Join us  

सहावार, नऊवार नाही तर सोनाली कुलकर्णीने नेसली 'दहावार' साडी, हा साडीचा कोणता नवा प्रकार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2021 2:07 PM

Saree draping: सहावार साडी, नऊवार साडी हे प्रकार तर आपण नेहमीच ऐकतो. पण अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने नेसली होती १० वार साडी... बघा, साडीचा हा प्रकार नेमका असतो तरी कसा.. 

ठळक मुद्देअभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केले आहेत.

साडी (6 yards) म्हणजे बहुतांश महिलांचा विक पॉईंट. साडी नेसणं होणार नसलं किंवा कपाटात भरपूर साड्या असल्या तरी नवनविन साड्या बघण्याचा आणि त्या विकत घेण्याचा मोह मात्र अनेक जणींना आवरता येत नाही. साड्यांमध्ये नविन काही दिसलं की लगेच अनेक जणींचं मन त्याकडे टवकारतं... आता हेच बघा ना सोनाली कुलकर्णीने नेसलेली काळ्या रंगाची साडी जबरदस्त स्टनिंग (stunning black saree by Actress Sonali Kulkarni ) असून ही साडी दहा वारी आहे, असं तिनं सांगितलंय.

 

अभिनेत्री सोनाली कुलकर्णी हिने तिचे काही फोटो नुकतेच इन्स्टाग्रामला (instagram) शेअर केले आहेत. यामध्ये सोनालीने जी काळ्या रंगाची साडी नेसली आहे, ती अतिशय स्टनिंग लूक देणारी आहे. आधीच साडी म्हणजे आवडीचा विषय आणि त्यातही काळ्या रंगाची साडी म्हणजे विचारायलाच नको... त्यामुळे सोनालीच्या या फोटोंना महिला वर्गाकडून भरभरून लाईक्स आणि कमेंट्स मिळत आहेत. सोनालीची ही साडी रॉयलतास्ता या ब्रॅण्डने डिझाईन केली आहे. साडीवर पुर्णपणे सिक्विन वर्क करण्यात आले असून सोनालीने या काळ्या साडीवर चंदेरी रंगाचं स्लिव्हलेस ब्लाऊज घातलं आहे. हिऱ्याचं गळ्यातलं, कानातले, बांगड्या आणि नाकातली नथ यामुळे सोनालीचा लूक कम्प्लिट वाटतो आहे.

 

सोनालीची ही साडी १० वार (what is the speciality of 10 yards saree) आहे, म्हणजे अर्थातच आपल्या नऊवार (9 yards saree) साडीपेक्षाही लांबीने मोठी. सोनालीने ही साडी नेसलीही नऊवार पद्धतीनेच आहे. पण पारंपरिक नऊवारपेक्षा तिची ही नऊवार नेसण्याची स्टाईल खूपच वेगळी आहे. नऊवार साड्या या प्रामुख्याने महाराष्ट्र आणि दक्षिणेकडील भागात नेसल्या जातात. काष्टा, समोरचा घोळ यामुळे अशा साड्या नेसण्यासाठी साडीची लांबी मोठी असावी लागते.

 

अनेकदा नऊवार स्टाईलमध्ये साडीचा पदर लांबलचक घेणं शक्य होत नाही, कारण साडी कमी पडते. ज्या महिला तब्येतीने खूप धिप्पाड, उंच अशा असतात त्यांची तर आणखीनच पंचाईत होते. त्यांना नऊवार अजिबातच पुरत नाही. त्यामुळे अशा महिलांसाठी खास १० वार साडी तयार केली जाते. काही मोजक्याच महिला अशा साड्या घेत असल्यामुळे सहावार, नऊवार या साड्यांच्या तुलनेत १० वार साडी खूपच कमी प्रमाणात तयार होत असतात. 

 

टॅग्स :ब्यूटी टिप्सफॅशनसोनाली कुलकर्णीसेलिब्रिटी