Join us

म्हातारे व्हाल तरीही खराब होणार नाहीत दात, फक्त या १० टिप्स करा फॉलो!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2025 12:05 IST

Teeth Cleaning Tips: जर योग्य पद्धतीनं दातांची काळजी घेतली गेली नाही तर दात गमवावे लागू शकतात. अशात दातांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला १० टिप्स सांगणार आहोत. 

Teeth Cleaning Tips: दात आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात. कारण याद्वारे आपण अन्न चावून खाऊ शकतो. मात्र, अजूनही बरेच लोक दातांची पुरेशी काळजी घेत नाही आणि त्यामुळे कमी वयातच दात काढवे लागतात किंवा त्यांना किड लागते. त्याशिवाय तोंडाची दुर्गंधी आणि हिरड्यांमधून रक्त येणे अशाही समस्या सतत होत असतात. तुम्ही पाहिलं असेल की, जुन्या लोकांचे दात शेवटपर्यंत मजबूत राहतात आणि त्यांना कधी डेंटिस्टकडे जाण्याचीही गरज पडत नाही. अशात जर योग्य पद्धतीनं दातांची काळजी घेतली गेली नाही तर दात गमवावे लागू शकतात. अशात दातांची काळजी कशी घ्यावी यासाठी आम्ही तुम्हाला १० टिप्स सांगणार आहोत. 

दात स्वच्छ करण्याचे १० उपाय

१) रोज कमीत कमी दोन वेळ ब्रश केलं पाहिजे. सकाळी झोपेतून उठल्यावर आणि झोपण्याआधी ब्रश करावं. असं केल्यास तोंडात कीटाणू जमा होणार नाहीत.

२) अनेक लोक पूर्णपणे घासला गेलेल्या किंवा दाते खराब झालेल्या ब्रशचा वापर करता. असं केल्यास दात व्यवस्थित स्वच्छ होत नाहीत. वेळोवेळी ब्रश बदलला पाहिजे.

३) जेवण केल्यास गुरळा करा. कारण दातांमध्ये अन्नाचे कण अडकून राहतात आणि यामुळे तोंडाची दुर्गंधी येऊ शकते.

४) ज्या लोकांना नेहमीच तोंडाच्या दुर्गंधीची समस्या होते. त्यांनी लवंग, वेलची किंवा बडीशेप खावी. या गोष्टी नॅचरल माऊथ फ्रेशनर आहेत.

५) दातांमध्ये काही अडकलं असेल तर ते काढण्यासाठी पाण्यानं गुरळा करा किंवा कडूलिंबापासून तयार टूथपिकचा वापर करा.

६) अनेकदा टूथपिकचा वापर करूनही दातांमध्ये अडकलेले कण निघत नाहीत. अशावेळी एखाद्या चांगल्या डेंटल फ्लॉसचा वापर करा.

७) किमान महिन्यातून एकदा डेंटिस्टकडून दातांची तपासणी करून घ्या. असं केल्यास दातांना भविष्यात काही समस्या होणार नाही.

८) खूप जास्त थंड किंवा गरम काही खाऊ नका. यामुळे दातांना झिणझिण्या येतात.

९) सॉफ्ट ड्रिंक किंवा सोड्यामुळे दातांचं मोठं नुकसान होतं. त्यामुळे या गोष्टी पिणं टाळा.

१०) जर पान, गुटखा किंवा तंबाखू खाण्याची सवय असेल तर लगेच बंद करा. यामुळे कॅन्सरचा धोका असतो आणि दातंही खराब होतात.

टॅग्स :ब्यूटी टिप्सहेल्थ टिप्स