Lokmat Sakhi >Beauty > थंडीत टाचा फुटतात, बघा १ घरगुती उपाय - दुखणे होईल बंद - घाला स्टायलिश चप्पल बिनधास्त...

थंडीत टाचा फुटतात, बघा १ घरगुती उपाय - दुखणे होईल बंद - घाला स्टायलिश चप्पल बिनधास्त...

Managing and Preventing Cracked, Dry Heels During Winter : पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम फॉर्म्युला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2023 05:11 PM2023-11-15T17:11:36+5:302023-11-15T17:28:23+5:30

Managing and Preventing Cracked, Dry Heels During Winter : पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम फॉर्म्युला.

1 SIMPLE TIPS TO PREVENT DRY AND CRACKED HEELS THIS WINTER, Preventing Cracked, Dry Heels During Winter | थंडीत टाचा फुटतात, बघा १ घरगुती उपाय - दुखणे होईल बंद - घाला स्टायलिश चप्पल बिनधास्त...

थंडीत टाचा फुटतात, बघा १ घरगुती उपाय - दुखणे होईल बंद - घाला स्टायलिश चप्पल बिनधास्त...

कित्येक उपाय केले तरीही थंडीच्या दिवसात पायांना भेगा पडतातच. थंडीतील गारठ्याचा सर्वाधिक परिणाम जाणवतो तो त्वचेवर आणि टाचांवर. भेगाळलेल्या टाचा म्हणजे तरुणी आणि महिलांसाठी एक मोठा प्रॉब्लेमच असतो. यामुळे अनेकदा आपल्याला स्टायलिश फुटवेअर्सना बाय - बाय करत, टाचा झाकून जातील अशा फुटवेअर्सचा वापर करावा लागतो. तसेच जर पायांना भेगा (HOW TO CARE FOR DRY, CRACKED HEELS IN WINTER SEASON) पडलेल्या असतील तर इन्फेक्शन होण्याचा धोका आणखी वाढतो. यामुळे पायांना जखमही होऊ शकते. हिवाळ्यात बरेचदा आपल्यापैकी बहुतेक स्त्रियांना टाचांना भेगा पडण्याच्या समस्येला सामोरे जावे लागते. जर आपणही या समस्येचा सामना करत असाल तर, आता अजिबात टेन्शन घेऊ नका. पायाच्या टाचांना पडलेल्या भेगा (foot care) दूर करण्याचा आणि फुटलेले - खरखरीत झालेले हात सॉफ्ट करणारा एक उत्तम घरगुती फॉर्म्युला उपयोगात आणू शकतो(How do you treat cracked heels in the winter).

थंडीत रूक्ष पडणाऱ्या त्वचेची चांगल्या प्रकारे काळजी घेण्यासाठी ‘स्किन केअर’ ट्रीटमेंट घेणं प्रेत्येकवेळी शक्य नसतं. अशावेळी आपण होममेड फूट केअर क्रिम वापरणे अत्यंत फायदेशीर ठरु शकते. या क्रिमच्या (1 Home Remedy for Cracked Heels in Winter) नियमित वापराने त्वचेचा मऊपणा कायम ठेवण्यास मदत होते. तसेच पायाला हलक्या हाताने मसाज केल्यास मॉश्चर कायम राहून त्वचा मऊ राहते. पायांवरील भेगांमुळे काहींना तर चालणंही कठीण होतं. अशावेळी ही होममेड फूट केअर क्रिम (Super Easy Ways To Get Rid Of Cracked Feet In Winter) अत्यंत उपयुक्त ठरते( 1 Super Easy Ways To Get Rid Of Cracked Feet In Winter). 

साहित्य :- 

१. पेट्रोलियम जेली - १ टेबलस्पून 
२. खोबरेल तेल - १ टेबलस्पून 
३. ग्लिसरीन - १ टेबलस्पून 
४. लिंबाचा रस - ५ ते ६ थेंब 

नेहमीच्याच खोबरेल तेलात मिसळा आजीबाईच्या बटव्यातील १ सिक्रेट पदार्थ, केसांच्या सौंदर्यात पडेल भर...

आयब्रो थ्रेडिंगनंतर येणारी सूज, जळजळ, रॅशेज कमी करण्यासाठी सोपे ५ उपाय, आता पेनलेस आयब्रो करा बिनधास्त...

कृती :- 

१. सर्वात आधी एका छोट्याशा काचेच्या डबीत प्रत्येकी १ टेबलस्पून पेट्रोलियम जेली व खोबरेल तेल घ्यावे. 
२. पेट्रोलियम जेली व खोबरेल तेल चमच्याने मिसळून एकजीव करुन घ्यावे. 
३. त्यानंतर त्यात १ टेबलस्पून ग्लिसरीन व लिंबाच्या रसाचे ५ ते ६ थेंब घालावे.
४. हे सगळे मिश्रण चमच्याने ढवळून व्यवस्थित एकजीव करून घ्यावे. 

आपले हिल रिपेअर क्रिम पायाला लावण्यासाठी तयार आहे. 

मेहेंदी - केळी - लिंबाचा रस; केसांच्या अनेक समस्यांवर १ उपाय, सगळे महागडे उपचार होतील बंद...

टाचांना भेगा पडल्या ? ३ स्टेप्सचा सोपा उपाय, टाचा होतील कोमल - मऊ आणि सुंदर...

हिल रिपेअर क्रिम वापरावे कसे ? 

१. रोज रात्री झोपताना ही तयार केलेली क्रिम पायांवर ज्या ठिकाणी भेगा आहेत त्या ठिकाणी लावून मसाज करून घ्यावा. 
२. मसाज करुन घेतल्यानंतर पायांत पायमोजे घालूंन झोपावे. 
३. आपण दिवसातून फक्त दोन वेळा ही क्रिम लावल्यास पाय अत्यंत मऊ आणि उत्तम होतात. तसेच यात असलेले खोबरेल तेल थकलेल्या टाचांना त्वरित शांत करते आणि आराम देते. पायाचं पोषण आणि ते लवकर बरे व्हावेत म्हणून रात्रीच्या वेळी ही क्रिम लावण्यास प्राधान्य दिल्यास सकाळी पाय आणखी मऊ होतात.

हा उपाय केल्यामुळे पायांना पडलेल्या भेगा दूर होण्यास मदत मिळते.

Web Title: 1 SIMPLE TIPS TO PREVENT DRY AND CRACKED HEELS THIS WINTER, Preventing Cracked, Dry Heels During Winter

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.