आपल्या काही मैत्रिणी किंवा मग ऑफिसमधल्या काही सहकारी खरोखरंच खूप स्मार्ट असतात. त्यांच्याकडे पाहूनच 'काय भारी पर्सनॅलिटी आहे.. ', 'काय मस्त मेंटेन आहेत..', किंवा 'काय स्मार्ट आहेत..' असं अगदी सहज कुणीही म्हणून जातं. गबाळेपणा किंवा एखाद्या बाबतीत उन्नीस- बीस असं काही त्यांच्यात नसतंच. सगळंच कसं अगदी परफेक्ट आणि फिट असतं. आपल्यालाही मग त्यांच्यासारखंच स्मार्ट, देखणं दिसावं वाटतं. म्हणूनच तर या बघा १० ट्रिक्स. (how to be an attractive personality?) प्रत्येक महिलेलाच माहिती असाव्यात अशा या ट्रिक्स आहेत. यासगळ्या स्मार्ट हॅक्स (Important smart hacks for every women) इन्स्टाग्रामच्याstylemuze या पेजवर शेअर (instagram share) करण्यात आल्या आहेत.
प्रत्येकीला माहितीच असाव्यात या १० स्मार्ट हॅक्स
१. एखाद्या पार्टीसाठी आपण उंच टाचेच्या चपला घालतो. या चपला खूप काळ पायात राहिल्याने मग टाच दुखायला लागते. अगदी घरी येईपर्यंत पण राहावत नाही. म्हणूनच आपल्या पर्समध्ये फोल्डेबल शुज कॅरी करा. पार्टी झाली की हे आरामदायक शुज लगेचच पायात घालून टाका.
२. एखाद्या ड्रेसचा गळा खूपच डिप असतो. त्याला व्यवस्थित पिनअपही करता येत नाही. अशावेळी गळा परफेक्ट आपल्या शरीरावरच बसावा, उतरू नये यासाठी गळ्याच्या तिथे कपड्याला एक डबल टेप लावा. एका बाजूने कपड्यावर आणि दुसऱ्या बाजुने तो तुमच्या शरीरावर चिटकवा. कपडा जागेवरून हलणार नाही.
३. काही वेळेला कंबरेवरचा बेल्ट पुढे आलेला दिसतो, त्यासाठी पण डबल टेपचा वापर करता येतो.
४. तुमचा एखादा बुट किंवा सॅण्डल सैल होत असेल तर त्याच्या तळव्याला डबलटेप लावा. यामुळे बुट- सॅण्डल घातल्यावर तो तुमच्या पायाला व्यवस्थित चिटकून बसेल आणि वारंवार पायातून निघणार नाही.
५. साडीच्या प्लेट्स नीट करण्यासाठी किंवा एखादा कपडा अंगात घातल्यावर त्याला इस्त्री नाही, असं लक्षात आलं, तर त्या जागेवरून हेअर स्ट्रेटनर फिरवा. साडीच्या निऱ्या अगदी परफेक्ट दिसतील.
६. जेल नेलपेंट लावली की ती महिनाभर तरी बोटांवरून जात नाही. त्यामुळे तिच्यावर अनेकदा खाद्यपदार्थांचे डाग पडतात. हे डाग काढून टाकण्यासाठी आपलं नॉर्मल नेलपेंट रिमुव्हर वापरा. डाग स्वच्छ होतील.
७. स्पोर्ट शुज किंवा इतर कोणतेही शुज घातल्यानंतर पायाला खूप घाम येतो. आणि मग घाण वास येऊ लागतो. असं होऊ नये म्हणून बुट घालण्याआधी तळपायाला एकदा डिओड्रंट स्टिक लावून घ्या.
८. एखादा नवा बुट- सॅण्डल चावत असेल तर दुखापत होण्याआधीच त्या जागेवर तुमच्या पायाला बॅण्डेज लावून घ्या.
९. दिवसभर बुट घातल्याने पायांना घाम येतो. सारखा घाम आल्याने बुटांच्या तळव्याचा आतला भागही खराब होतो. असं होऊ नये म्हणून बुटामध्ये पॅण्टीलायनर घाला.
१०. काही काळ्या, निळ्या रंगाचे गडद कपडे इतर कपड्यांसोबत धुतले गेले की त्या कपड्यांवर पांढरे धागे दिसू लागतात. किंवा कपड्यांवर कधी कधी घरातल्या पाळीव कुत्र्यांचे केसही चिकटतात. ते काढून टाकण्यासाठी कपड्यावर चिकटपट्टी लावा, व्यवस्थित प्रेस करा आणि नंतर काढून टाका. चिकटपट्टीच्या चिकटपणासोबत पांढरे धागे, केसही निघून येतील.