प्रत्येकालाच आपली त्वचा नितळ, गोरी आणि मुलायम, तजेलदार असावी असे कायम वाटत असते. परंतु कितीही प्रयत्न केले तरीही असे होत नाही. आपल्यापैकी प्रत्येकालाच त्वचेच्या काही ना काही समस्या असतातच. या समस्यांपैकी त्वचेवर पिंपल्स आणि मुरूम येणे ही एक सर्वसामान्य समस्या मानली जाते. मुली व स्त्रियांमध्ये पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त असते. त्यात ही तारुण्यात पिंपल्स येण्याचे प्रमाण जास्त असते. तरुण वयात येणाऱ्या या पिंपल्सना तारुण्य पिटिका असेही म्हटले जाते. चेहऱ्यावर पिंपल्स वेगवेगळ्या कारणांनी येऊ शकतात. प्रदूषणामुळे त्वचेला सर्वात जास्त प्रमाणात हानी पोहचते. हवेतील धूळ व मातीचे कण चेहऱ्यावर बसतात व त्वचेचे छिद्र बंद करतात. तसेच त्वचेवर असलेला तेलाच्या थराला हे धुळीचे कण चिटकून संसर्ग होतो. त्यामुळे आपल्याला पिंपल्स किंवा मुरुमं यायला सुरुवात होते.
पिंपल्स, मुरूम, फोडी यांसारख्या समस्या तर त्वचेचे पूर्ण सौंदर्यच घालवून बसतात. काही काही वेळा तर त्वचेवर पडणारे खड्डे आणि काळे डाग अजूनच खराब दिसतात. काही लोकांच्या चेहऱ्यावरील ठेवणीमुळे हे पिंपल्स अधिकच हायलाईट होतात. यांपासून सुटका मिळवण्यासाठी ब्यूटी ट्रिटमेंट्सचा आधार घ्यावा लागतो आणि त्यासाठी खूप खर्च देखील करावा लागतो. यामुळे चेहऱ्यावरील पिंपल्स जाऊन चेहेरा क्लियर दिसायला मदत होते असे मानले जाते पण प्रत्येकालाच अशा महागड्या ट्रिटमेंट्स करणे शक्य नसते. त्याचबरोबर या इतक्या महागड्या ट्रिटमेंट्स करून त्याचा आपल्याला पुरेपूर फायदा होईल की नाही हे सांगता येत नाही. यासाठीच काही घरगुती पर्यायांचा वापर करून आपण चेहऱ्यावर येणारे पिंपल्स कायमचे दूर करू शकतो(1 Simple Natural Way To Get Rid of Pimples As Fast As Possible).
पिंपल्स दूर करण्यासाठी नेमका घरगुती उपाय काय करावा ?
पिंपल्स दूर करण्यासाठीचे हे आयुर्वेदिक पाणी तयार करण्यासाठी एका मोठ्या बाऊलमध्ये बटाट्याची साल, लिंबाची साल, संत्र्याची साल, पुदिन्याची पाने घ्यावीत. त्यानंतर हा बाऊल २ ते ३ तासांसाठी उन्हांत ठेवावा. उन्हांत ठेवून या सगळ्या साली हलक्याच उन्हांत वाळवून घ्याव्यात. आता या वाळलेल्या साली मिक्सरला हलकेच फिरवून घ्याव्यात. (त्याची एकदम बारीक पावडर करु नये, हलकेच मिक्सरमध्ये फिरवून किंवा हातांनी कुस्करून घ्यावे.) त्यानंतर एक सुती किंवा मलमलचे कापड घेऊन त्यात या सालींचे तुकडे ओतून त्याची एक छोटीशी पोटली बनवून घ्यावी. ही पोटली बनवून तुम्ही ७ दिवस तशीच ठेवून किमान ४ वेळा तरी वापरू शकता.
एका मोठ्या भांड्यात गरम पाणी हलकेच उकळवून घ्यावे. पाणी उकळवून झाल्यानंतर त्यात ही तयार करून घेतलेली पोटली किमान ४ ते ५ मिनिटांसाठी सोडावी. त्या पोटली मधील सुकलेल्या सालींचा अर्क त्या उकळत्या गरम पाण्यांत उतरला पाहिजे. ५ मिनिटांनंतर ही पोटली त्यात पाण्यातून काढून पुन्हा पुढच्या वापरासाठी सुकवून व्यवस्थित स्टोअर करून ठेवावी.
फेशियल नेमके किती दिवसांनी करायला हवे? महिन्यातून एकदा केले तर त्वचेला खरंच फायदा होतो?
तुम्ही हमखास ५ चुका करता, म्हणून तर तुमचे केस गळतात! महागडी प्रॉडक्ट्स वापरुन मग काय उपयोग...
हे सुकलेल्या सालींचे पाणी चेहऱ्यावर लावण्यापूर्वी चेहरा स्वच्छ करणे अतिशय आवश्यक आहे. चेहरा स्वच्छ करण्यासाठी बेसनामध्ये मध मिसळून त्याचा एक फेसपॅक तयार करावा. हा फेसपॅक चेहऱ्याला लावून हलक्या हातांनी ४ ते ५ मिनिटे मसाज करून चेहरा स्वच्छ करून घ्यावा. मध आणि बेसनाचे हे मिश्रण चेहऱ्यावर नैसर्गिक क्लिन्झरसारखे काम करते. त्यानंतर स्वच्छ पाण्याने चेहरा धुवून घ्यावा. चेहरा धुवून घेतल्यानंतर आता तयार केलेले आयुर्वेदिक पाणी चेहऱ्याला लावावे. हे तयार केलेल आयुर्वेदिक पाणी संपूर्णपणे थंड झाल्यावरच ते चेहऱ्यावर लावावे. या पाण्याने चेहरा धुताना हलक्या हातांनी रगडून मसाज करत चेहेरा धुवावा. दिवसातून २ ते ३ वेळा या पाण्याने चेहरा धुवा आणि पुढील ३ दिवसातच तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्स निघून गेलेले असतील.
या पाण्याने चेहरा धुतल्याने पिंपल्स तर दूर होतातच शिवाय त्वचेच्या इतरही अनेक समस्यांपासून सुटका मिळते. हे पाणी मुरुम, काळे डाग आणि पुटकुळ्या देखील दूर करते. याशिवाय ते चेहऱ्याला मॉइश्चरायझ आणि तजेलदारपणा मिळवून देण्याचे काम करते.