Lokmat Sakhi >Beauty > कोरिअन हेअर केअरवर जगभरातल्या तरुणी फिदा, फक्त १० स्टेप्स- केस दिसतील कायम सुंदर

कोरिअन हेअर केअरवर जगभरातल्या तरुणी फिदा, फक्त १० स्टेप्स- केस दिसतील कायम सुंदर

केस सुंदर , निरोगी करण्यासाठी कोरिअन ब्यूटीमध्ये (korean beauty trend) विशिष्ट पध्दतीचा अवलंब केला जातो. 10 स्टेप्सचं कोरिअन हेअर केअर रुटीनचा (10 steps korean hair care routine) अवलंब केल्यास केसांना हरवलेली चमक प्राप्त होते. केस सुंदर, दाट, लांब आणि मजबूत होतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2022 04:12 PM2022-09-12T16:12:34+5:302022-09-12T16:21:20+5:30

केस सुंदर , निरोगी करण्यासाठी कोरिअन ब्यूटीमध्ये (korean beauty trend) विशिष्ट पध्दतीचा अवलंब केला जातो. 10 स्टेप्सचं कोरिअन हेअर केअर रुटीनचा (10 steps korean hair care routine) अवलंब केल्यास केसांना हरवलेली चमक प्राप्त होते. केस सुंदर, दाट, लांब आणि मजबूत होतात.

10 steps korean hair care routine for healthy and beautiful hair | कोरिअन हेअर केअरवर जगभरातल्या तरुणी फिदा, फक्त १० स्टेप्स- केस दिसतील कायम सुंदर

कोरिअन हेअर केअरवर जगभरातल्या तरुणी फिदा, फक्त १० स्टेप्स- केस दिसतील कायम सुंदर

Highlightsस्कॅल्प स्केलर मसाजमुळे डोक्यातला कोंडा, मृत पेशी, घाण, मुळांशी साचून राहिलेलं तेल निघून जातं.केसांच्या मुळांना पोषण मिळून आराम मिळण्यासाठी स्कॅल्प मास्क लावला जातो.केस पातळ होवू नये, केसात कोंडा होवू नये यासाठी स्कॅल्प टाॅनिक लावलं जातं.

सौंदर्य जगतात 'के ब्यूटी' अर्थात कोरियन ब्युटीची (korean beauty trend)  मोठी क्रेझ आहे. केवळ त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी नाही तर केस सुंदर , निरोगी करण्यासाठी कोरिअन ब्यूटीमध्ये विशिष्ट पध्दतीचा (korean hair care)  अवलंब केला जातो. 10 स्टेप्सचं कोरिअन हेअर केअर रुटीनचा (10 steps korean hair care routine)  अवलंब केल्यास केसांना हरवलेली चमक प्राप्त होते. केस सुंदर, दाट, लांब आणि मजबूत होतात. 

Image: Google

कोरियन हेअर केअर सीक्रेट

1. कोरिअन हेअर केअर रुटीनचं पहिलं पाऊल म्हणजे पुढील उपचारांसाट्ही केसांची तयारी करणं. यात स्कॅल्प स्केलरचा सॅलिसलिक ॲसिड फाॅर्म्युला असतो. यात स्क्लॅप स्केलर उत्पादनाच्या सहाय्यानं टाळूची म्हणजेच केसांच्या मुळांचा मसाज केला जातो. स्कॅल्प स्केलर मसाजमुळे डोक्यातला कोंडा, मृत पेशी, घाण, मुळांशी साचून राहिलेलं तेल निघून जातं. 

2. सौम्य प्रकारचा शाम्पू घेउन तो केसांच्या मुळांशी मसाज करत लावला जातो. कोरिअन ब्यूटीमध्ये केसांच्या प्रकाराप्रमाणे शाम्पूची निवड केली जाते. शाम्पूद्वारे केसातील अतिरिक्त तेल निघून जातं आणि  सौम्य प्रकारचा शाम्पू वापरल्यानं केसात ओलावा आणि माॅश्चरायझर टिकून राहातं.

3. शाम्पू केल्यानंतर हेअर ब्रशनं किंवा काॅम्ब टूलच्या मदतीनं केसांच्या मुळांचा मसाज केला जातो. यामुळे केसांच्या मुळाकडील रक्तप्रवाह वाढतो. याचा परिणाम केस तंतू खेचले जाऊन केसांची जाडी वाढते. केसांच्या निरोगी वाढीसाठी केसांना मसाज करणं आवश्यक आहे. 

4. केसांच्या मुळांचा मसाज झाल्यानंतर स्कॅल्प स्क्रब लावला जातो. स्कॅल्प स्क्रब लावल्यानं केसांच्या मुळांची रंध्रं उघडतात. त्यामुळे केसांच्या मुळाशी असलेली घाण निघून जाते. केसांची मुळं स्वच्छ होतात. केसांच्या मुळाशी असलेली घाण, मृत त्वचा निघून जाते. 

5. स्कॅल्प स्क्रब केल्यानंतर केसांना डीप कडीशनिंग केलं जातं. यामुळे केस निरोगी राहातात. केसांमध्ये ओलसरपणा टिकून राहातो. डीप कंडीशनिंगमुळे केसांना पोषण मिळतं. केसांचं आरोग्य सुधारतं. केसांची झालेली हानी भरुन निघते. केस माॅश्चराइझ होण्यासोबतच मजबूतही होतात. 

Image: Google

6. केसांच्या मुळांना पोषण मिळून आराम मिळण्यासाठी स्कॅल्प मास्क  लावला जातो. स्कॅल्प मास्कमुळे केसांच्या मुळांना आर्द्रता प्राप्त होते. स्कॅल्प मास्क लावल्यानं केस गळणं कमी होतं. केसांची मुळं मजबूत होतात. 

7. स्कॅल्प मास्क पाण्यानं धुवून टाकल्यानंतर केसांच्या मुळांचा पीएच बॅलन्स राखण्यासाठी 1 चमचा ॲपल सायडर व्हिनेगर पाण्यात घालून त्या पाण्यानं केस धुवावेत. व्हिनेगरने केस धुतल्यामुळे केसात जिवाणुंची वाढ होत नाही. केसात तेलकटपणा राहात नाही. 

Image: Google

8. रात्री झोपण्याआधी केसांना लिव इन कंडीशनर लावून केस रुमालात बांधून ठेवले जातात. हा उपाय केसांसाठी फायदेशीर मानला जातो. या उपायामुळे केस धुताना त्यात गुंता होत नाही.  हे लिव इन कंडीशनर केसांच्या मुळांना न लावता केसांना लावलं जातं. 

9. केस पातळ होवू नये, केसात कोंडा होवू नये यासाठी स्कॅल्प टाॅनिक लावलं जातं. स्कॅल्प टाॅनिकमुळे केसातील आर्द्रता टिकून राहाते. केसाना चमक येते. केसांना उंदरी लागत नाही. 

10. कोरिअन हेअर केअरमध्ये शेवटची स्टेप म्हणजे केसांना सीरम लावलं जातं. यासाठी वाॅटर बेस्ड फाॅर्म्युला वापरला जातो.  
कोरिअन हेअर केअरच्या या 10 स्टेप्सचा अवलंब केल्यास निरोगी केस, दाट केस, लांब केस, चमकदार केस या केसांच्या संदर्भात असलेल्या आपल्या अपेक्षा नक्की पूर्ण होतील. 

Web Title: 10 steps korean hair care routine for healthy and beautiful hair

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.