून घ्यावे. हे मिश्रण चेहेऱ्यावर लावताना हलकेच हातांनी मसाज करावा. त्यानंतर टोमॅटोची एक छोटी चकती कापून ती अलगद चेहेऱ्यावर फिरवावी. त्यानंतर चेहेरा गार पाण्याने स्वच्छ धुवून घ्यावा. जेव्हा तुम्हांला कोणत्या तरी खास प्रसंगासाठी तयार व्हायचे असेल किंवा घरी काही समारंभ, सण असेल तर आपण हा चेहेऱ्यावर झटपट ग्लो आणणारा उपाय करु शकता. 

आठवडभरात गायब होतील डोळ्याखालची काळी वर्तुळं, बघा घरगुती आय मास्कची जादू....

चेहरा कायम भप्प सुजलेला दिसतो, थोराड दिसतो? ५ सोप्या टिप्स, चेहरा दिसेल रेखीव सुंदर...

१. कॉफी चेहेऱ्याला लावून आपण तजेलदारपणा मिळवू शकता. तेलकट ते कोरड्या त्वचेसाठी कॉफी खूप उपयोगी असते. कॉफी पासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे स्क्रब आणि फेसपॅक बनवू शकतो. कॉफीमुळे चेहेऱ्याचे रक्ताभिसरण नियंत्रित राहते. चेहऱ्यावर असणारी छिद्रे भरुन निघतात. कॉफीमध्ये सॉफ्टनिंग आणि हायड्रेटिंग गुणधर्म असतात, त्यामुळे ती त्वचेसाठी चांगली मानली जाते. 

२. टोमॅटो आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात व्हिटॅमिन-सी आणि व्हिटॅमिन-ए आढळतात. दोन्ही घटक आपल्या त्वचेसाठी खूप फायदेशीर आहेत. जिथे व्हिटॅमिन-सीमध्ये भरपूर प्रमाणात अँटीऑक्सिडंट असतात, जे त्वचेची आर्द्रता टिकवून ठेवतात, त्याचप्रमाणे व्हिटॅमिन-सी आपल्या त्वचेला सूर्यकिरणांपासून वाचवते आणि वृद्धत्वात त्वचा निवळण्यापासून रोखते. 

३. बेसनामुळे आपल्या त्वचेवर किंवा चेहेऱ्यावर असणारी कोणतीही घाण स्वच्छ करण्यासाठी बेसन आपल्याला मदत करते. चेहरा तर स्वच्छ करतेच पण त्याचबरोबर ते त्वचेला आवश्यक असणारे पोषक घटक व तत्वे देखील देते. जे आपल्या चेहऱ्यावरील सौंदर्य वाढवण्याचे काम करते.

तांदूळ व मसूर डाळीचा डी - टॅन फेसमास्क, उन्हानं झालेलं टॅनिंग चुटकीसरशी गायब, त्वचा दिसेल चमकदार...

४. तांदळाच्या पिठामध्ये कॅल्शिअम, व्हिटॅमिन डी सह फायबरची मात्रा भरपूर असते. तसेच यामध्ये अतिरिक्त प्रमाणात लोह व थायमीन यासारख्या पोषक घटकांचाही समावेश असतो. या सर्व पोषण तत्त्वांमुळे त्वचेची खोलवर स्वच्छता होते.

Web Title: 1 Simple Homemade Face Masks To Get Your Skin Ready For All Those Parties

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.